“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी” .प्रश्नावली ११९.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
3 Min Read

                📖वाचाल तर वाचाल 📖

🚩 परीपाठ

आज दिनांक:- २७ जून २०२४.
वार :- गुरुवार
सुविचार :- समस्या तुम्हाला कमकुवत नाही तर मजबूत बनवायला येतात.
             
                🛑 दिनविशेष 🛑

👉हेलन केलर दिन
👉हा या वर्षातील १७८ वा (लीप वर्षातील १७९ वा) दिवस आहे.

  📌📌महत्त्वाच्या घटना
●१९९६ : अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर
●१९९१ : युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
●१९५४ : अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र रशियात सुरू झाले.

  📌📌जन्मदिवस / जयंती
➡️१९३९ : राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार
➡️१८८० : हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका
👉१८७५ : दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’
👉१८६४ : शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार
👉१८३८ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली.

    📌📌मृत्यू / पुण्यतिथी

▶️२००८ : फील्ड मार्शल सॅम माणेकशा
▶️२००० : द. न. गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार
▶️१९९८ : होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार
▶️१८३९ : महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक
▶️१७०८ : धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती

           🛑 प्रश्नावली ११९ 🛑



प्रश्न १.हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
उत्तर :- ‘ड’ जीवनसत्व.

प्रश्न २. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर :- हॉकी.

प्रश्न ३. रिश्टर (Richter) हे काय मोजण्याचे एकक आहे ?
उत्तर :- भूकंप.

प्रश्न ४.भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर :- वाघ.

प्रश्न ५. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर :- ८ मार्च.

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉 आपल्या माहितीसाठी.

🔖शोध आणि त्यांचे संशोधक 🚔🚔

✍️ देवीची लस – जेन्नर
✍️ अंधांसाठी लिपी – ब्रेल लुईस
✍️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

✍️ इलेक्ट्रोन – थॉमसन
✍️हायड्रोजन – हेन्री कॅवेनडिश
✍️ न्यूट्रोन – चॅडविक

✍️ विमान – राईट बंधू
✍️ डिझेल इंजिन – रुडाल्फ डिझेल
✍️ रडार – टेलर व यंग

✍️ रेडिओ – जी. मार्कोनी
✍️ वाफेचे इंजिन – जेम्स वॅट
✍️ थर्मामीटर – गॅलिलीयो
✍️ हेलीकॉप्टर – सिकोर्स्की

✍️ विजेचा दिवा – एडिसन
✍️ रेफ्रीजरेटर – पार्किन्स
✍️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

✍️ डायनामाइट – आल्फ्रेड नोबेल
✍️ रेडियम – मेरी क्युरी व पेरी क्युरी
✍️ टेलिफोन – आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

✍️ ग्रामोफोन – एडिसन
✍️ टेलिव्हिजन – जॉन बेअर्ड
✍️ पेनिसिलिन – आलेक्सांडर फ्लेमिंग
✍️ उत्क्रांतिवाद – डार्विन
✍️ भूमिती – युक्लीड


✍️ आगकाड्याची पेटी – जॉन वॉकर
✍️ विद्युतजनक यंत्र – मायकेल फॅरेडे
✍️ कॉम्पुटर – वॅने बूश व शॉल
✍️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन


Share This Article