\”ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.\” प्रश्नावली १५२\”. Prashnavali 152

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
13 Min Read

                   

             📖 वाचाल तर वाचाल 📖

        📘📙परिपाठ📙📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-  ६ ऑगस्ट २०२४

🔊🔊 आजचा वार:- मंगळवार

📙📘सुविचार :-   स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासाने जग जिंकता येते.

📙📘📙 दिनविशेष.

✒️✒️ आजचा जागतिक दिन .

🎗️आंतरराष्ट्रीय स्कुबा दिवस
🎗️जागतिक हिरोशिमा दिन

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

👉1914 : पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले आणि ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
👉1926 : गर्ट्रूड एडरली ही इंग्लिश चॅनेल ओलांडणारी पहिली महिला ठरली.
👉1940 : सोव्हिएत युनियनने बेकायदेशीरपणे एस्टोनियाचा ताबा घेतला.
👉1945 : अमेरिकेने हिरोशिमा, जपानवर अणुबॉम्ब टाकला. इतिहासात प्रथमच अणुबॉम्बचा वापर करण्यात आला.
👉1952 : राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.
1960 : अमेरिकेच्या निर्बंधाला प्रतिसाद म्हणून, क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
👉1962 : जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
👉1990 : संयुक्त राष्ट्रांनी कुवेतला जोडण्यासाठी इराकवर व्यापार निर्बंध लादले.
👉1994 : डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
👉1997 : कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने 6 बाद 952 धावा केल्या. त्यात सनथ जयसूर्याने 340 धावा केल्या.
👉2010 : भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रदेशात भीषण पूर.

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

▶️1809 : ‘लॉर्ड टेनिसन’ – इंग्लिश कवी यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1892)
▶️1881 : ‘अलेक्झांडर फ्लेमिंग’ – पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 11 मार्च 1955)
▶️1900 : ‘सीसिल हॉवर्ड ग्रीन’ – टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 11 एप्रिल 2003)
▶️1925 : ‘योगिनी जोगळेकर’ – लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 1 नोव्हेंबर 2005)
▶️1933 : ‘ए जी कृपाल सिंग’ – भारतीय कसोटी क्रिकेटपटू यांचा जन्म.
▶️1959 : ‘राजेंद्र सिंग’ – भारतीय पर्यावरणवादी यांचा जन्म.
▶️1965 : ‘विशाल भारद्वाज’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
▶️1970 : ‘एम. नाईट श्यामलन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक यांचा जन्म.

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

➡️1925 : ‘सुरेंद्रनाथ बॅनर्जी’ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1848)
➡️1965 : ‘वसंत पवार’ – संगीतकार यांचे निधन.
➡️1991 : ‘शापूर बख्तियार’ – ईराणचे 74 वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 26 जून 1914)
➡️1997 : ‘वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1924)
➡️1999 : ‘कल्पनाथ राय’ – केन्द्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते यांचे निधन. (जन्म : 4 जानेवारी 1941)
➡️2001 : ‘कुमार चॅटर्जी’ – भारतीय नौदल प्रमुख आधार यांचे निधन.
➡️2019 : ‘सुषमा स्वराज’ – भारतीय महिला राजकारणी आणि भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या यांचे निधन.

🌍 🌍 जागतिक दिन लेख 🌍🌍

               जागतिक हिरोशिमा दिन

           जागतिक हिरोशिमा दिन दरवर्षी ६ ऑगस्टला साजरा केला जातो. हा दिवस १९४५ साली झालेल्या हिरोशिमा बॉम्बहल्ल्याची आठवण ठेवण्यासाठी आणि आण्विक शस्त्रांच्या वापराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आहे. ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने हिरोशिमा शहरावर ‘लिट्ल बॉय’ नावाचा आण्विक बॉम्ब सोडला. या बॉम्बहल्ल्यामुळे हजारो लोकांचा तात्काळ मृत्यू झाला आणि असंख्य लोक गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे दुसऱ्या महायुद्धाचा शेवट जवळ आला, पण त्याचबरोबर आण्विक शस्त्रांचे विनाशकारी परिणामही जगासमोर आले.
           हिरोशिमा दिनाच्या निमित्ताने जगभरात विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि शांतीमार्च आयोजित केले जातात. या कार्यक्रमांचा उद्देश आहे की आण्विक शस्त्रांच्या वापरावर बंदी आणावी आणि जगात शांती व स्थैर्य नांदावे. विशेषतः यामध्ये हिरोशिमा आणि नागासाकीच्या घटनांची माहिती दिली जाते, जेणेकरून भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये.
             हिरोशिमा दिन आपल्याला शांतीची आणि सहकार्याची आठवण करून देतो. हा दिवस एकत्र येऊन, मानवतेच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे, जगातील सर्व देशांनी आण्विक शस्त्रांचा त्याग करावा आणि एक शांतीपूर्ण भविष्य घडवावे, हीच या दिवसाची खरी भावना आहे.
           
        🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

  📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉   अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? – कोणत्याही गोष्टीला ठरावीक मर्यादा असते .

   ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉हमरीतुमरीवर येणे – जोराने भांडू लागणे .

  ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गाणे – अंगाई गीत.


🙏 प्रार्थना 🙏

              इतनी शक्ति हमें देना दाता

इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे हमसे, भूलकर भी कोई भूल हो ना

दूर अज्ञान के हो अँधेरे तू हमें ज्ञान की रौशनी दे
हर बुराई से बचके रहें हम जीतनी भी दे भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसी का किसी से भावना मन में बदले की हो ना !१!

इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे हमसे भूलकर भी कोई भूल हो ना

हम न सोचें हमें क्या मिला है हम ये सोचें क्या किया है अर्पण
फूल खुशियों के बांटें सभी को सबका जीवन ही बन जाए मधुवन
अपनी करुणा को जल तू बहा के कर दे पावन हर एक मन का कोना !२!
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे हमसे भूलकर भी कोई भूल हो ना

           
   🕐📝 बोधकथा 📝🕐

                 कष्टाची कमाई श्रेष्ठ असते

      एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्‍यांना एक साधू संत मादिरामध्ये झोपलेले दिसले. त्‍यांनी संताला उठवले व म्हणाले कि काही असेल तर द्या नाही तर मारून टाकले जाऊ.
संताने त्यांना विचारला तर त्या चोरांनी सांगितले कि आम्ही चोर आहोत.आम्ही चोरी करतो .हे ऐकून संत म्‍हनाले, तुम्‍ही करता ते चांगलेआहे की वाईट याचा कधी विचार केला ?
चोर म्‍हणाले,” आम्‍ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्‍ही तीन हिस्‍से मध्ये वाटतो. एक एक भाग आम्‍ही घेतो आणि तिसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो. हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले ”आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हीला हा कोंबडादेऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही.पण आता चोरापुढे प्रश्न पडला कि आता याचे हिस्‍से कसे करायचे. ते दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले.
संताने त्यांना आशय समजावून म्हाणाले कि चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्‍टाची कमाई करून त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवा. ते खरे सार्थक आहे .हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्‍कार करून
चोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले.

तात्‍पर्य :- पापाची कमाई दु:खाचे कारण बनते तर कष्‍टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्‍म्‍याला सुख देते.
                                                
📘 दिनांकानुसार पाढा :- ६ चा पाढा

                                  ६          ३६
                                  १२        ४२
                                  १८        ४८
                                  २४        ५४
                                  ३०        ६०

📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📝🕐🕐🕐📝📋📝📋📝📋📝📋📝
   

              🛑 प्रश्नावली १५२ 🛑

                

प्रश्न १. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या शहरात भरतो ?
उत्तर :- नाशिक.

प्रश्न २. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?
उत्तर :- रायगड.

प्रश्न ३. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत. ?
उत्तर :- सात.

प्रश्न ४. भारतीय राष्ट्रध्वजातील चक्राचे नाव काय ?
उत्तर :- अशोक चक्र.

प्रश्न ५. भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हटले जाते ?
उत्तर :- ए.पी.जे.अब्दुल कलाम.

प्रश्न ६. देहू व आळंदी ही गावे कोणत्या नदीकिनारी आहेत ?
उत्तर :- इंद्रायणी.

प्रश्न ७. नागपूर शहर कोणत्या नदी काठावर आहे ?
उत्तर :- नाग नदी.

प्रश्न ८. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर :- बाळशास्त्री जांभेकर.

प्रश्न ९. शिक्षणाचे माहेरघर कोणत्या शहरास म्हणतात ?
उत्तर :- पुणे.

प्रश्न १०. एका डझनमध्ये किती वस्तू असतात ?
उत्तर :- १२ ( बारा )

🙏🕐🙏🕐🙏🕐🙏🙏🕐🙏🕐🙏🕐🙏🙏🕐🙏🕐🙏🕐🙏🕐🙏🕐

             📝 व्यक्ती परिचय 📝


🛑 अण्णाभाऊ साठे
(१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९).

🔸कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक.

🔸मूळ नाव तुकाराम
🔸जन्मस्थळ वाटेगाव
(ता.वाळवा; जि. सांगली )
🔸त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले

🔸प्रभाव –
अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कार्ल मार्क्स यांचे साहित्य वाचून मिळाली.

🔸 मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले

🔸 वाटेगावात बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली 1942 च्या चले जाव आंदोलनात सहभाग ,अटक

🔸त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला.

🔸त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली

🔸‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

🔸संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील अण्णाभाऊ साठेंचं योगदान मोठं आहे. आपल्या शाहिरीतून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ज्योत पेटती ठेवली. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.

👉मोरारजी देसाई सरकारने त्यांच्या ‘माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची?’ या नाटिकेवर बंदी आणली होती. मात्र अण्णाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बंदी झुगारत तिचे प्रयोग सुरूच ठेवले आणि महाराष्ट्र पेटता ठेवला. ‘माझी मैना’ हे गाजलेलं गीत लिहून अण्णाभाऊंनी मुंबईबद्दलच्या सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

🔸\’लोकयुद्ध\’ साप्ताहिकात – वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम केले.

🔸‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ? ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये.

🔸अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.

🔸त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले
🎬 वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता )
🎬टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी )
🎬डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ )
🎬मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ )
🎬वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ )
🎬अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज )
🎬फकिरा (कादंबरी फकिरा ).

🔸इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.

👉त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २७ परकीय भाषांत भाषांतरे

🔸पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ( 1958,मुंबई )
\” पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या व कामगारांच्या तळहातावर तरली आहे\” असे त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितले

🔸मार्क्सवादी पक्षाच्या
\”Indian People\’s Theater Association\”(IPTA) या सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्षपद भूषविले.

🔸रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्याबरोबर मॉस्को(रशिया) दौरा.
तेथील अनुभवांवर आधारित \”माझा रशियाचाप्रवास\” हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.

🔸 ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला

🔸आपल्या लेखनाबद्दल
\’मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो तेच लिहितो, मला कल्पनेचे पंख लावता येत नाहीत, त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो\’ अशी स्वतःबद्दल अण्णाभाऊ साठे यांनी प्रांजळ कबुली दिली आहे.

🏵गौरवोद्वार

🖋 \”महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की\” –
ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव बागुल

               🙏धन्यवाद🙏

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *