“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी”. प्रश्नावली १२६.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
3 Min Read

                 📋 वाचाल तर वाचाल 📋

📖 परिपाठ

आज दिनांक :- ०५ जुलै २०२४
आज वार:- शुक्रवार
सुविचार :- चांगले संभाषण व चांगली संगत हेच आपले सदगुण समजा.

              ❂ दिनविशेष ❂*
★महाकवी कालिदास दिन
★हा या वर्षातील १८६ वा (लीप वर्षातील १८७ वा) दिवस आहे.

📌महत्त्वाच्या घटना

👉१९९६ : संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर
👉१९७५ : ’देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्‍चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
👉१९५४ : आंध्रप्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना

  🛑 जन्मदिवस / जयंती

➡️१९४६ : राम विलास पासवान – केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष
➡️१९२५ : नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल
➡️१९२० : आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक
➡️१९१६ : के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक

  📌मृत्यू / पुण्यतिथी
▶️२००५ : बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज
▶️१९९६ : चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ’बाबूराव अर्नाळकर’ – रहस्यकथाकार
▶️१८२६ : सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी

↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️

               🛑 प्रश्नावली १२६ 🛑

                    प्रश्नावली १२५

प्रश्न १. गलगंड आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
उत्तर :- आयोडीन.

प्रश्न २. नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे ?
उत्तर :- कोलकाता.

प्रश्न ३. रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय आहे ?
उत्तर :- गुरूदेव.

प्रश्न ४. शुद्ध सोने किती कॅरेटचे असते ?
उत्तर :- २४ कॅरेट.

प्रश्न ५. प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?
उत्तर :- मदुराई.(तामिळनाडू)

🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

👉 आपल्या माहितीसाठी.

काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :-

👉 भारताचे प्रवेशद्वार
— मुंबई

👉 भारताची आर्थिक राजधानी
— मुंबई

👉 महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा      
—  मुंबई शहर

👉 महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार
— रायगड

👉 महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा
— रायगड

👉 मुंबईची परसबाग
— नाशिक

👉 महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
— रत्नागिरी

👉 मुंबईचा गवळीवाडा
— नाशिक

👉 द्राक्षांचा जिल्हा
—  नाशिक

👉 आदिवासींचा जिल्हा
— नंदूरबार

👉 महाराष्ट्रातील कापसाचे शेत
— जळगाव

👉 महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा
— यवतमाळ

👉 संत्र्याचा जिल्हा
— नागपूर

👉 महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ
— अमरावती

👉 जंगलांचा जिल्हा
— गडचिरोली

👉 महाराष्ट्रातील केळीच्या बागा
— जळगाव

👉 साखर कारखान्यांचा जिल्हा
— अहिल्यानगर

👉 महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार
—  सोलापूर

👉 महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा
— कोल्हापूर

👉 कुस्तीगिरांचा जिल्हा
— कोल्हापूर

👉 लेण्यांचा जिल्हा
–छत्रपती संभाजी नगर

👉 महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
—  छत्रपती संभाजी नगर

👉 महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा
— बीड जिल्हा

👉 महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
— उस्मानाबाद

👉 महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
— नांदेड

👉 देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
 —  अमरावती

Share This Article