परिपाठ,प्रश्नावली,सामान्य ज्ञान,मराठी भाषा विकास.
📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २६ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- शनिवार
📙📘सुविचार :-स्वतः साठी सुंदर घर बनवणे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते ! मात्र एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते !
📙📘📙 दिनविशेष
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
1863 : लंडनमध्ये जगातील सर्वात जुनी फुटबॉल संघटना सुरू झाली.
1936 : हूवर धरणातील पहिले विद्युत जनरेटर पूर्णपणे कार्यान्वित झाले.
1947 : जम्मू-काश्मीर राज्य भारतात विलीन झाले.
1962 : ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
1994 : जॉर्डन आणि इस्रायलमध्ये शांतता करार.
1999 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
2003 : सीडर फायर, कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील तिसरी सर्वात मोठी वणवा, 15 लोकांचा मृत्यू झाला, 250,000 एकर खाक झाला आणि सॅन दिएगोच्या आसपास 2,200 घरे नष्ट झाली.
2006 : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण प्रतिबंधक नियम लागू झाले.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
1270 : ‘संत नामदेव’ – यांचा जन्म. (मृत्यू : 3 जुलै 1350)
1855 : ‘गोवर्धनराम त्रिपाठी’ – गुजराती कादंबरीकार यांचा जन्म.
1890 : ‘गणेश शंकर विद्यार्थी’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मार्च 1931)
1891 : ‘वैकुंठ मेहता’ – सहकारी चळवळीचे प्रवर्तक यांचा जन्म. (मृत्यू : 27 ऑक्टोबर 1964)
1900 : ‘इर्झा मीर’ – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक यांचा जन्म. (मृत्यू : 7 मार्च 1993)
1916 : ‘फ्रान्सवाँ मित्राँ’ – फ्रान्सचे 21 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 8 जानेवारी 1996)
1919 : ‘मोहम्मद रझा पेहलवी’ – शाह ऑफ इराण यांचा जन्म. (मृत्यू : 27 जुलै 1980)
1937 : ‘हृदयनाथ मंगेशकर’ – संगीतकार व गायक यांचा जन्म.
1947 : ‘हिलरी क्लिंटन’ – अमेरिकेच्या 67 व्या परराष्ट्रमंत्री यांचा जन्म.
1954 : ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ – नाट्य आणि चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 16 डिसेंबर 2004)
1963 : ‘नवज्योत सिंग सिद्धू’ – भारतीय राजकारणी व माजी भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
1974 : ‘रवीना टंडन’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
1978 : ‘वीरेंद्र सेहवाग’ – माजी भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1909 : ‘इटो हिरोबुमी’ – जपानचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 16 ऑक्टोबर 1841)
1930 : ‘डॉ. वाल्डेमर हाफकिन’ – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 मार्च 1860)
1979 : ‘चंदूलाल नगीनदास वकील’ – अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन.
1991 : ‘अनंत काशिनाथ भालेराव’ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक यांचे निधन. (जन्म : 14 नोव्हेंबर 1919)
1999 : ‘एकनाथ इशारानन’ – भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1910)
2023 : ‘बाबा महाराज सातारकर’ – कीर्तनकार यांचे निधन.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 एका माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 फाटे फोडणे – उगाच अडचणी निर्माण करणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक.
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
या लाडक्या मुलांनो
या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार ।
नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार ॥धृ।।
आईस देव माना, वंदा गुरुजनांना।
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा ।
गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥१॥
शिवबापरी जगांत, दिलदार थोर व्हावे।
टिळकापरी सदैव, ध्येयास त्या स्मरावें।
जे चांगलें जगी या, त्याचा करा स्वीकार।।२।।
शाळेत रोज जाता, ते ज्ञान-बिंदु मिळवा।
हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा।
कुलशील थोर माना, ठेवू नका विकार ॥३॥
📖 बोधकथा 📖
आत्मसात करा
एक दिवस शाळेला सुट्टी असल्याची घोषणा गुरूजींनी केली म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडीलाच्या दुकानवर गेला. तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडीलाच्या कामाच निरीक्षण करु लागला. त्याने पाहीले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबुन ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचुन ठेवायचे. जेव्हा त्याने चार पाच वेळा हे पाहीले तेव्हा आश्चर्याने त्याने वडीलांना एक गोष्ट विचारु का असे म्हटले वडीलानी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा ही कपडा कापता तेंव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेंव्हा कपडा शिवता तेंव्हा सुई टोपीला लावता. असं का? याचे उत्तर त्याच्या वडीलांनी दोन ओळीत दिले त्यात पूर्ण जीवनाचे सार सांगितले ते म्हणाले “बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते कापणा-याची जागा नेहमी खाली असते तर जोडणा-याची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो.
तात्पर्य ::~जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा कैचीसारखे तोडण्याचे नाही. आज त्याचे डोळे उघडले व जीवनाचा खरा अर्थ कळला.
📘 दिनांकानुसार पाढा :- २६ चा पाढा
२६ १५६
५२ १८२
७८ २०८
१०४ २३४
१३० २६०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝 प्रश्नावली 📝
प्रश्न १. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो ?
उत्तर :- नाथसागर
प्रश्न २. कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गावीलगढच्या डोंगरात आहे ?
उत्तर :- चिखलदरा.
प्रश्न ३. मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे ?
उत्तर :- पुणे
प्रश्न ४. महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येते ?
उत्तर :- चंद्रपूर
प्रश्न ५. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत ?
उत्तर :- सोलापूर
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️
👉 आपल्या माहितीसाठी.
http://shankarchaure.blogspot.com/2022/01/blog-post_21.html
🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲
लेखन :- शंकर चौरे सर
🛑व्यावहारिक परिमाणे🛑
✍️गणितातील काही महत्वाची एकके
❗१ मिनिट = ६० सेकंद
❗️१ तास = ६० मिनिटे
❗️ २४ तास = १ दिवस
❗️पाव तास =१५ मिनिटे
❗️अर्धा तास =३० मिनिटे
❗️पाऊण तास= ४५ मिनिटे
❗️७ दिवस = १ आठवडा
❗️३० दिवस = १ महिना
❗️३६५ दिवस =१ वर्ष
❗️१० वर्ष = १ दशक
❗️अर्धवर्ष = ६ महिने
❗️पाव वर्ष = ३ महिने
❗️१ वाजून ३० मिनिटे = दीड वा.
❗️२ वाजून ३० मिनिटे = अडीच वा.
❗️एकशे =१००
❗️अर्धाशे =५०
❗️पावशे =२५
❗️पाऊणशे =७५
❗️सव्वाशे =१२५
❗️दीडशे = १५०
❗️अडीचशे =२५०
❗️साडेतीनशे = ३५०
❗️१ डझन = १२ वस्तू
❗️अर्धा डझन = ६ वस्तू
❗️पाव डझन = ३ वस्तू
❗️पाऊण डझन =९ वस्तू
❗️२४ कागद = १ दस्ता
❗️२० दस्ते=१ रीम
❗️४८० कागद = १ रीम
❗️१ एकर= ४००० चौ. मी.
❗️१ मीटर= १०० सेमी
❗️अर्धा मीटर= ५० सेमी
❗️पाव मीटर = २५ सेमी
❗️पाऊण मीटर = ७५ सेमी
❗️१ लीटर = १००० मिली
❗️अर्धा लीटर= ५०० मिली
❗️पाव लीटर = २५० मिली
❗️पाऊण लीटर = ७५० मिली
❗️१ किलोग्रॅम = १००० ग्रॅम
❗️अर्धा किलोग्रॅम = ५०० ग्रॅम
❗️पाव किलोग्रॅम = २५० ग्रॅम
❗️पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रॅम
❗️१ किलोमीटर = १००० मी
❗️अर्धा किमी = ५०० मीटर
❗️पाव किमी = २५० मीटर
❗️पाऊण किमी = ७५० मीटर
❗️१ हजार = १०००
❗️अर्धा हजार = ५००
❗️पाव हजार =२५०
❗️पाऊण हजार = ७५०
❗️१२ इंच =१ फूट
❗️१ क्विंटल =१०० किलोग्रॅम
❗️अर्धा क्विंटल =५० किलोग्रॅम
❗️पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
❗️पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
❗️१ टन= १० क्विंटल
👉१ टन= १००० किलोग्रॅम