“ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.” प्रश्नावली 203

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
9 Min Read

              📖 वाचाल तर वाचाल 📖

       📘आजचा परिपाठ📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- १७ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- गुरुवार

📙📘सुविचार :-  शांतता ही आत्म्याची भाषा आहे.

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन

🎗️ गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

1831 : मायकेल फॅराडे यांनी इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंडक्शनची गुणधर्म प्रायोगिकरित्या सिद्ध केली.
1888 : थॉमस एडिसनने ऑप्टिकल फोनोग्राफ (पहिली फिल्म) साठी पेटंट दाखल केले.
1917 : पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्ब हल्ला केला.
1934 : प्रभातचा अमृतमंथन हा चित्रपट पुण्यातील प्रभात सिनेमात प्रदर्शित झाला.
1943 : बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक रेल्वे पूर्ण झाली.
1956 : पहिला व्यावसायिक अणुऊर्जा प्रकल्प अधिकृतपणे इंग्लंडमध्ये सुरू झाला.
1979 : मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1994 : पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.
1996 : अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
1998 : आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्‍या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

1817 : ‘सर सय्यद अहमद खान’ – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते यांचा जन्म. (मृत्यू : 27 मार्च 1898)
1869 : ‘पं. भास्करबुवा बखले’ – गायनाचार्य, भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 8 एप्रिल 1922)
1892 : ‘नारायणराव सोपानराव बोरावके’ – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार यांचा जन्म. (मृत्यू : 16 फेब्रुवारी 1968)
1917 : ‘विश्वनाथ तात्यासाहेब कोरे’ – वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 1994)
1947 : ‘सिम्मी गरेवाल’ चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका यांचा जन्म.
1955 : ‘स्मिता पाटील’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 1986)
1965 : ‘अरविंद डिसिल्व्हा’ – श्रीलंकेचे क्रिकेटपटू यांचा जन्म.
1970 : ‘अनिल कुंबळे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
वरीलप्रमाणे आजचा दिनविशेष aajcha dinvishesh

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1772 : ‘अहमदशाह दुर्रानी (दुराणी)’ – अफगणिस्तानचे राज्यकर्ता यांचे निधन.
1882 : ‘दादोबा पांडुरंग तर्खडकर’ – इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक यांचे निधन. (जन्म : 9 मे 1814)
1887 : ‘गुस्ताव्ह किरचॉफ’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 12 मार्च 1824)
1906 : ‘स्वामी रामतीर्थ’ – जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी यांनी जलसमाधी घेतली. (जन्म : 22 ऑक्टोबर 1873)
1981 : ‘कन्नादासन’ – भारतीय लेखक, कवी आणि गीतकार यांचे निधन. (जन्म : 24 जून 1927)
1993 : ‘विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक यांचे निधन. (जन्म : 12 मे 1907)
2008 : ‘रविन्द्र पिंगे’ – ललित लेखक यांचे निधन. (जन्म : 13 मार्च 1926)

✒️✒️  जागतिक दिन लेख

              गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

           गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस हा दरवर्षी 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे जागतिक स्तरावर गरिबीच्या प्रश्नावर लक्ष वेधणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी उपाययोजना करण्याचे महत्त्व पटवून देणे.
गरिबी हा केवळ आर्थिक समस्यांचा विषय नसून त्यात आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या संधी, आणि माणसाचे जीवनमान यांचा समावेश असतो. जगातील अनेक लोक अद्याप अत्यंत गरिबीत जगत आहेत, आणि त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी मूलभूत साधने उपलब्ध नसतात.
2024 मध्ये या दिवसाची थीम “समता आणि समाजातील सर्वांचा समावेश” आहे. या अंतर्गत, सर्वसामान्य लोकांना गरिबीच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी शाश्वत विकास, समाजातील वंचित घटकांचा विकास आणि आर्थिक संधी निर्माण करणे यावर जोर दिला जातो.
या दिवसाच्या माध्यमातून गरिबी निर्मूलनाच्या दृष्टीने सरकारी धोरणे आणि जागतिक सहकार्य यांना प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे एक सुसंविधीत समाज घडवण्याचा प्रयत्न केला जातो.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 औटघटकेचे राज्य – अल्पकाळ टिकणारी गोष्ट

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉   संधान बांधने :- जवळीक निर्माण करणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 अंतकरणाला पाझर फोडणारे – ह्रदयद्रावक

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                     🙏 प्रार्थना 🙏

        या भारतात बंधुभाव नित्य बसू दे।

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।
दे वरचि असा दे॥धृ॥

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे।
मतभेद नसू दे॥१॥

सकलांस कळो मानवता, राष्ट्रभावना।
ही सर्व स्थळी मिळुनी समुदाय-प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथे दिसू दे॥२॥

जातीभाव विसरूनिया एक हो आम्ही।
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी।
खलनिंदका मनींही सत्य न्याय वसू दे॥३॥

सौंदर्य रमो घराघरा स्वर्गियापरी।
ही नष्ट होऊ दे विपत्ति भीतीबावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजि बसू दे॥४॥

📌 बोधकथा

एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्‍येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्‍से करून वाटत असत. एक हिस्‍सा स्‍वत:साठी व दुसरा हिस्‍सा ईश्‍वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्‍यांना चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्‍या ओट्यावर बसले. तेथे त्‍यांना एक संत भेटले. संताने त्‍यांना परिचय विचारला तर त्‍यांनी स्‍वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्‍हणाला, तुम्‍ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्‍ही विचार केला आहे? चोर म्‍हणाले,” आम्‍ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्‍ही जे धन किंवा वस्‍तू प्राप्‍त करतो ते आम्‍ही दोन भागांमध्‍ये वाटतो. एक भाग आम्‍ही स्‍वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो. तेव्‍हा त्‍या संताने आपल्‍या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्‍यांना देत म्‍हणाला,” आज तुम्‍ही चोरी करू श्‍कला नाहीत त्‍यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्‍से करा एक स्‍वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्‍वरचरणी ठेवा.” दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले संतांच्‍या बोलण्‍याचा आशय समजून म्‍हणाले,”महाराज इथून पुढे आम्‍ही चोरी न करता कष्‍टाची कमाई करून खाऊ आणि त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवू.” दोघेही संताला नमस्‍कार करून निघून गेले.

तात्‍पर्य :-पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्‍टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्‍म्‍याला सुख देते.

                
📘 दिनांकानुसार पाढा :- १७ चा पाढा

                                 १७           १०२
                                 ३४           ११९
                                 ५१           १३६
                                 ६८           १५३
                                 ८५           १७०

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

                 📝 प्रश्नावली २०३ 📝

प्रश्न १. अशोक स्तंभ कोठे आहे ?
उत्तर – सारनाथ
—————————————–
प्रश्न २. भूदान चळवळ कोणी सुरू केली  ?
उत्तर – विनोबा भावे
—————————————–
प्रश्न ३. बॉम्बे – ठाणे ही रेल्वे कधी सुरू झाली ?
उत्तर – 1853
—————————————–
प्रश्न ४. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
उत्तर – इचलकरंजी
—————————————–
प्रश्न ५.   मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तर –  गीतारहस्य
—————————————–

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

👉 आपल्या माहितीसाठी.

आतापर्यंत चे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री

➡️ महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या बद्दल माहिती
⭐️महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री – शरद पवार (38 वर्षे)
⭐️महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री – वसंतराव नाईक ( 11 वर्षे 78 दिवस)
⭐️महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस (5 दिवस)
⭐️महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री – शरद पवार ( 4 वेळा)
⭐️महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री – आतापर्यंत नाहीत
⭐️काँग्रेस चे पाहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
⭐️शिवसेनेचे पाहिले मुख्यमंत्री – मनोहर जोशी
⭐️भाजपा चे पाहिले मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

➡️ महाराष्ट्रातील काही पक्ष आणि स्थपणा
◾️काँग्रेस – 28 डिसेंबर 1885
◾️शिवसेना – 19 जून 1966
◾️भाजपा – 6 एप्रिल 1980
◾️राष्ट्रवादी काँग्रेस स्थपणा – 10 जून 1999

➡️ महाराष्ट्रात 3 राष्ट्रपती राजवट लागली आहे
🚩पहिली  : 17 फेब्रुवारी – 08 जून 1980
🚩 दुसरी    : 28 सप्टें ते 30 ऑक्टोबर 2014
🚩 तिसरी  : 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019

➡️ हे पण पाहून घ्या
◾️आता होणारी निवणूक – 15 वी विधानसभा आहे
◾️एकनाथ शिंदे – 20 वे मुख्यमंत्री आहेत
◾️सीपी राधाकृष्णन – महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल
◾️महाराष्ट्र लोकसभा जागा – 48 जागा
◾️महाराष्ट्र विधानसभा जागा – 288 जागा
◾️महाराष्ट्र विधानपरिषद जागा – 78 जागा
◾️एकनाथ शिंदेंनी – 30 जून 2022 ला शपथ घेतली होती


Share This Article