📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- १९ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- शनिवार
📙📘सुविचार :- दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.
📙📘📙 दिनविशेष
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना :
1956 : सोव्हिएत युनियन आणि जपानने संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली, ऑगस्ट 1945 पासून अस्तित्त्वात असलेल्या दोन देशांमधील युद्धाची स्थिती अधिकृतपणे समाप्त केली.
1970 : भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाई दलाला देण्यात आले.
1993 : पुण्याजवळील महारेडिओ टेलिस्कोप, GMRT प्रकल्पाचे संस्थापक आणि शास्त्रज्ञ, प्रा. गोविंद स्वरूप यांना सर सी. व्ही. रमण पदक जाहीर.
1994 : रुद्र वीणा वादक उस्ताद असद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्काराने सन्मानित केले.
2000 : पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्य सरकारच्या गीत सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
1902 : ‘दिवाकर कृष्ण केळकर’ – कथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 31 मे 1973 – हैदराबाद, आंध्र प्रदेश)
1910 : ‘सुब्रमण्यन चंद्रशेखर’ – तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी 1983 मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 1995)
1920 : ‘पांडुरंगशास्त्री आठवले’ – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 2003)
1922 : ‘शांता शेळके’ – मराठी कवी आणि लेखक यांचा जन्म.
1925 : ‘डॉ. वामन दत्तात्रय वर्तक’ – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 2001)
1936 : ‘शांताराम नांदगावकर’ – गीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 11 जुलै 2009)
1954 : ‘प्रिया तेंडुलकर’ – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या यांचा जन्म. (मृत्यू : 19 सप्टेंबर 2002)
1961 : ‘सनी देओल’ – अभिनेते यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1934 : ‘विश्वनाथ कार’ – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1864)
1937 : ‘अर्नेस्ट रुदरफोर्ड’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1871)
1950 : ‘विष्णू गंगाधर केतकर’ – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 9 एप्रिल 1887)
1995 : ‘सलमा बेग ऊर्फ कुमारी नाझ’ – बाल कलाकार व अभिनेत्री यांचे निधन.
2011 : ‘कक्कणदन’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1935)
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 दुभत्या गाईच्या लाथा गोड – ज्याच्या पासून काही लाभ होतो, त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 हात टेकणे – नाइलाज झाल्याने माघार घेणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 किल्ल्यांच्या भोवती बांधलेली भिंत – तटबंदी
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
ए मलिक तेरे बंदे हम
ऐ मालिक तेरे बन्दे हम…. ऐसे हों हमारे करम….. नेकी पर चले और बदी से ले,…… ताकी हँसते हुए निकले दम……. ऐ मालिक तेरे बंदे हम…….
ये अंधेरा घना छा रहा, तेरा इंसान घबरा रहा। हो रहा बेख़बर, कुछ ना आता नज़र, सुख का सूरज छिपा जा रहा। है तेरी रोशनी में जो दम, वो अमावस को कर दे पूनम। नेकी पर चले और वती से टले, ताकी हँसते हुए निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम……….
बड़ा कमज़ोर है आदमी, अभी लाखों हैं इस में कमी। पर तू जो खड़ा, है दयालु बड़ा, तेरी कृपा से धरती थमी। दिया तूने हमें जब जनम, तू ही ले लेगा हम सब के ग़म। नेकी पर चले और वती से टले, ताकी हँसते हुए निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम……..
जब जुल्मों का हो सामना, तब तू ही हमें थामना। वो बुराई करें, हम भलाई करे, न ही बदले की हो भावना। बढ़ उठे प्यार का हर कदम, और मिठे बैर का ये भरम।
नेकी पर चले और बदी से टले, ताकी हँसते हुये निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम…. ..
🔊 बोधकथा 🔊
वेळेचे महत्त्व
एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.’ हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.
तात्पर्य – जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.
📘 दिनांकानुसार पाढा :- १९ चा पाढा
१९ ११४
३८ १३३
५७ १५२
७६ १७१
९५ १९०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝 प्रश्नावली २०५ 📝
प्रश्न १. पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेने फिरतो ?
उत्तर – पश्चिमेकडून पूर्वेकडे
—————————————–
प्रश्न २. पृथ्वीचे संरक्षक कवच कशाला म्हणतात ?
उत्तर – ओझोन थर
—————————————–
प्रश्न ३. एकपेशीय प्राणी कोणकोणते आहेत ?
उत्तर – अमिबा आणि पॅरामेशियम
—————————————–
प्रश्न ४. पदार्थाच्या पाण्यात विरघळण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
उत्तर – विद्रव्यता
—————————————–
प्रश्न ५. आयोडीनच्या अभावामुळे कोणता विकार होतो ?
उत्तर – गलगंड
—————————————–
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
👉 आपल्या माहितीसाठी.
◾️वंगभंग आंदोलन(स्वदेशी आंदोलन) – 16 ऑक्टोबर 1905 मध्ये
◾️मस्लिम लीग स्थपणा – 30 डिसेंबर 1906
◾️काँग्रेस मध्ये फूट – 1907 मध्ये (जहाल-मवाळ सुरत)
◾️होमरूल चळवळ – 1916 मध्ये
◾️लखनौ करार – डिसेंबर 1916
◾️मॉंटेग्यू घोषणा – 20 ऑगस्ट 1917
◾️खिलाफत चळवळ – 1919 मध्ये
◾️जलीयनवाला बाग हत्याकांड – 13 एप्रिल 1919
◾️रौलेट कायदा – 19 मार्च 1919
◾️हटर कमिटी ची रिपोर्ट प्रकाशित -26 मे 1920
◾️कांग्रेस चे नागपुर अधिवेशन – डिसेंबर 1920
◾️असहकार आंदोलनाची सुरवात – 1 ऑगस्ट 1920
◾️चौरी-चौरा घटना – 4 फेब्रुवारी 1922
◾️स्वराज्य पार्टी ची स्थापना – 1 जानेवारी 1923
◾️हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन – ऑक्टोबर 1924
◾️साइमन कमीशन ची स्थपणा – 8 नोव्हेंबर 1927
◾️साइमन कमीशन भारतात आले – 3 फेब्रुवारी 1928
◾️नेहरू रिपोर्ट – 15 ऑगस्ट 1928
◾️बारडोली सत्याग्रह (वल्लभभाई पटेल) – 12 जून 1928
◾️लाहोर पड्यंत्र केस – 1929
◾️कांग्रेस चे लाहोर अधिवेशन – डिसेंबर 1929
◾️पूर्ण स्वराज्य ठराव – 26 जानेवारी 1930
◾️मीठ सत्याग्रह – 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930
◾️सविनय कायदेभंग चळवळ – 6 एप्रिल 1930
◾️पहिली गोलमेज परिषद – 12 नोव्हेंबर 1930
◾️गांधी-आयर्विन करार – 5 मार्च 1931
◾️भगतसिंग ,राजगुरू ,सुखदेव फाशी – 23 मार्च 1931
◾️दुसरी गोलमेज परिषद – 7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931
◾️जातीय निवडा (रॅमसे मॅकडोनाल्ड) – 16 ऑगस्ट 1932
◾️पुणे करार -24 सप्टेंबर 1932
◾️तिसरी गोलमेज परिषद – 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 1932
◾️काँग्रेस सोशलिस्ट पार्टी ची स्थपणा – मे 1934
◾️फॉरवर्ड ब्लाक ची स्थपणा – 3 मे 1939
◾️मक्ति दिवस (मुस्लिम लीग) – 22 डिसेंबर 1939
◾️पाकिस्तान ची मागणी – 24 मार्च 1940
◾️ऑगस्ट घोषणा – 8 ऑगस्ट 1940
◾️भारत छोड़ो प्रस्ताव – 8 ऑगस्ट 1942
◾️क्रिप्स मिशन प्रस्ताव -22 मार्च 1942
◾️शिमला संम्मेलन – 25 जून 1945
◾️नौदल उठाव – 18 फेब्रुवारी 1946
◾️कॅबिनेट मिशन चे आगमन – 24 मार्च 1946
◾️प्रत्यक्ष कार्यवाही दिवस – 16 ऑगस्ट 1946
◾️अंतरिम सरकार ची स्थापना – 2 सप्टेंबर 1946
◾️प्रधानमंत्री ऍटली यांची घोषणा – 20 फेब्रुवारी 1947 (30 जून 1948 पर्यंत इंग्रज जाणार अशी)
◾️माउंटबॅटन योजना – 3 जून 1947
◾️भारत स्वतंत्रता कायदा – 18 जुलै 1947
◾️भारत स्वतंत्र झाला – 15 ऑगस्ट 1947🇮🇳