📖 वाचाल तर वाचाल 📖
📘📙परिपाठ📙📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ३ ऑगस्ट २०२४
🔊🔊आजचा वार:- शनिवार
📙📘सुविचार :- पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.
📙📘📙 दिनविशेष.
✒️✒️ दिनविशेष – घटना
➡️1678 : अमेरिकेने बनवलेले पहिले जहाज ग्रीफॉन लाँच करण्यात आले.
➡️1783 : जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडले.
➡️1900 : द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.
➡️1914 : हिटलरने बव्हेरियाचा राजा लुडविग यांच्याकडे सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला आणि त्याला नियुक्त करण्यात आले.
➡️1936 : आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
➡️1948 : भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली.
➡️1960 : नायजेरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
➡️1994 : संगीतकार अनिल बिस्वास यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार जाहीर केला.
➡️1994 : साध्या आणि गोड कविता आणि सूक्ष्म आणि मार्मिक वर्णनात्मक लेखांच्या माध्यमातून हिंदी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारने विशेष पुरस्कार जाहीर केला आहे.
➡️2000 : मल्याळम दिग्दर्शक शाजी एन करुण यांना फ्रेंच सरकारने नाइट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
➡️2004 : राज्यपाल मुहम्मद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
दिनविशेष – जन्म
▶️1984 : ‘सुनील छेत्री’ – भारतीय फुटबॉलपटू यांचा जन्म.
▶️1886 : ‘मैथिलिशरण गुप्त’ – हिंदी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 1964)
▶️1898 : ‘उदयशंकर भट्ट’ – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 28 फेब्रुवारी 1966)
▶️1900 : ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 6 डिसेंबर 1976)
▶️1916 : ‘शकील बदायूँनी’ – गीतकार आणि शायर यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1970 – मुंबई)
▶️1924 : ‘लिऑन युरिस’ – अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 21 जून 2003)
▶️1939 : ‘अपूर्व सेनगुप्ता’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
▶️1955 : ‘चंद्रशेखरन मोहन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ यांचा जन्म.
▶️1956 : ‘बलविंदरसिंग संधू’ – 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू यांचा जन्म.
▶️1960 : ‘गोपाल शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
▶️1977 : ‘सुनील ग्रोव्हर’ – भारतीय अभिनेता आणि कॉमेडियन यांचा जन्म.
दिनविशेष – मृत्यू
👉1929 : ‘एमिल बर्लिनर’ – फोनोग्राफ चे शोधक यांचे निधन. (जन्म : 20 मे 1851)
👉1930 : ‘व्यंकटेश बापूजी केतकर’ – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1854)
👉1957 : ‘देवदास गांधी’ – पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1900 – दरबान, दक्षिण अफ्रिका)
👉1993 : ‘स्वामी चिन्मयानंद सरस्वती’ – अध्यात्मिक गुरू यांचे निधन. (जन्म : 8 मे 1916)
👉2007 : ‘सरोजिनी वैद्य’ – लेखिका यांचे निधन. (जन्म : 15 जून 1933)
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे – मूळचा स्वभाव बदलत नाही .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 अवलोकन करणे – निरीक्षण करणे,पाहणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
🕐📝 बोधकथा 📝🕐
मुंगी आणि कबूतर.
एका जंगलामध्ये एका मुंगीने नदीकिनारी आपले घर बनवले होते. दुपारच्या वेळी तिला खूप तहान लागल्यामुळे ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी पिण्यासाठी गेले. नदीमध्ये पाणी पीत असताना जास्त वादळ आल्यामुळे तिचा पाय घसरून ती पाण्यामध्ये पडली. जवळच्या झाडावर एक कबूतर बसले होते. आणि हे सगळे पाहिले व त्याला मुंगी उडताना पाहून त्याला त्या मुंगीची दया आली.
कबूतराने झाडाचे एक सुकलेले पान पटकन त्या मुंगी जवळ टाकले. मुंगी त्या पानावर चढली आणि ते पान सुरक्षित नदीकिनारी आले. एक शिकारी कबुतराला पकडण्यासाठी त्या कबुतरावर जाळे टाकणार एवढ्यात त्या शिकाऱ्याच्या पायाला मुंगी कडकडून चावते.
त्यामुळे तो शिकारी ओरडू लागतो व कबूतर सावध होते आणि शिकार याला पाहून उडून जाते. प्रकारे कबुतराच्या कर्माचे फळ त्याला आपले जीवन दान म्हणून भेटले.
तात्पर्य:- संकटकाळी मदत करेल हाच खरा मित्र.
📘 दिनांकानुसार पाढा :- २ चा पाढा
३ १८
६ २१
९ २४
१२ २७
१५ ३०
📝📋📝📋📝📋📝📋📋📋📋📋📋📋📋📋📝📋📝📋📋📝📋
🛑 प्रश्नावली १५० 🛑
प्रश्न १. भारतात सर्वात जास्त GST जमा करणारे राज्य कोणते ?
उत्तर :- महाराष्ट्र.
प्रश्न २. जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?
उत्तर :- भारत.
प्रश्न ३ :-आम्ल पदार्थाची चव कशी असते ?
उत्तर :- आंबट.
प्रश्न ४.भारतासाठी स्वातंत्र्यानंतर पाहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळविणारी व्यक्ती कोण ?
उत्तर :- खाशाबा जाधव
प्रश्न ५. \”तुम मुझे खून दो,मैं तुम्हे आझादी दूँगा\’ ही घोषणा कोणाची आहे ?
उत्तर :- सुभाषचंद्र बोस.
प्रश्न ६ . भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर :- गंगा नदी.
प्रश्न ७. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?
उत्तर :- वटवृक्ष.
प्रश्न ८. \’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच\’ अशी सिंहगर्जना कोणी केली ?
उत्तर :- लोकमान्य टिळक.
प्रश्न ९. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
उत्तर :- सरदार वल्लभभाई पटेल.
प्रश्न १०. २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
उत्तर :- अशोक सराफ.
📝📋📝📋📝📋📝📝📝📝📋📝📋📝📋📝📝📝📋📝📝📝
👉 आपल्या माहितीसाठी
◾️प्रीती सुदान : UPSC च्या अध्यक्ष
◾️\”IAS के वासुकी\” : केरळ चे परराष्ट्र सचिव
◾️सी. पी. राधाकृष्णन :महाराष्ट्राचे \”21 वे\” राज्यपाल आहेत
◾️डॉ. समीर व्ही कामत : DRDO चे अध्यक्ष यांच्या सेवेत 31 मे 2025 पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ
◾️लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर : महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) या पदावर नियुक्ती(पहिल्या महिला)
◾️मेजर जनरल विकास लाखेरा : आसाम रायफल्समध्ये महासंचालक (डीजी)
◾️केपी शर्मा ओली : नेपाळच्या पंतप्रधान
◾️अजित डोवाल : तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
◾️डॉ. पीके मिश्रा : पंतप्रधानांचे प्रधान सचिव
◾️विजया भारती सयानी : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) च्या कार्यवाह अध्यक्ष म्हणून नियुक्ती ( सध्या सदस्य आहेत- नवीन अध्यक्ष येई पर्यंत)
◾️नीता अंबानी : इंडियन
ऑलम्पिकअसोसिएशनच्या च्या सदस्य पदी पुन्हा निवड
◾️शेखर कपूर : 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोवा चे महोत्सवात संचालक म्हणून नेमणूक
◾️अजिंक्य नाईक : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ( सर्वात तरुण)
◾️मनोलो मार्केझ : भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून
◾️रजत शर्मा : News Broadcasters & Digital Association अध्यक्षपदी निवड
◾️ सिद्धार्थ मोहंती : LIC चे व्यवस्थापकीय संचालक
◾️राकेश रंजन : SSC अध्यक्ष
◾️नितीन नारंग :ऑल इंडिया चेस फेडरेशन (AICF) चे नवीन अध्यक्ष
◾️ लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) चे प्रमुख(28 वे)
◾️श्री ए.एस. राजीव : केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती
◾️किशोर मकवाना : यांना केंद्र सरकारने अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) अध्यक्ष बनवले आहे.
◾️IPS अनुराग अग्रवाल : यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे
◾️आशा लाक्रा : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य बनवण्यात आले आहे.
👉व्यक्तीविशेष.
ऑलिम्पिकवीर खाशाबा दादासाहेब जाधव
🎯जन्म – 15 जाने, 1926 (सातारा)
🎯मृत्यू – 14 ऑग, 1984 (कराड,सातारा)
🎯खेळ – फ्रिस्टाइल कुस्तीगीर
🎯1952मध्ये हेलसिंकी उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये कास्या पदक विजेते.
🎯खेळप्रकार – फ्रिस्टाइल कुस्ती
🎯स्वातंत्र्यानंतर भारतासाठी पाहिले ऑलिम्पिक पदक
🎯महाराष्ट्रासाठी पाहिले ऑलिम्पिक पदक
🎯1948 मध्ये ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला
कर्ज काढून भाग घेतला परस्थिती अत्यंत गरीब होती
🎯1952 मध्ये मेडल मिळाल्यानंतर ही ते 6 वर्ष बेकार होते,कोणतेही पद त्यांना देण्यात आले न्हवते अखेर महाराष्ट्र पोलीस मध्ये कशीबशी नोकरी दिली.
🎯जिवंतपणी कोणातच पुरस्कार दिला नाही.
🎯मरणोत्तर महाराष्ट्र सरकारने \’ शिवछत्रपती \’ पुरस्कार दिला.
🎯तर केंद्र सरकारने अर्जुन पुरस्कार ने गौरविले
🎯महाराष्ट्र सरकार 2001 पासून यांच्या नावाने कुस्ती स्पर्धा भरवत आहे.