📖 वाचाल तर वाचाल 📖
📘📋📘परिपाठ📘📋📘
🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका
✒️✒️आज दिनांक :- १५ जुलै २०२४
🔊🔊आजचा वार:- सोमवार
📙📘सुविचार :- आळसासारखा शत्रु नाही आणि आत्मविश्वासासारखा मित्र नाही.
🕐🕐 दिनविशेष
आजचा जागतिक दिन :
🌍 जागतिक युवा कौशल्य दिन
🕐 आजचा दिनविशेष – घटना :
👉1662 : इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित रॉयल सोसायटीची स्थापना झाली.
👉1674 : मुघल सरदार बहादूरशाह कोकलताश यांच्या नेतृत्वाखाली पेडगावची लूट रायगडावर जमा करण्यात आली.
👉1926 : कुलाबा ते मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरीय बससेवा सुरू झाली.
👉1927 : र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
👉1955 : 58 नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी अण्वस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ घोषणेवर स्वाक्षरी केली.
👉1955 : पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
👉1961 : स्पेनने स्त्री-पुरुषांसाठी समान हक्क स्वीकारले.
👉1962 : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी संस्था सुरू झाली.
👉1996 : पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
👉1997 : पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
👉2006 : ट्विटर हा प्लॅटफॉर्म सुरु झाला.
👉2011 : भारताने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV द्वारे आधुनिक संचार उपग्रह GSAT-12 अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
👉2014 : जागतिक युवा कौशल्य दिन
🕐🕐 आजचा दिनविशेष – जन्म :
▶️1606 : ‘रेंब्राँ’ – डच चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑक्टोबर 1669)
▶️1611 : ‘मिर्झाराजे जयसिंग’ – जयपूर चे राजे यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑगस्ट 1667)
▶️1903 : ‘के. कामराज’ – खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1975)
▶️1904 : ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर’ – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू : 10 फेब्रुवारी 2001)
▶️1905 : ‘चौधरी मुहंमद अली’ – पाकिस्तानचे 4थे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 2 डिसेंबर 1980)
▶️1906 : ‘राम श्री मुगली’ – कन्नड भाषेतील लेखक यांचा जन्म.
▶️1917 : ‘नूरमोहंमद तराकी’ – अफगणिस्तानचे 3रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 14 सप्टेंबर 1979)
▶️1927 : ‘प्रा. शिवाजीराव भोसले’ – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांचा जन्म. (मृत्यू : 29 जून 2010)
▶️1932 : ‘नरहर कुरुंदकर’ – भारतीय लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 10 फेब्रुवारी 1982)
▶️1933 : ‘एम. टी. वासुदेवन’ – नायर भारतीय लेखक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
▶️1937 : ‘श्री प्रभाज जोशी’ – भारतीय पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 5 नोव्हेंबर 2009)
🎈1949 : ‘माधव कोंडविलकर’ – दलित साहित्यिक यांचा जन्म.
🕐🕐🕐 आजचा दिनविशेष – मृत्यू :
➡️1291 : ‘रुडॉल्फ (पहिला)’ – जर्मनीचा राजा यांचे निधन. (जन्म : 1 मे 1218)
➡️1542 : ‘डेल जिकॉन्डो’ – लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा यांचे निधन. (जन्म : 15 जून 1479)
➡️1904 : ‘अंतॉन चेकॉव्ह’ – रशियन कथाकार व नाटककार यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1860)
➡️1919 : ‘हर्मान एमिल फिशर’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 9 ऑक्टोबर 1852)
➡️1953 : ‘भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस’ – ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 सप्टेंबर 1882)
➡️1967 : ‘नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व’ – गायक व नट यांचे निधन. (जन्म : 26 जून 1888)
➡️1979 : ‘गुस्तावोदियाझ ओर्दाझ’ – मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
➡️1991 : ‘जगन्नाथराव जोशी’ – जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते यांचे निधन.
➡️1998 : ‘ताराचंद परमार’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
➡️1999 : ‘जगदीश गोडबोले’ – पर्यावरणवादी लेखक यांचे निधन.
➡️1999 : ‘इंदुताई टिळक’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.
➡️2004 : ‘डॉ. बानू कोयाजी’ – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक यांचे निधन. (जन्म : 22 ऑगस्ट 1918)
🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐
🛑 प्रश्नावली 🛑
प्रश्न १. महाराष्ट्रातील पहिले अवयव दान जनजागृती उद्यान कोठे आहे ?
उत्तर :- ठाणे.
प्रश्न २. केंद्रीय शिक्षणमंत्री कोण आहेत ?
उत्तर :- धर्मेंद्र प्रधान.
प्रश्न ३. महाराष्ट्र राज्याने नुकतेच कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषीत केले आहे ?
उत्तर :- दांडपट्टा.
प्रश्न ४. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर :- फुटबॉल
प्रश्न ५. भारताची भूसीमा किती देशांना लागून आहे ?
उत्तर :- सात.
🕐📋🕐📋🕐📋🕐📋🕐📋🕐🕐📋🕐📋🕐📋🕐
🛑🛑 आपल्या माहितीसाठी
◾️ओम बिर्ला : 18 व्या लोकसभेचे अध्यक्ष
◾️डी वाय चंद्रचूड : भारताचे 50 वे मुख्य सरन्यायाधीश
◾️हिरालाल सामरिया : भारताचे मुख्य माहिती आयुक्त
◾️नरेंद्र मोदी : नीती आयोगाचे अध्यक्ष
◾️अजित दोवल : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
◾️पंकज कुमार सिंह : उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
◾️ व्ही अनंत नागेश्वरन : भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार
◾️जया वर्मा सिंह : भारतीय रेल्वे बोर्ड चे अध्यक्ष
◾️रेखा शर्मा : राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष
◾️डॉक्टर उन्नीकृष्णन नायर : विक्रम साराभाई अंतराळ केंद्राची संचालक आहेत
◾️हिमांशू पाठक : भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष
◾️मनोज यादव : रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे प्रमुख
◾️ पी टी उषा :भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष
◾️ सिद्धार्थ मोहंती : LIC चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती
◾️धीरेंद्र ओझा : प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) चे महासंचालक
◾️न्यायमूर्ती बीआर सारंगी : झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती
◾️मसूद पेझेश्कियान : इराणचे नवे अध्यक्ष म्हणून निवड
◾️हेमंत सोरेन : तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री
◾️डॉ.बी.एन.गंगाधर : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी
◾️सुजाता सौनिक : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव
◾️IAS अधिकारी मनोज कुमार सिंह : UP चे नवे मुख्य सचिव
◾️विक्रम मिसरी : भारताचे नवे परराष्ट्र सचिव
◾️अतुल चौधरी : ट्रायचे नवे सचिव
◾️IAS राकेश रंजन : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) चे अध्यक्ष
◾️मार्क रूट्टे : NATO चे महासचिव
◾️एंटोनियो कोस्टा – युरोपियन युनियन चे अध्यक्ष
◾️नवाफ सलाम : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष
◾️रॉजर बिन्नी : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे (BCCI) चे अध्यक्ष
◾️समीर कामत : DRDO चे अध्यक्ष
◾️दिनेश कुमार :विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष
◾️प्रवीण सूद : CBI अध्यक्ष
◾️गिरीश चंद्र मुर्मु : नियंत्रण आणि महालेखा परीक्षक
◾️प्रवीण गौड :रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) चे अध्यक्ष
◾️रवी सिन्हा : RAW चे अध्यक्ष
◾️इकबाल सिंग लालपुरा : राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष
◾️गौतम गंभीर : क्रिकेट पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक
◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे)
◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे)
◾️वायुदल प्रमुख : विवेक .राम. चौधरी (27 वे)
◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे)
◾️भूदल उपप्रमुख :एनएस राजा सुब्रमण (47 वे)
◾️NSA : अजित डोवल
◾️नितीन अग्रवाल : BSF चे अध्यक्ष
◾️नलीन प्रभात :NSG चे अध्यक्ष
◾️अरविंद पनगरिया : 16 वा वित्त आयोग अध्यक्ष