📖 वाचाल तर वाचाल 📖
📙 परिपाठ 📘
🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका
✒️✒️आज दिनांक :- २६ जुलै २०२४
🔊🔊आजचा वार:- शुक्रवार
📙📘सुविचार :- आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे.
📙📘📙 दिनविशेष.
🌍आजचा जागतिक दिन :
👉कारगिल विजय दिवस
👉राष्ट्रीय काकू आणि काका दिवस
📙📘 आजचा दिनविशेष – घटना
➡️1509 : सम्राट कृष्णदेवरायाने विजयनगर साम्राज्याचे पुनरुज्जीवन सुरू केले.
➡️1788 : न्यूयॉर्क हे अमेरिकेचे 11 वे राज्य बनले.
➡️1745 : गिल्डफोर्ड येथे इंग्लंडमधील पहिला महिला क्रिकेट सामना खेळला गेला.
➡️1847 : लायबेरिया स्वतंत्र झाला.
➡️1891 : फ्रान्सने ताहिती बेटे काबीज केली.
➡️1892 : दादाभाई नौरोजी ब्रिटनमधील पहिले भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले.
➡️1953 : फिडेल कॅस्ट्रोच्या मोनकाडा बॅरेक्सवरील अयशस्वी हल्ल्याने क्यूबन क्रांती सुरू झाली, ही चळवळ 26 जुलै क्रांती म्हणून ओळखली जाते.
➡️1956 : जागतिक बँकेने अस्वान धरणाच्या बांधकामासाठी वित्तपुरवठा करण्यास नकार दिल्यानंतर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
➡️1963 : सिन्कोमा, पहिला भूस्थिर उपग्रह प्रक्षेपित झाला.
➡️1965 : युनायटेड किंगडमपासून मालदीवचे स्वातंत्र्य.
➡️1971 : अपोलो 15 चे प्रक्षेपण करण्यात आले.
➡️1994 : सनईवादक उस्ताद बिस्मिला खान यांना राजीव गांधी सदिच्छा पुरस्कार जाहीर.
➡️1998 : विश्वनाथन आनंदला बुद्धिबळातील कामगिरीबद्दल प्रतिष्ठित बुद्धिबळ ऑस्करने सन्मानित करण्यात आले.
➡️1999 : भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
➡️2005 : मुंबई परिसरात 24 तासात सुमारे 995 मिमी पाऊस, ज्यामुळे पूर आला आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला.
➡️2008 : अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 56 ठार आणि 200 जखमी.
➡️2016 : सोलार इम्पल्स 2 – पृथ्वीभोवती फिरणारे पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले.
📙📘 आजचा दिनविशेष – जन्म
▶️1856 : ‘जॉर्ज बर्नार्ड शॉ’ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 2 नोव्हेंबर 1950)
▶️1865 : ‘रजनीकांत सेन’ – भारतीय कवी आणि संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 1910)
▶️1875 : ‘कार्ल युंग’ – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 6 जून 1961)
▶️1893 : ‘पं. कृष्णराव शंकर पंडित’ – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑगस्ट 1989)
▶️1894 : ‘वासुदेव गोविंद मायदेव’ – कवी समाजसेवक यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1969)
▶️1894 : ‘अल्डस हक्सले’ – इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 1963)
▶️1904 : ‘एडविन अल्बर्ट लिंक’ – फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 7 सप्टेंबर 1981)
▶️1927 : ‘जी. एस. रामचंद’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
▶️1928 : ‘इब्न-ए-सफ़ी’ – भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 25 जुलै 1980)
▶️1939 : ‘जॉन हॉवर्ड’ – ऑस्ट्रेलियाचे 25वे पंतप्रधान यांचा जन्म.
▶️1942 : ‘व्लादिमिर मेसियर’ – स्लोव्हेकियाचे पंतप्रधान यांचा जन्म.
▶️1949 : ‘थाकसिन शिनावात्रा’ – थायलंडचे पंतप्रधान यांचा जन्म.
▶️1954 : ‘व्हिटास गेरुलायटिस’ – अमेरिकन लॉन टेनिसपटू यांचा जन्म. (मृत्यू : 17 सप्टेंबर 1994)
▶️1955 : ‘असिफ अली झरदारी’ – पाकिस्तानचे 11वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
▶️1971 : ‘खलिद महमूद’ – बांगलादेशी क्रिकेटपटू यांचा जन्म.
▶️1986 : ‘मुग्धा गोडसे’ – अभिनेत्री मॉडेल यांचा जन्म.
📘📙
आजचा दिनविशेष – मृत्यू
👉811 : 811ई.पुर्व : ‘निसेफोरस’ – बायझेन्टाईन सम्राट यांचे निधन.
👉1380 : ‘कोम्यो’ – जपानी सम्राट यांचे निधन.
👉1843 : ‘सॅम ह्युस्टन’ – टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
👉1867 : ‘ओट्टो’ – ग्रीसचा राजा यांचे निधन.
👉1952 : ‘एव्हा पेरोन’ – अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी यांचे निधन.
👉1891 : ‘राजेन्द्रलाल मित्रा’ – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 15 फेब्रुवारी 1824)
👉2009 : ‘भास्कर चंदावरकर’ – मराठी नाट्य चित्रपट संगीतकार यांचे निधन. (जन्म : 16 मार्च 1936)
👉2010 : ‘शिवकांत तिवारी’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म : 20 डिसेंबर 1945)
👉2015 : ‘बिजॉय कृष्णा हांडिक’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 1 डिसेंबर 1934)
🌍🌍 जागतिक दिन लेख :
🇮🇳🇮🇳 कारगिल विजय दिवस 🇮🇳🇮🇳
कारगिल विजय दिवस हा स्वतंत्र भारतातील सर्व देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस भारतात दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो.1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये कारगिल युद्ध झाले, जे सुमारे 60 दिवस चालले आणि 26 जुलै रोजी संपले आणि त्यात भारताचा विजय झाला. कारगिल विजय दिवस युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.
कारगिल युद्धात लढलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण भारतात आणि देशाची राजधानी नवी दिल्ली येथे साजरा केला जातो, जेथे भारताचे पंतप्रधान दरवर्षी इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. भारतीय सशस्त्र दलांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभरात समारंभही आयोजित केले जातात.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया
🎗️ म्हणी व अर्थ 🎗️
👉 हाजीर तो वजीर – जो वेळेवर हजर राहिल, त्यालाच संधीचा फायदा होईल
🎗️वाक्प्रचार 🎗️
👉 हातात हात घालणे – सहकार्य करणे
🎗️ शब्दसमुहाबद्दल एक शब्द 🎗️
👉 माकडांचा खेळ करणारा – मदारी
🕐 बोधकथा.
बोधकथा – गर्विष्ठ मेणबत्ती
एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वतःचा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, “ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात. तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, ‘अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढयाशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा शेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का?’
तात्पर्य : आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.
📘 दिनांकानुसार पाढा :- २३ चा पाढा
२६ १५६
५२ १८२
७८ २०८
१०४ २३४
१३० २६०
📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝
📝 प्रश्नावली १४२ 📝
प्रश्न १. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत ?
उत्तर :-३६
प्रश्न २. महाराष्ट्र राज्यातील तालुक्यांची संख्या किती आहे ?
उत्तर :-३५८
प्रश्न ३. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे ?
उत्तर :-३४
प्रश्न ४. महाराष्ट्र राज्यातील पंचायत समित्यांची संख्या किती आहे ?
उत्तर :-३५५
प्रश्न ५. महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदची संख्या किती आहे ?
उत्तर :- ३३
प्रश्न ६. महारष्ट्र राज्यातील नगरपंचायत संख्या किती आहे ?
उत्तर :-१२८
प्रश्न ७. महाराष्ट्र राज्यात किती कटकमंडळे आहेत ?
उत्तर :-७
प्रश्न ८. महाराष्ट्र राज्यात किती महानगर पालिका आहेत ?
उत्तर :-29
प्रश्न ९. महाराष्ट्र राज्यातील एकूण वनक्षेत्र प्रमाण किती चौ.किमी . आहे ?
उत्तर :- ६१,९३९ चौ.किमी
प्रश्न १०. महारष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?
उत्तर :- सिंधुदुर्ग
📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝
आपल्या माहितीसाठी.
🏆 महत्वाचे दिवस
◾️राष्ट्रीय युवा दिन (स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस : 12 जानेवारी
◾️आंतरराष्ट्रीय युवा दिवस : 12 ऑगस्ट
◾️आर्मी दिवस : 15 जानेवारी
◾️प्रवासी भारतीय दिवस : 9 जानेवारी
◾️ राष्ट्रीय बालिका दिन : 24 जानेवारी
◾️शाहिद दिवस : 30 जानेवारी ( महात्मा गांधी हत्या)
◾️भारतीय तटरक्षक दिन : 1 जानेवारी
◾️जागतिक सामाजिक न्याय दिन : 20 फेब्रुवारी
◾️जागतिक आरोग्य दिन : 7 एप्रिल
◾️जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल
◾️जागतिक वसुंधरा दिन : 22 एप्रिल
◾️राष्ट्रीय पंचायत दिन : 24 एप्रिल
◾️आंतरराष्ट्रीय कामगार दिवस : 1 मे
◾️जागतिक पर्यावरण दिन : 5 जून
◾️जागतिक लोकसंख्या दिवस 11जुलै. ◾️22 जुलै : राष्ट्रीय ध्वज दिवस
◾️आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन :29 जुलै
◾️
◾️संविधान हत्या दिवस – 25 जून
◾️आंतरराष्ट्रीय खेळ दिवस – 11 June
◾️आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस – 30 May
◾️विश्व फुटबॉल दिवस – 25 मे
◾️राष्ट्रीय डॉल्फिन दिवस – 5 अक्टूबर
◾️इस्लामोफोबिया दिवस – 15 मार्च
◾️मैत्री दिवस – 6 डिसेंबर
◾️राष्ट्रीय सागरी दिवस : 5 एप्रिल
◾️शून्य भेदभाव दिवस : 1 मार्च
◾️आंतरराष्ट्रीय महिला दिन : 8 मार्च
◾️CISF स्थापना दिवस : 10 मार्च
◾️जागतिक जल दिन : 22 मार्च
◾️जागतिक हवामान दिन : 23 मार्च
◾️आंतरराष्ट्रीय महामारी दिवस ( of Epidemic Preparedness) – 27 डडिसेंबर
◾️राष्ट्रीय स्टार्टअप दिवस – 16 जानेवारी
◾️पराक्रम दिवस – 23 जानेवारी
◾️वीर बाल दिवस – 26 डिसेंबर
◾️विभाजन विभीषिका स्मृती दिवस – 14 ऑगस्ट
◾️जनजातीय गौरव दिवस 15 नोव्हेंबर
◾️भाला फेक दिवस – 7 ऑगस्ट
◾️आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस – 10 मार्च
◾️राष्ट्रिय अंतरिक्ष दिवस – 23 ऑगस्ट
◾️हैदराबाद मुक्ति दिवस -17 सप्टेंबर
◾️भारत छोडो दिवस : 9 ऑगस्ट
◾️राष्ट्रीय क्रीडा दिन : 29 ऑगस्ट
◾️शिक्षक दिन : 5 सप्टेंबर ((डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस)
◾️जागतिक ओझोन दिवस : 16 सप्टेंबर
◾️आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन : 2 ऑक्टोबर ( गांधी जयंती)
◾️भारतीय वायुसेना दिन : 8 ऑक्टोबर