“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी”. प्रश्नावली १३२.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
4 Min Read

                      📖 वाचाल तर वाचाल 📖

                🎗️🎗️परिपाठ🎗️🎗️

🎗️ आज दिनांक :- १ जुलै २०२४
👉 आजचा वार :- शुक्रवार
👉 सुविचार :- जेव्हा तुम्ही प्रयत्न सुरू करता, तेव्हा शीर्षस्थानी येण्याची शक्यता वाढते.


दिनविशेष

           🕐🕐 महत्त्वाच्या घटना 🕐

▶️१९९९ : ’महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान करण्यात आला.
▶️१९९५ : अभिनेते दिलीपकुमार यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर
▶️१९८२ : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना
▶️१९६१ : मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत व खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे २,००० लोक मृत्यूमुखी पडले तर १,००,००० लोक विस्थापित झाले.
▶️१७९९ : रणजितसिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले व ते पंजाबचे सम्राट झाले.
▶️१६७४ : शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.

         🎗️ जन्मदिवस / जयंती 🎗️

👉१९६५ : संजय मांजरेकर – क्रिकेटपटू
◆👉१९२० : यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश
👉१८६४ : वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य
👉१८६४ : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ

               🛑मृत्यू / पुण्यतिथी 🛑
➡️२०१३ : प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता
➡️२०१२ : दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता
➡️१९९९ : राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता
➡️१९९४ : हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानले जाणारे पटकथाकार व ’बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस’चे वसंत साठे
➡️१६६० : बाजी प्रभू देशपांडे

🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑

                 🌍 प्रश्नावली १३२ 🌍

प्रश्न १. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?
उत्तर :- रायगड

प्रश्न २. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
उत्तर :- पद्मभूषण.

प्रश्न ३. पाच नद्यांचा प्रदेश असे कोणत्या राज्याला म्हणतात ?
उत्तर :- पंजाब

प्रश्न ४. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता ?
उत्तर :- सिंधुदुर्ग.

प्रश्न ५. भारतीय क्रिकेट संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे ?
उत्तर :- गौतम गंभीर.

↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️

👉आपल्या माहितीसाठी.

❇️ लोकसंख्या बाबत IMP POINTS ❇️

•हेन्री वॉल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक म्हणून ओळखले जातात.

•जनगणना प्रथम 1872 मध्ये ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड मेयो यांच्या अंतर्गत सुरू झाली.

• पहिली जनगणना ब्रिटिश राजवटीत १७ फेब्रुवारी १८८१ रोजी W.C. प्लॉडेन, भारताचे जनगणना आयुक्त.

• त्या काळात लॉर्ड रिपन भारताचे व्हाईसरॉय होते.

• स्वतंत्र भारताची पहिली जनगणना 1951 मध्ये आयोजित करण्यात आली होती, जी त्याच्या सलग मालिकेतील सातवी जनगणना होती.

• जनगणना 2011 ही 1872 पासूनची देशाची 15वी राष्ट्रीय जनगणना होती आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी होती.

• ग्रेट डिव्हाइडचे वर्ष – 1921

• सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य – बिहार (1102)

• सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य – अरुणाचल प्रदेश (17)

• सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश – नवी दिल्ली (11320)

• कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश – लक्षद्वीप

• सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य – उत्तर प्रदेश

• सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य – सिक्कीम

• सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य – केरळ

• सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य – हरियाणा

• सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य – केरळ

• सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य – बिहार

• राज्याची सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या –
UP> महाराष्ट्र> MP> पंजाब

• भारतातील साक्षरता दर (श्रेणी)
• 74.04 % एकूण आहे
• 82.14% पुरुषांसाठी
• 65.46% महिलांसाठी
• M आणि F मधील 16.68% अंतर

Share This Article