“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी”. प्रश्नावली १२७.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
7 Min Read

                  📖 वाचाल तर वाचाल 📖

🛑 परिपाठ


आज दिनांक :- ०६ जुलै २०२४
आजचा वार:- शनिवार.
सुविचार :-  ” सल्ला घ्यायचा तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या, कारण यशस्वी काय करायचं आहे ते सांगतो आणि अयशस्वी काय करू नये ते सांगतो”.

🛑  दिनविशेष
★हा या वर्षातील १८७ वा (लीप वर्षातील १८८ वा) दिवस आहे.

    🕐 महत्त्वाच्या घटना

▶️२००६ : चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ’नाथू ला’ ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
▶️१९४७ : रशियात ए के ४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरूवात झाली.
▶️१८९२ : ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.
▶️१७८५ : ’डॉलर’ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित होते.

   🕐 जन्मदिवस / जयंती

➡️१९३० : डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)
➡️१९२० : डॉ. विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, ’इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले
➡️१९०१ : डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक
➡️१८८१ : संत गुलाबराव महाराज 

  🕐 मृत्यू / पुण्यतिथी

👉२००२ : धीरुभाई अंबानी – उद्योगपती
👉१९९९ : एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज
👉१९९७ : चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
👉१९८६ : ’बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान .

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

                🛑 प्रश्नावली १२७ 🛑

प्रश्न १. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर :- १७ सप्टेंबर.

प्रश्न २. नोबल पुरस्कार दरवर्षी किती तारखेला दिला जातो ?
उत्तर :- १० डिसेंबर.

प्रश्न ३. “सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा” या गीताचे लेखक कोण आहेत ?
उत्तर :- मोहम्मद इकबाल.

प्रश्न ४. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला ?
उत्तर :- प्रवरानगर.

प्रश्न ५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते ?
उत्तर :- बहिर्जी नाईक.

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

👉 आपल्या माहितीसाठी.

🔰 विभ्याजतेच्या कसोट्या :- 👇

✅१ ची कसोटी
१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि  भागाकार तीच संख्या असते

✅२ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.


✅३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.

✅४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.

✅५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो

✅६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो

✅७ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

✅८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.

✅९ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.

✅१० ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते  त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.

✅११ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो.

✅१२ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो.

✅१४ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो.

✅१५ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो.

✅१८ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो.

✅२० ची कसोटी
ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो.

✅२१ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो.

✅२२ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो.


✅२४ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.

✅३० ची कसोटी :-
ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.

उदाहरणे
खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल
a. 3256     b. 46732     c. 98673     d. 53216
उत्तर :-
a. 3256, 3+2+5+6=16
b. 46732, 4+6+7+3+2=22
c. 98673, 9+8+6+7+3=33
33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल.

Share This Article