📖 वाचाल तर वाचाल 📖
📘📙परिपाठ📙📘
🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका
✒️✒️आज दिनांक :- २४ जुलै २०२४
🔊🔊आजचा वार:- बुधवार
📙📘सुविचार :- नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका.
📙📘📙 दिनविशेष
🌍आजचा जागतिक दिन :
आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर दिवस
📘📙 आजचा दिनविशेष – घटना :
👉1704 : ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.
👉1943 : दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा – मित्र राष्ट्रांनी हॅम्बर्ग, जर्मनीवर बॉम्बहल्ला सुरू केला.
👉1969 : अपोलो-11 पॅसिफिक महासागरात यशस्वीरित्या उतरले.
👉1997 : माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
👉1998 : परकीय चलन नियमन कायदा (FERA) च्या जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) लागू करण्यात आला.
👉2000 : चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रहण्यम ही विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर बनली.
📘📙 आजचा दिनविशेष – जन्म
▶️1786 : ‘जोसेफ निकोलेट’ – फ्रेंच गणितज्ञ संशोधक यांचा जन्म.
▶️1851 : ‘फ्रेडरिक शॉटकी’ – जर्मन गणितज्ञ यांचा जन्म.
▶️1911 : ‘गोविंदभाई श्रॉफ’ – हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी यांचा जन्म.
▶️1911 : ‘पन्नालाल घोष’ बासरीवादक संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1960)
▶️1928 : ‘केशुभाई पटेल’ – भारतीय राजकारणी, गुजरातचे दहावे मुख्यमंत्री यांचा जन्म.
▶️1937 : ‘मनोज कुमार’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक यांचा जन्म.
▶️1945 : ‘अझीम प्रेमजी’ – विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन यांचा जन्म.
▶️1969 : ‘जेनिफर लोपेझ’ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका यांचा जन्म.
📘📙 आजचा दिनविशेष – मृत्यू :
➡️1129 : ‘शिराकावा’ – जपानी सम्राट यांचे निधन. (जन्म : 7 जुलै 1053)
➡️1970 : ‘पीटर दि नरोन्हा’ – भारतीय उद्योगपती यांचे निधन. (जन्म : 19 एप्रिल 1897)
➡️1974 : ‘सर जेम्स चॅडविक’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 20 ऑक्टोबर 1891)
➡️1980 : ‘उत्तम कुमार’ – बंगाली हिंदी चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म : 3 सप्टेंबर 1927)
➡️1980 : ‘पीटर सेलर्स’ – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक यांचे निधन. (जन्म : 8 सप्टेंबर 1925)
➡️2012 : ‘रॉबर्ट लिडले’ – सीटी स्कॅन चे शोधक यांचे निधन. (जन्म : 28 जुन 1926)
➡️2017 : ‘हर्षिदा रावल’ – भारतीय गुजराती पार्श्वगायिका
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया
🎗️ म्हणी व अर्थ 🎗️
👉 इच्छा परा ते येई घरा – आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.
🎗️वाक्प्रचार 🎗️
👉 संभ्रमात पडणे : गोंधळात पाडणे
🎗️ शब्दसमुहाबद्दल एक शब्द 🎗️
👉 पाण्याखालून चालणारी बोट – पाणबुडी.
🕐 बोधकथा.
विद्येची किंमत
एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली, तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का ? बारा वर्षे तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे. शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले,” त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणे किमतीचा आहे.” शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला मनाला,” पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन.” ‘रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले,‘नावाडी सुद्धा दोन आण्यात पैलतिराला नेतो. त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्य फक्त तुमच्या पुरतीच आहे. त्या विद्येचा लोकांना उपयोग होत. नाही तिची किंमत शून्य आहे.
तात्पर्यः माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा.
📘 दिनांकानुसार पाढा :- २४ चा पाढा
२४ १४४
४८ १६८
७२ १९२
९६ २१६
१२० २४०
📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📝📋
🕐 प्रश्नावली १४१ 🕐
प्रश्न १. मानवी शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर :- कान.
प्रश्न २. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर :- न्यूटन.
प्रश्न ३. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर :- नायट्रोजन.
प्रश्न ४. मानवी शरीरात कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकारक करू शकतात ?
उत्तर :- पांढऱ्या पेशी.
प्रश्न ५. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तर असते ?
उत्तर :- टंगस्टन.
🕐🕐🕐🕐🕐🕐📖📖📖📖📖📖🕐🕐🕐🕐🕐🕐📖📖📖📖📖📖
👉 आपल्या माहितीसाठी.
🎯महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
🎯महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
🎯महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
🎯महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६
🎯महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
🎯महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
🎯महाराष्ट्रातील महानगरपालिका : २9
🎯महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६
🎯महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७
🎯महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
🎯महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
🎯महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
🎯महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
🎯महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
🎯महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
🎯महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
🎯सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१%)
🎯सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४%)
🎯सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
🎯सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
🎯क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहिल्यानगर
🎯क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर
🎯जास्त लोकसंख्येचा जिल्हा : ठाणे