‘ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.’ प्रश्नावली १४२. Prashnavali 142.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
9 Min Read

                     📖 वाचाल तर वाचाल 📖

      📙📘 परिपाठ 📘📙


🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका

✒️✒️आज दिनांक :-   २५ जुलै २०२४

🔊🔊आजचा वार:- गुरुवार

📙📘सुविचार :- जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.चुकाल तेव्हा माफी मागा,अन कुणी चुकलं तर माफ करा.


📙📘📙 दिनविशेष.

आजचा जागतिक दिन :
➡️जागतिक बुडणे प्रतिबंधक दिवस
➡️आंतरराष्ट्रीय लाल शू दिवस

🌍🌍 दिनविशेष :- आजच्या घटना

▶️1973 : सोव्हिएत संघाचे मार्स हे अंतराळयान प्रक्षेपित.
▶️1977 : नीलम संजीव रेड्डी – भारताचे सहावे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
▶️1978 : जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
▶️1982 : ग्यानी झैल सिंग –  भारताचे सातवे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
▶️1984 : सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली.
▶️1987 : रामस्वामी वेंकटरमण –  भारताचे आठवे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
▶️1992 : स्पेनमधील बार्सिलोना येथे 25व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
▶️1992 : डॉ शंकरदयाल शर्मा – भारताचे नववे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
▶️1994 : इस्त्राएल व जॉर्डनमधे 1948 पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त
▶️1997 : इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना नेहरू पुरस्कार जाहीर.
▶️1997 : के. आर. नारायणन – भारताचे दहावे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
▶️1999 : लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
▶️2002 : ए पी जे अब्दुल कलाम – भारताचे अकरावे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
▶️2007 : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी कार्यभार स्वीकारला
▶️2012 : प्रणव मुखर्जी – भारताचे तेरावे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
▶️2017 : रामनाथ कोविंद – भारताचे 14वे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
▶️2022 : द्रौपदी मुर्मू – भारताचे 15वे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला

🌍🌍 आजचा दिनविशेष – जन्म :
➡️1109 : ‘अफोन्सो’ – पोर्तुगालचा राजा पहिला यांचा जन्म.
➡️1875 : ‘जिम कॉर्बेट’ – ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 19 एप्रिल 1955)
➡️1919 : ‘सुधीर फडके’ – गायक संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 29 जुलै 2002)
➡️1922 : ‘वसंत बापट’ – कवी, वक्ते, कलावंत, संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 17 सप्टेंबर 2002)
➡️1929 : ‘सोमनाथ चटर्जी’ – भारतीय राजकारणी, लोकसभेचे माजी अध्यक्ष यांचा जन्म.
➡️1936 : ‘यूसुफ़ ख़्वाजा हमीद’ – भारतीय शास्त्रज्ञ यांचा जन्म.
➡️1939 : ‘एस. रामदास’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
➡️1978 : ‘लुईझ जॉय ब्राऊन’ – जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी यांचा जन्म.


🌍🌍 आजचा दिनविशेष – मृत्यू :
▶️306 : 306ई.पुर्व  : ‘कॉन्स्टान्शियस क्लोरस’ – रोमन सम्राट यांचे निधन.
▶️1409 : ‘मार्टिन पहिला’ – सिसिलीचा राजा यांचे निधन.
▶️1880 : ‘गणेश वासुदेव जोशी’ – समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते यांचे निधन. (जन्म : 9 एप्रिल 1828)
▶️1973 : ‘लुईस स्टिफन सेंट लोरें’ – कॅनडाचे 12वे पंतप्रधान यांचे निधन.
▶️1977 : ‘कॅ. शिवरामपंत दामले’ – महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक यांचे निधन.
▶️2012 : ‘बी. आर. इशारा’ – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे निधन. (जन्म : 7 सप्टेंबर 1934)
▶️2015 : ‘आर. एस गवई’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 30 ऑक्टोबर 1929)

🌍🌍  जागतिक दिन लेख

      🛑 जागतिक बुडणे प्रतिबंधक दिवस 🛑

     जागतिक बुडणे प्रतिबंधक दिन दरवर्षी 25 जुलै रोजी साजरा केला जातो. बुडण्याच्या घातक आणि दीर्घकालीन परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे कुटुंब आणि समाज या दोघांवरही जागृती करणे आणि ते टाळण्यासाठी जीवन वाचवण्याच्या मार्गांबद्दल माहिती देणे हा आहे. दरवर्षी अंदाजे 236,000 लोक बुडतात – हे सहसा 5 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये अधिक सामान्य आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ग्रामीण भागातील मुले आणि किशोरवयीन मुले शहरातील लोकांपेक्षा जास्त बुडतात.

         🛑 आंतरराष्ट्रीय लाल शू दिवस 🛑

            इंटरनॅशनल रेड शू डे हा एक उत्साही आणि अर्थपूर्ण कार्यक्रम आहे जो अदृश्य आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी केलेल्या संघर्षांवर प्रकाश टाकतो. हा दिवस दयाळूपणा आणि सहानुभूतीला प्रोत्साहन देतो, एक असे जग तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवतो जिथे अदृश्य आजार अधिक चांगल्या प्रकारे समजले जातात आणि मान्य केले जातात.
लाइम रोग, फायब्रोमायल्जिया आणि क्रॉनिक थकवा सिंड्रोम यांसारख्या रोगांकडे लक्ष वेधण्यासाठी सहभागी लाल शूज घालतात. लाल शूज उत्कटतेचे प्रतीक आहेत आणि या रुग्णांना दररोज येणाऱ्या आव्हानांबद्दल जागरुकता वाढवण्याची वचनबद्धता आहे.


🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया

                      🎗️ म्हणी व अर्थ 🎗️

👉 असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जिवालाही धोका निर्माण होतो.

                      🎗️वाक्प्रचार 🎗️

👉 सामोरे जाणे – निधड्या छातीने संकटास तोंड देणे.

         🎗️ शब्दसमुहाबद्दल एक शब्द 🎗️

👉 कल्पना नसताना अचानक घडलेली घटना – अकल्पित

🕐 बोधकथा.

              गरज सरो आणि वैद्य मरो

        वैशाख महिना. दोघे प्रवासी प्रवास करीत होते. सूर्य वर येऊ लागला तस तसा त्रास वाढत चालला. त्या रणरणत्या उन्हात चालणे त्यांना असह्य वाटू लागले. उष्मा फारच वाढल्याने प्रवासी हैराण झाले. थोडी का होईना पण सावली आणि घटकाभर विश्रांती मिळण्यासाठी आतुर झाले. दूरवर त्यांना एक झाड दिसलं, पानांनी गच्च भरलेलं त्या सावलीत बसण्यासाठी त्यांनी आपला वेग वाढविला. थंडगार सावलीत बैठक मारली. थोड्या वेळाने ते तेथेच आडवे झाले.
जागे झाले तोवर ऊन उतरल होत. उठून बसले. एकाच लक्ष वर झाडाकडे गेल म्हणू लागला “अरे,केवढं मोठं आहे हे झाड पण काय कामाचं? ना फूल ना फळ. अगदी निरुपयोगी आहे हे.”
दुसऱ्यांने त्याचीच री ओढली. म्हणाला, “असलं झाड कोणा मूर्खाने लावलं कोणास ठाऊक, तोडून टाकण्याच्या लायकीचा आहे हे.”

त्याचं बोलणं ऐकून झाडाला राग आला त्याची पान जोरात सळसळू लागली. झाड म्हणाल, “मुर्खांनो,एन उन्हाच्या वेळी सावलीसाठी तळमळत होतात. माझ्या आश्रयाला आलात मी थंडगार सावली दिली. ते इतक्यात विसरलात आणि माझ्या जीवावर उठता काय? मी नसतो तर तुमचं काय झालं असतं?”
प्रवासी वरमले त्यांनी न बोलता पुढचा रस्ता पकडला.

तात्पर्यः आपल्याला मदत हवी असते तेव्हा मदत करणारा चांगला गरज संपली की त्याला लाथाडायचं हे चालत नाही
                       
📘 दिनांकानुसार पाढा :- २५ चा पाढा

                                  २५         १५०
                                  ५०         १७५
                                  ७५         २००
                                  १००         २२५
                                  १२५       २५०

    📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋

           🛑 प्रश्नावली १४२ 🛑

            माझा महाराष्ट्र – भाग १

प्रश्न १. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर :- १ नोव्हेंबर १९५६

प्रश्न २. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर :-१ मे १९६०

प्रश्न३. महारष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौ .किमी. आहे
उत्तर :- ३,०७,७१३

प्रश्न ४. महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे किती किमी आहे ?
उत्तर :- ७०० किमी

प्रश्न ५. महाराष्ट्र राज्याला एकूण सुमारे किती किमी चा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
उत्तर :- ७२०

प्रश्न ६. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती किमी आहे ?
उत्तर :-८००

प्रश्न ७. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ?
उत्तर :- मुंबई

प्रश्न ८. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे ?
उत्तर :-नागपूर

प्रश्न ९. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत ?
उत्तर :- ६

प्रश्न १०. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचे नावे सांगा ?
उत्तर :-१) कोकण २) नाशिक ३) पुणे
         ४) औरंगाबाद ५) अमरावती ६) नागपूर

📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋

👉 आपल्या माहितीसाठी.


✅ पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल ✅

🔥◆ राष्ट्रपती  – 5 वर्ष

🔥◆ उपराष्ट्रपती  –  5 वर्ष

🔥◆ राज्यपाल – राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत 

🔥◆ पंतप्रधान – 5 वर्ष 

🔥◆ लोकसभा अध्यक्ष – 5 वर्ष

🔥◆ लोकसभा सदस्य  – 5 वर्ष

🔥◆ राज्यसभा सभापती – 5 वर्ष

🔥◆ राज्यसभा सदस्य – 6 वर्ष 

🔥◆ राज्यसभा – कायमस्वरुपी स्थायी

🔥◆ महालेखापाल – 6 वर्ष  

🔥◆ महान्यायवादी – राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत  

🔥◆ मुख्यमंत्री – 5 वर्ष 

🔥◆ विधानसभा – 5 वर्ष 

🔥◆ विधानसभा सदस्य – 5 वर्ष

🔥◆ विधान परिषद सदस्य – 6 वर्ष  

🔥◆ विधान परिषद – कायमस्वरुपी ( स्थायी )

🔥◆ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – 65 वर्ष वयापर्यंत 

🔥◆ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश – 62 वर्ष वयापर्यंत 

🔥◆ कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश – 60 वर्ष वयापर्यंत 

🔥◆ UPSC अध्यक्ष व सदस्य – 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )

🔥◆ MPSC अध्यक्ष व सदस्य – 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत.

Share This Article