📖 वाचाल तर वाचाल 📖
📝📝आजचा परिपाठ📝📝
🎗️ आज दिनांक :- ११ जुलै २०२४
👉 आजचा वार :- गुरुवार
👉 सुविचार :- आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये;
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
🚩🚩 दिनविशेष
🌍🌍 आजचा जागतिक दिन :
➡️जागतिक लोकसंख्या दिवस
➡️आंतरराष्ट्रीय आवश्यक तेल दिन
🕐🕐आजच्या महत्वाच्या घटना :
👉1659 : शिवाजी राजे राजगड सोडून अफझलखानाशी लढण्यासाठी प्रतापगडावर पोहोचले.
👉1801 : धूमकेतू पोहनचा शोध फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॉन लुईस पोहन यांनी लावला.
👉1804 : अमेरिकेचे उपाध्यक्ष ॲरॉन बुर यांनी कोषागार सचिव अलेक्झांडर हॅमिल्टन यांना द्वंद्वयुद्धात ठार मारले.
👉1889 : मेक्सिकोतील तिजुआना शहराची स्थापना.
👉1893 : कोकिची मिकीमोटो, एक जपानी उद्योजक होता ज्यांना पहिले सदभिरुची असलेला मोती तयार करण्याचे श्रेय दिले जाते आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मोती उद्योगाची सुरुवात करून मोती उद्योगाची स्थापना केली.
👉1908 : मंडाले येथे लोकमान्य टिळकांना 6 वर्षांची शिक्षा झाली.
👉1919 : नेदरलँडमध्ये कामगारांसाठी आठ तासांचा दिवस आणि रविवारची सुट्टी लागू करण्यात आली.
मंगोलियाला चीनपासून स्वातंत्र्य मिळाले.
👉1950 : पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा (IMF) सदस्य झाला.
👉1955 : अमेरिकेने चलनावर “देवावर आमचा विश्वास आहे” असे छापण्याचे ठरवले.
👉1971 : चिलीच्या तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
👉1979 : अमेरिकेचे पहिले स्पेस स्टेशन स्कायलॅब हिंद महासागरावरील पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर नष्ट झाले.
👉1989 : जागतिक लोकसंख्या दिन सुरू झाला.
👉1994 : पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार.
👉2001 : आगरतळा आणि ढाका दरम्यान बससेवा सुरू झाली.
👉2006 : मुंबईतील उपनगरीय रेल्वे बॉम्बस्फोटात 209 ठार आणि 714 जखमी.
👉2021 : रिचर्ड ब्रॅन्सन – त्याच्या व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळयानातून अंतराळात प्रवास करणारे पहिले नागरिक बनले.
🕐🕐 जन्म
▶️1889 : ‘नारायणहरी आपटे’ – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 14 नोव्हेंबर 1971)
▶️1891 : ‘परशुराम कृष्णा गोडे’ – प्राच्यविद्या संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 28 मे 1961)
▶️1921 : ‘शंकरराव खरात’ – दलित साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 9 एप्रिल 2001)
↔️1923 : ‘उमा देवी’ – भारतीय पार्श्वगायिका आणि विनोदी अभिनेत्री यांचा जन्म.
▶️1934 : ‘जियोर्जियो अरमानी’ – जियोर्जियो अरमानी कंपनीचे स्थापक यांचा जन्म.
▶️1953 : ‘सुरेश प्रभू’ – केंद्रीय मंत्री यांचा जन्म.
1956 : ‘अमिताव घोष’ – भारतीय-अमेरिकन लेखक यांचा जन्म.
▶️1967 : ‘झुम्पा लाहिरी’ – भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक यांचा जन्म.
🕐🕐 मृत्यू /पुण्यतिथी
➡️1989 : ‘सर लॉरेन्स ऑलिव्हिये’ – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक निर्माता यांचे निधन. (जन्म: 22 मे 1907)
➡️1994 : ‘मेजर रामराव राघोबा राणे’ – परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्स चे अधिकारी यांचे निधन.
➡️2003 : ‘सुहास शिरवळकर’ – कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक यांचे निधन. (जन्म: 15 नोव्हेंबर 1948)
➡️2009 : ‘शांताराम नांदगावकर’ – गीतकार यांचे निधन. (जन्म: 19 ऑक्टोबर 1936)
➡️2022 : ‘के. एन. ससीधरन’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते यांचे निधन.
🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐
🛑 प्रश्नावली १३१ 🛑
प्रश्न १. दोन भू-खंडांच्या मधून जाणाऱ्या व दोन्ही बाजूंच्या सागरांना जोडणाऱ्या अरुंद अशा समुद्रपट्टीस कोणती संज्ञा आहे ?
उत्तर :- सामुद्रधुनी
प्रश्न २. हिंदी महासागर व प्रशांत महासागर कोणत्या सामुद्रधुनीने जोडले गेले आहेत.
उत्तर :- मलाक्काची सामुद्रधुनी
प्रश्न ३. दोन खंडांना जोडणाऱ्या व सागराचे विभाजन करणाऱ्या जमिनीच्या अरुंद पट्ट्यास कोणते संबोधन आहे ?
उत्तर :- संयोगभूमी
प्रश्न ४. दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वांत जास्त म्हणजे …. इतके असते.
उत्तर :- १११ कि. मी.
प्रश्न ५. पृथ्वीवरील कोणते दोन बिंदू रेखांश न देताही निश्चित करता येतात ?
उत्तर :-उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
▶️ आपल्या माहितीसाठी
🌐 *विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र*
◆ मीटिअरॉलॉजी ➖ हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆ बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖ सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖ मानववंश शास्त्र
◆ एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆ एण्टॉमॉलॉजी ➖ कीटक जीवनाचा अभ्यास