“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी.” प्रश्नावली 191

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
10 Min Read

       📖 वाचाल तर वाचाल 📖

   📘 आजचा परिपाठ 📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- १ ऑक्टोबर २०२४

🔊🔊 आजचा वार:- मंगळवार

📙📘सुविचार :-  आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा.

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍आजचा जागतिक दिन


🎗️वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस

आजचा दिनविशेष – घटना :

👉1949 : संगीत नाट्य गायक आणि अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वतःची मराठी रंगभूमी नाट्य संस्था स्थापन केली.
👉1958 : भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
👉1959 : भुवनेश प्रसाद सिन्हा यांनी भारताचे 6 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
👉1971 : रुग्णाचे निदान करण्यासाठी पहिले व्यावहारिक सीटी स्कॅनर वापरले जाते.
👉1982 : सोनीने पहिला कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर रिलीज केला.
👉1992 : कार्टून नेटवर्क सुरु झाले.


✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म

➡️1847 : ‘अ‍ॅनी बेझंट’ – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या यांचा जन्म. (मृत्यू : 20 सप्टेंबर 1933)
➡️1906 : ‘सचिन देव बर्मन’ – संगीतकार व गायक यांचा जन्म. (मृत्यू : 31 ऑक्टोबर 1975)
➡️1919 : ‘गजानन दिगंबर माडगूळकर’ – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 14 डिसेंबर 1977)
➡️1919 : ‘मजरुह सुलतानपुरी’ – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 24 मे 2000)
➡️1930 : ‘जयदेवप्पा हलप्पा पटेल’ – कर्नाटकचे 15 वे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 2000)
➡️1945 : ‘रामनाथ कोविंद’ – भारताचे 14 वे राष्ट्रपती यांचा जन्म.


✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

▶️1868 : ‘मोंगकुट (चौथा)’ – थायलंडचा राजा यांचे निधन. (जन्म : 18 ऑक्टोबर 1804)
▶️1931 : ‘शंकर काशिनाथ गर्गे’ – नाट्यछटाकार यांचे निधन. (जन्म : 18 जानेवारी 1889)
▶️1959 : ‘इरिको डी निकोला’ – इटलीचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 9 नोव्हेंबर 1877)
▶️1997 : ‘गुल मोहम्मद’ – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (22.1”) यांचे निधन.


🌍 जागतिक दिन लेख

              📝 वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस 📝

            वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश वृद्ध व्यक्तींच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांचे आरोग्य, सन्मान आणि अधिकार यांना प्रोत्साहन देणे आहे. वृद्ध व्यक्ती हे समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत, ज्यांनी त्यांच्या ज्ञान, अनुभव आणि योगदानाने आपली पिढी घडवली आहे.
            या दिवसाच्या निमित्ताने वृद्ध व्यक्तींच्या समस्या आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष वेधले जाते. त्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांचे आरोग्य चांगले राहावे, आणि त्यांना एकटेपणाचा सामना करावा लागू नये यासाठी समाजाने जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या गरजा, स्वातंत्र्य आणि सामाजिक सहभाग वाढविण्याबाबत विचारमंथन केले जाते.


======££££====££££====££££====££££== 

   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉  एका हाताने टाळी वाजत नाही – दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही .

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  अभय देणे – सुरक्षितपणाची हमी देणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 अग्नीची पूजा करणारा – अग्निपूजक

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                     🙏 प्रार्थना 🙏

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे……

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे              
                
                                                                                                                                                               
📘 दिनांकानुसार पाढा :- १ चा पाढा

                                  १           ६
                                  २           ७
                                  ३           ८
                                  ४            ९
                                  ५           १०

    🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎇🎆🎇🎆🎇🎆

            📝 प्रश्नावली १९१ 📝

 
प्रश्न १. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता ?
उत्तर :- गडचिरोली

प्रश्न २. महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता ?
उत्तर :- रत्नागिरी

प्रश्न ३. कोकण भागात —– प्रकारची मृदा आढळते ?
उत्तर :-  जांभी मृदा

प्रश्न ४. महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते ?
उत्तर :-  धुमाळवाडी

प्रश्न ५.पोर्ट ब्लेअर चे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे ?
उत्तर :- श्री विजय पुरम

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

👉 आपल्या माहितीसाठी.

📕भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

◆ कलम 2 – नवीन राज्यांची निर्मिती
◆ कलम 3 – राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

◆ कलम 14 – कायद्यापुढे समानता
◆ कलम 17 – अस्पृशता पाळणे गुन्हा
◆ कलम 18 – पदव्या संबंधी

◆ कलम 21-अ. – 6-14वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

◆ कलम 23 – मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

◆ कलम 32 – घटनात्मक उपायाचा अधिकार.

◆ कलम 40 – ग्रामपंचायतीची स्थापना
◆ कलम 44 – समान नागरी कायदा
◆ कलम 48 – पर्यावरणाचे सौरक्षण
◆ कलम 49 – राष्ट्रीय स्मारकाचे जतन
◆ कलम 50 – न्यायदान व शासन यंत्रणा अलग

◆ कलम 51 – आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

◆ कलम 52 – राष्ट्रपती पदाची निर्मिती
◆ कलम 53  – राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
◆ कलम 58 – राष्ट्रपती पदाच्या पात्रता

◆ कलम 59 – राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

◆ कलम 60 – राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
◆ कलम 61 – राष्ट्रापातीवरील महाभियोग
◆ कलम 63 – उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
◆ कलम 66 – उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
◆ कलम 67 – उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 71 – मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

◆ कलम 72  – राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

◆ कलम 74 – पंतप्रधान व मंत्रिमंडळ
◆ कलम 75 – मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

◆ कलम 76 – भारताचा महान्यायवादी
◆ कलम 77 – भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

◆ कलम 78 – राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

◆ कलम 79 – संसद
◆ कलम 80 – राज्यसभा
◆ कलम 80 – राष्ट्रपती 12 सभासद राज्यसभेचे निवडतील

◆ कलम 81 – लोकसभा
◆ कलम 85 – संसदेचे अधिवेशन
◆ कलम 97 – लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

◆ कलम 100 – राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

◆ कलम 101 – कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

◆ कलम 108 – संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

◆ कलम 110 – अर्थविधेयाकाची व्याख्या

◆ कलम 112 – वार्षिक अंदाज पत्रक
◆ कलम 123 – राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

◆ कलम 124 – सर्वोच न्यायालय
◆ कलम 129 – सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

◆ कलम 143 – राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

◆ कलम 148 – नियंत्रक व महालेखा परीक्षक

◆ कलम 153 – राज्यपालाची निवड
◆ कलम 154 – राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

◆ कलम 157  – राज्यपालाची पात्रता
◆ कलम 165 -अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

◆ कलम 169 – विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

◆ कलम 170 – विधानसभा
◆ कलम 279 – विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

◆ कलम 202 – घटक राज्याचे अंदाजपत्रक
◆ कलम 213 – राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

◆ कलम 214 – उच्च न्यायालय
◆ कलम 233 – जिल्हा न्यायालय
◆ कलम 241 – केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

◆ कलम 248 – संसदेचे शेशाधिकार
◆ कलम 262 – आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

◆ कलम 263 – राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

◆ कलम 280 – वित्तआयोग
◆ कलम 312 – अखिल भारतीय सेवा
◆ कलम 315 – केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

◆ कलम 324 – निवडणूक आयोग
◆ कलम 330 – लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

◆ कलम 343 – केंद्राची कार्यालयीन भाषा
◆ कलम 350 – अल्पसंख्यांक आयोग निर्मिती
◆ कलम 352 – राष्ट्रीय आणीबाणी
◆ कलम 356 – राज्य आणीबाणी
◆ कलम 360 – आर्थिक आणीबाणी
◆ कलम 368 – घटनादुरुस्ती
◆ कलम 371 – वैधानिक विकास मंडळे
◆ कलम 373 – प्रतिबंधात्मक स्थानबधता

Share This Article