📖 वाचाल तर वाचाल 📖
🌍📋परिपाठ🌍📋
🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका
✒️✒️आज दिनांक :- १६जुलै २०२४
🔊🔊आजचा वार:- मंगलवार
📙📘सुविचार :- नेहमी उच्च ध्येय ठेवा, व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.
📙📘📙 दिनविशेष
🎗️ जागतिक सर्प दिन
🕐 महत्त्वाच्या घटना
▶️१९९२ : भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
▶️१९६९ : चंद्रावर पहिला मानव उतरवणार्या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण
▶️ ६२२ : इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरची या दिवसापासुन सुरूवात झाली.
▶️1661: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या
▶️1935: ओक्लाहोमा येथे जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले
▶️1945: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.
🕐🕐 जन्मदिवस / जयंती
➡️1917: ‘जगदीश चंद्र माथूर’ – नाटककार व लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 14 मे 1978)
➡️१९८४ : कतरिना कैफ – चित्रपट कलाकार
➡️१९६८ : धनराज पिल्ले – हॉकी पटू
➡️१९२३ : के. व्ही. कृष्णराव – भूदल प्रमुख, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल
➡️१९१४ : वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक
➡️१९१३ : स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य
➡️१९०९ : अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता, भारतरत्न (मरणोत्तर) पुरस्कारांने त्यांना गौरविण्यात आले.
➡️1973: ‘शॉन पोलॉक’ – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
🕐 मृत्यू / पुण्यतिथी
👉१९९३ : उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक,
👉१९८६ : वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार
👉1986: ‘वासुदेव सीताराम बेंद्रे’ – इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 13 फेब्रुवारी 1894)
📙 वाक्प्रचार
हमरीतुमरी वर येणे :- भांडणाला सुरुवात करणे
📘 म्हणी
🎗️आलीया भोगासी असावे सादर :- जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे.
📖 शब्दसमूहाबद्दल एक शब्द
🎗️समाजाची सेवा करणारा – समाजसेवक.
📋📖📋📖📋📖📋📖📖📋📋📖📋📖📖📋📖📋
🛑 प्रश्नावली १३५🛑
प्रश्न १. सुवर्ण क्रांती कोणत्या पिकाशी सबंधित आहे?
उत्तर :- फळे
प्रश्न २. फ्रीजमध्ये हवा थंड होण्यासाठी कोणता वायू वापरतात ?
उत्तर :- क्लोरोफ्लूरोकार्बन
प्रश्न ३. चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर :- महात्मा गांधी.
प्रश्न ४. चौरीचौरा घटनेनंतर कोणते कोणती चळवळ थांबवण्यात आली ?
उत्तर :- असहकार चळवळ.
प्रश्न ५. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र ‘ शिवसमुद्रम ‘ कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर :- कावेरी.
📝📝📝🕐📝📝📝🕐📝📝📝🕐📝📝📝🕐📝📝
👉 आपल्या माहितीसाठी.
*❇️ ….महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे…. ❇️*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌨 सातारा – महाबळेश्वर , पाचगणी
🌨 पुणे – लोणावळा , खंडाळा , भीमाशंकर
🌨 नंदुरबार – तोरणमाळ
🌨 सिंधुदूर्ग – आंबोली
🌨 रायगड – माथेरान
🌨 औरंगाबाद – म्हैसमाळ
🌨 अहमदनगर – भंडारदरा
🌨 कोल्हापूर – पन्हाळा
🌨 अमरावती – चिखलदरा
🌨 जळगाव – पाल
🌨 पालघर – जव्हार , सूर्यमाळ , मोखाडा
🌨 उस्मानाबाद – येडशी
🌨 नागपुर – रामटेक
🌨 अकोला – नर्णाळा
🌨 बुलढाणा – अंबाझरी.