“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी.” प्रश्नावली 190

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
11 Min Read

     📖 वाचाल तर वाचाल 📖

       📘आजचा परिपाठ📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-  ३० सप्टेंबर २०२४

🔊🔊 आजचा वार:- सोमवार

📙📘सुविचार :-  जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका.


📙📘📙 दिनविशेष

🌍🌍आजचा जागतिक दिन


🎗️ आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन

✒️✒️आजचा दिनविशेष – घटना

▶️1961 : दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे झाला.
▶️1993 : किल्लारी भूकंपात सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला, हजारो लोक बेघर झाले.
▶️1994 : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार.
▶️1998 : डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.
▶️ 2000 : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम प्रदान करण्यात आला.


✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

➡️1900 : ‘एम. सी. छागला’ – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 9 फेब्रुवारी 1981)
➡️1922 : ‘हृषिकेश मुखर्जी’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 27 ऑगस्ट 2006)
➡️1934 : ‘ऍन्ना काश्फी’ – भारतीय-अमेरिकन अभिनेत्री जन्म. (मृत्यू : 16 ऑगस्ट 2015)
➡️1941 : ‘कमलेश शर्मा’ – 5वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस यांचा जन्म.
➡️1961 : ‘चंद्रकांत पंडित’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
➡️1933 : ‘प्रभाकर पंडित’ – संगीतकार व व्हायोलिनवादक यांचा जन्म. (मृत्यू : 28 डिसेंबर 2006)
➡️1972 : ‘शंतनू मुखर्जी’ – पार्श्वगायक यांचा जन्म.
➡️1980 : ‘मार्टिना हिंगीस’ – स्विस लॉनटेनिस खेळाडू यांचा जन्म.


✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

👉1992 : ‘गंगाधर खानोलकर’ – लेखक व चरित्रकार यांचे निधन. (जन्म : 19 ऑगस्ट 1903)
👉1998 : ‘चंद्राताई किर्लोस्कर’ – भूदान चळवळीतील कार्यकर्त्या यांचे निधन.
👉2001 : ‘माधवराव शिंदे’ – केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री यांचे निधन. (जन्म : 10 मार्च 1945)

🌍 जागतिक दिन लेख

                   📌आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन📌
             आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील अनुवादक, भाषांतरकार आणि भाषाशास्त्रज्ञ यांचा सन्मान करण्यासाठी आणि भाषांतराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आहे. अनुवादक वेगवेगळ्या भाषांतील साहित्य, ज्ञान आणि विचार यांची देवाणघेवाण सुलभ करतात. ते विविध संस्कृती आणि समुदायांना जोडण्याचे काम करतात, ज्यामुळे जागतिक संवाद, समजूतदारपणा आणि सहकार्य वाढते.
               या दिवसाचा उद्देश अनुवादाच्या माध्यमातून भाषांतर आणि भाषिक अडथळे दूर करून ज्ञानाचा प्रसार करणे आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, कला आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत अनुवादकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अनुवादाच्या माध्यमातून लोक एकमेकांच्या भाषा, संस्कृती आणि परंपरांचा आदर करतात आणि जागतिक एकात्मता वाढते.

======££££====££££====££££====££££== 

   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉  असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जिवालाही धोका निर्माण होतो .

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  साखर पेरणे – गोड गोड बोलून आपलेसे करणे.

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                     🙏 प्रार्थना 🙏

              या लाडक्या मुलांनो
या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार ।
नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार ॥धृ।।

आईस देव माना, वंदा गुरुजनांना।
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा ।
गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥१॥

शिवबापरी जगांत, दिलदार थोर व्हावे।
टिळकापरी सदैव, ध्येयास त्या स्मरावें।
जे चांगलें जगी या, त्याचा करा स्वीकार।।२।।

शाळेत रोज जाता, ते ज्ञान-बिंदु मिळवा।
हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा।
कुलशील थोर माना, ठेवू नका विकार ॥३॥
                                          
                     📝 बोधकथा 📝

                 हुशार शेतकरी

               एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होती. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई. वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते. एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो. मध्ये गेल्यावरती तो शेळी साठी एक गवताची पेंडी तयार करतो. व खूप पाऊस चालू होतो. त्याला घरी येता वेळेस नदी पार करून यावे लागत.
              नदीला खूप पूर आला होता. शेतकरी शेळी वाघ व गवताची पिंडी घेऊन नदीकिनारी येतो. काही सुचत नाही की आता नदी कशी पार करावी.काय करावे असे तो विचारात पडतो तो मदत होईल का ते पाहू लागतो.
किनारी त्याला एक नाव दिसते तो त्या नावे जवळ जातो. एका वेळेस दोन जणांना घेऊन जाईल या अवस्थेत होती. शेतकऱ्यापुढे प्रश्न पडला की आपण यांना नदीकिनारी कसे घेऊन जावे. शेतकरी विचार करतो की आपण जर पहिल्यांदा गवताची पेंडी घेऊन गेलो तर वाघ शेळीला खाऊन टाकेल व वाघाला घेऊन गेलो शेळी गवत खाऊन टाकेल.
                तो  विचार करतो आणि नावे मध्ये शेळीला घेऊन दुसऱ्या टोकाला सोडून येतो. वाघाला घेतो आणि दुसऱ्या टोकावर ती सोडून येतो आता तो आधी आपल्यासोबत परत या टोकावर घेऊन येतो व गवताला घेऊन जातो परत तो वापस येतो व शेळीला घेऊन जातो. अशी करून तो नदी सुखरूप पार करतो.

तात्पर्य : विचार करून काम केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही
                                                                                                                                               
📘 दिनांकानुसार पाढा :- ३० चा पाढा

                                  ३०           १८०
                                  ६०           २१०
                                  ९०           २४०
                                 १२०          २७०
                                 १५०          ३००

    🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆

                  📝 प्रश्नावली १९० 📝

 
प्रश्न १. महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर :- मुंबई

प्रश्न २. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण  ?
उत्तर :- प्रतिभाताई पाटील

प्रश्न ३. भारतीय संसदेची दोन सभागृहे कोणती ?
उत्तर :-  राज्यसभा आणि लोकसभा

प्रश्न ४. ‘जय जवान,जय किसान’ हा नारा कोणी दिला ?
उत्तर :-  लालबहादूर शास्त्री

प्रश्न ५. भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी कोण ?
उत्तर :- किरण बेदी

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏮️⏭️

👉आपल्या माहितीसाठी

🔰 विभ्याजतेच्या कसोट्या :- 👇

✅१ ची कसोटी
१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि  भागाकार तीच संख्या असते

✅२ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.


✅३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.

✅४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.

✅५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो

✅६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो

✅७ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

✅८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.

✅९ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.

✅१० ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते  त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.

✅११ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो.

✅१२ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो.

✅१४ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो.

✅१५ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो.

✅१८ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो.

✅२० ची कसोटी
ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो.

✅२१ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो.

✅२२ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो.


✅२४ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.

✅३० ची कसोटी :-
ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.

उदाहरणे
खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल
a. 3256     b. 46732     c. 98673     d. 53216
उत्तर :-
a. 3256, 3+2+5+6=16
b. 46732, 4+6+7+3+2=22
c. 98673, 9+8+6+7+3=33
33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल.


Share This Article