“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी”. प्रश्नावली १२५.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
4 Min Read

                     📖 वाचाल तर वाचाल 📖

👉थोडक्यात परिपाठ .

आज दिनांक:- ०४ जुलै २०२४
आजचा वर :- गुरुवार
सुविचार :- विजेते इतर कोणत्याही प्रकारे गोष्टी करत नाहीत, ते सर्व काही वेगळ्या पद्धतीने करतात.

🛑 दिनविशेष


👉अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन
👉संत मुक्ताबाई स्मृतीदिन

    🛑महत्त्वाच्या घटना
●१९९९ : लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील ’टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.
●१९९७ : ’नासा’चे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.
●१९४७ : ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत‘ व ‘पाकिस्तान‘ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.
●१९११ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ

   🛑जन्मदिवस / जयंती
◆१९२६ : विनायक आदिनाथ तथा ’वि. आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक
◆१९१२ : पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
◆१८९८ : गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते
◆१७९० : भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट

      🛑मृत्यू / पुण्यतिथी

●१९९९ : वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित
●१९६३ : पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार
●१९३४ : मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
●१९०२ : *स्वामी विवेकानंद–भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार करणारे तत्त्वज्ञ*

📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

                🛑 प्रश्नावली १२५ 🛑

प्रश्न १. भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क किती वर्षे वय पूर्ण झाल्यावर प्राप्त होतो ?
उत्तर:- १८ वर्ष.

प्रश्न २. लोकसभेत महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून जातात ?
उत्तर :- ४८.

प्रश्न ३. राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य निवडले जातात ?
उत्तर :- १९.

प्रश्न ४. प्रधानमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
उत्तर :- राष्ट्रपती.

प्रश्न ५. राज्यसभेचे  सभापती कोण असतात ?
उत्तर :- उपराष्ट्रपती.

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

👉 आपल्या माहितीसाठी.

✅ भारताची सामान्य माहिती

• भारताची राजधानी : दिल्ली
• भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन

• भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते
• राष्ट्रीय गीत : वंदेमातरम

• ‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर

• राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी

• भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा

• राष्ट्रीय फळ : आंबा
• राष्ट्रीय फूल : कमळ

• भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर
• भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ

• भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ
• भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार

• भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान

• भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)

🔴 महत्वाचे आहे लक्षात ठेवा 🔴

◾भारतातील पहिले पुस्तकांचे गाव – भिलार (जिल्हा सातारा)

◾भारतातील पहिले वृत्तपत्र – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०)

◾भारतातील पहिले हरित शहर ? – आगरतला (त्रिपुरा)

◾भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र – मुंबई (१९२७)

◾भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली

◾भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)

◾भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली

◾भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

◾भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर

◾भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश

◾भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता (Bharatatil pahile nyayalay )

◾भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली

◾भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश

◾भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे

◾भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई

◾भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)

◾भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश
◾भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)


Share This Article