\”ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.\” प्रश्नावली १४९
📖 वाचाल तर वाचाल 📖
📘📙 परिपाठ 📙📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २ ऑगस्ट २०२४
🔊🔊आजचा वार:- शुक्रवार
📙📘सुविचार :- जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही
ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.
📙📘📙 दिनविशेष.
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
👉1677 : शिवाजी महाराजांनी तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनाला भेट दिली. तेथे त्यांनी डच प्रतिनिधींशी चर्चा केली.
👉1790 : अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू झाली.
👉1870 : टॉवर सबवे, जगातील पहिली भूमिगत ट्यूब रेल्वे, लंडनमध्ये उघडली.
👉1923 : केल्विन कूलिज हे अमेरिकेचे 30 वे राष्ट्राध्यक्ष बनले.
👉1954 : दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांकडून भारतीयांनी ताब्यात घेतली.
👉1979 : नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
👉1990 : इराकने कुवेतवर आक्रमण करून आखाती युद्धाला सुरुवात केली.
👉1996 : अटलांटा ऑलिम्पिकमध्ये, अमेरिकेचा मायकेल जॉन्सन हा ऑलिम्पिक इतिहासातील पहिला ऍथलीट बनला ज्याने त्याच ऑलिम्पिक स्पर्धेत 200 आणि 400 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले.
👉 2001 : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते पुलेला गोपीचंद यांची भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली.
वरीलप्रमाणे आजचा दिनविशेष aajcha dinvishesh
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
➡️1820 : ‘जॉन टिंडाल’ – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 डिसेंबर 1893)
➡️1834 : ‘फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड’ – स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1904)
➡️1835 : ‘अलीशा ग्रे’ – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1901)
➡️1861 : ‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1944)
➡️1876 : ‘पिंगाली वेंकय्या’ – भारतीय तिरंग्याचे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 जुलै 1963)
➡️1877 : ‘रविशंकर शुक्ला’ – मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 31 डिसेंबर 1965)
➡️1892 : ‘जॅक एल. वॉर्नर’ – वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 1978)
➡️1910 : ‘पुरुषोत्तम शिवराम रेगे’ – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 17 फेब्रुवारी 1978)
➡️1918 : ‘जे. पी. वासवानी’ – आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा यांचा जन्म.
➡️1929 : ‘विद्याचरणा शुक्ला’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जुन 2013)
➡️1932 : ‘लमेर हंट’ – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 2016)
➡️1941 : ‘ज्यूल्स हॉफमन’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
➡️1945 : ‘बंकर रॉय’– भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते यांचा जन्म.
➡️1958 : ‘अर्शद अयुब\’– भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
▶️1589 : ‘हेन्री (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1551)
▶️1781 : ‘सखारामबापू बोकील’ – पेशव्यांच्या कारकिर्दीत प्रभावशाली मंत्री यांचे निधन.
▶️1922 : ‘अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल’ – टेलिफोन चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 3 मार्च 1847)
▶️1934 : ‘पॉल फॉन हिन्डेनबर्ग’ – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1847)
▶️1978 : ‘अॅन्टोनी नोगेस’ – मोनॅको ग्रांप्री चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 13 सप्टेंबर 1890)
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 आवळा देऊन कोहळा काढणे – आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 सोन्याचे दिवस येणे – अतिशय चांगले दिवस येणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 स्वतःचे काम स्वतः करणारा – स्वावलंबी
🕐📝 बोधकथा 📝🕐
बळी तो कान पिळी
एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं, एवढंच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं.’ त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. मूर्ख बकर्या नि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही.’ या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, ‘एका शेतकर्याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. ‘अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्या गाढवाला ठार मारले.
तात्पर्य– बळी तो कान पिळी.
📘 दिनांकानुसार पाढा :- २ चा पाढा
२ १२
४ १४
६ १६
८ १८
१० २०
📝📋📝📋📝📋📋📝📋📝📋📝📋📝📋📋📝📋📝📋📝📋📝
🛑 प्रश्नावली १४९ 🛑
प्रश्न १.मानवी शरीरात यकृताचे कार्य कोणते ?
उत्तर :- ग्लुकोजचा साठा करणे
प्रश्न २. नेत्रगोलाच्या उघड्या पृष्ठभागावरील गोलाकार पारदर्शक आवरणास काय म्हणतात ?
उत्तर :- पारपटल
प्रश्न ३. सूर्यप्रकाशाचा वापर करून विद्युत निर्मिती करणाऱ्या बॅटरींना काय म्हणतात ?
उत्तर :- सौरघट
प्रश्न ४. कोणत्या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो ?
उत्तर :- कॅरोटीन
प्रश्न ५. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो?
उत्तर :- कार्बन डायऑक्साइड
प्रश्न ६. प्लेग या रोगाचा प्रादुर्भाव कोणामार्फत होतो ?
उत्तर :- उंदीर, पिसवा.
प्रश्न ७. गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे सांध्याचे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे ?
उत्तर :- बिजागरीचा सांधा.
प्रश्न ८. टायफाईड या आजारात कोणते औषध दिले जाते ?👉
उत्तर :- क्लोरोमाससिटिन
प्रश्न ९. कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते ?
उत्तर :- पाणी
प्रश्न १० गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो?
उत्तर :- मिथेन
📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋
👉 आपल्या माहितीसाठी.
💥 इतिहास 💥
१) १७७३ – रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ – कुळ कायदा
३) १८२९ – सतीबंदी कायदा
४) १८३५ – वृत्तपत्र कायदा
५) १८५४ – वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ – विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ – राणीचा जाहीरनामा
८) १८५९ – बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० – इंडियन पिनल कोड
१०) १८६१ – इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७०- आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ – व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ – देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ – इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ – कुळ कायदा
१६) १८९२ – कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ – भारतीय चलन कायदा
१८) १९०१ – पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ – भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ – प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ – सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ – मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ – मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ – रौलेक्ट कायदा
२५) १९३५ – भारत सरकार कायदा
२६) १९४४ – राजाजी योजना
२७) १९४५ – वेव्हेल योजना
२८) १९४५ – त्रिमंत्री योजना
२९) १९४७ – माउंटबॅटन योजना
३०) १९४७ – भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
*➡️वृत्तपत्रे व मासिके – संपादकाचे नाव➡️*
▪️तत्वबोधिनी पत्रिका – रविंद्रनाथ टागोर
▪️व्हाईस ऑफ इंडिया, रास्तगोप्तार – दादाभाई नौरोजी
▪️न्यू इंडिया – विपीनचंद्र पाल
▪️न्यू इंडिया, इंडियन ओपिनियन – महात्मा गांधी
▪️नवजीवन समाचार – महात्मा गांधी
▪️इंडियन मिरर – डी.डी. सेन
▪️द ईस्ट इंडियन – हेरी डेरोझिओ
▪️इंडियन सोशलॉजीस्ट – श्यामजी कृष्ण वर्मा
▪️नॅशनल हेरोल्ड – पंडित नेहरू
▪️इंडिपेडन्स – मोतीलाल नेहरू
▪️अल-हिलाल, अल-बलाध – मौलाना आझाद
▪️भारतमाता – अजित सिंग
▪️हिंदू – श्री सुब्रम्हण्यम अय्यर
▪️सर्चलाईट – डॉ. राजेंद्र प्रसाद
▪️सोमप्रकाश – ईश्वरचंद विद्यासागर
▪️वंदे मातरम, पंजाबी पिपल – लाला लजपत रॉय
▪️वंदे मातरम – मादाम कामा
▪️संवाद कौमुदी – राजा राममोहन रॉय
▪️मिरात-उल-अखबार – राजा राममोहन रॉय
▪️बॉम्बे क्रोनिकल – फिरोजशहा मेहता
▪️युगांतर – भूपेंद्र दत्त, बारीन्द्र घोष
▪️संध्या – भूपेंद्र दत्त आणि बंडोपाध्याय
▪️अमृतबझार पत्रिका – शिरीष कुमार घोष व एम.एल. घोष
▪️वंगभाषी – बाबू जोगेन्द्रनाथ बसू
▪️बंगाली – सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
▪️हिंदुस्थान व्हयू – एस.पी. सिन्हा
▪️अकबार-ए-आझम – हरिकृष्ण लाल
▪️हिंदूस्थान वकील – जी.पी. वर्मा
▪️कॉम्रेड, हमदर्द – मोहम्मद अली
▪️गदर – लाला हरदयाल
▪️व्हॅनगार्ड – एम.एन. रॉय
▪️उद्बोधन – स्वामी विवेकानंद
▪️प्रबुद्ध भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️रिव्हॅल्युशनरी – सच्चिंद्रनाथ सन्याल
▪️ब्रम्हबोधिली – उमेशचंद्र दत्त
▪️सुलभ समाचार – केशवचंद्र सेन
▪️बंग्लारकथा – सुभाषचंद्र बोस
▪️इंडिया – सुब्रमण्यम भारती
▪️लिडर – पंडीत मदन मोहन मालवीय
▪️द इंडियन स्पेक्टॅटर – बेहरामजी मलबारी
▪️इंडियन फिल्ड – किशोरीचंद मित्र
▪️अबला बांधव – व्दारकानाथ गांगुली
▪️फ्री हिदुस्थान – तारकानाथ दास
▪️जन्मभूमी – पट्टाभी सितारामय्या
▪️मुंबई समाचार – फरदुनजी मर्झाबान