! वाचाल तर वाचाल !
नमस्कार मित्रांनो,शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील द्वितीय सत्राची सुरुवात आज होत आहे आणि आज पासून आपल्यासाठी नवीन उपक्रम घेऊन येत आहे.“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत परिपाठामध्ये विचारण्यासाठी सामान्य ज्ञानाचे पाच प्रश्न आपल्याला मिळतील.
दिनांक – 28 नोव्हेंबर 2023.
आजचा सुविचार – “नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.”
दिनविशेष – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती.(28 नोव्हेंबर 1989)
! प्रश्नावली क्रमांक -१ !
प्रश्न 1-महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणाला ओळखतात?
उत्तर – तुकडोजी महाराज.
प्रश्न 2 – दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणती नदी
ओळखली जाते?
उत्तर – गोदावरी.
प्रश्न 3 – मिठाच्या सत्याग्रहाचे (दांडी यात्रा) नेतृत्व कोणी केले?
उत्तर – महात्मा गांधी.
प्रश्न 4 – भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर – डॉ.राजेंद्रप्रसाद.
प्रश्न 5 – “अग्निपंख” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर – डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम.