\”ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.\” प्रश्नावली १५४\”. Prashnavali 154.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
10 Min Read

                 📖 वाचाल तर वाचाल 📖

\"\"

       📘📙परिपाठ 📙📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-  ८ ऑगस्ट २०२४

🔊🔊 आजचा वार:- गुरुवार

📙📘सुविचार :- राष्ट्राचा विचार करा व कामास लागा नुसत्या आहार विहारासाठी माणूस जन्म नाही.

📙📘📙 दिनविशेष.

✒️✒️ आजचा जागतिक दिन

🎗️आंतरराष्ट्रीय मांजर दिवस
🎗️आंतरराष्ट्रीय सहकार्य दिवस

आजचा दिनविशेष – घटना
👉1509 : कृष्णदेव राय विजयनगरचा सम्राट झाला.
👉1942 : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा क्रांतिकारी पर्व मुंबईतून सुरू झाला.
👉1648 : स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खलात-बैलसरच्या लढाईत शिवाजीराजांनी आदिल शाहच्या सरदार फत्तेह खानच्या सैन्याचा पराभव केला.
👉1908 : विलो राइटने पहिले उड्डाण केले.
👉1942 : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.
👉1963 : 15 जणांच्या टोळीने इंग्लंडमध्ये ट्रेन लुटली आणि 26 लाख पौन्ड पळवले.
👉1967 : इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर आणि थायलंड यांनी आसियान (दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना) स्थापन केली.
👉1985 : भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.
👉1994 : डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन, महिलांसाठी देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय, पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने सुरू केले.
👉1998 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या करण्यात आल्या.
👉2000 : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्यातील वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर झाला.
👉2008 : चीनमधील बिंगजिंग येथे 29व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

➡️1078 : ‘होरिकावा’ – जपानी सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 1107)
➡️1879 : ‘डॉ. बॉब स्मिथ’ – अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 16 नोव्हेंबर 1950)
➡️1902 : ‘पॉल डायरॅक’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑक्टोबर 1984)
➡️1912 : ‘बी. व्ही. रमण’ – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1998)
➡️1912 : ‘तुकाराम केरबा वडणगेकर’ – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज यांचा जन्म. (मृत्यू: 31 मार्च 2004)
➡️1925 : ‘डॉ. वि. ग. भिडे’ – शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु पद्मश्री यांचा जन्म.
➡️1926 : ‘शंकर पाटील’ – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1994)
➡️1932 : ‘दादा कोंडके’ – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 1998)
➡️1934 : ‘शरत पुजारी’ – भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 12 मे 2014)
➡️1940 : ‘दिलीप सरदेसाई’ – क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 2 जुलै 2007)
➡️1950 : ‘केन कुटारगी’ – प्लेस्टेशन चे निर्माते यांचा जन्म.
➡️1952 : ‘सुधाकर राव’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
➡️1968 : ‘ऍबे कुरिविला’ – भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक यांचा जन्म.
➡️1981 : ‘रॉजर फेडरर’ – स्विस लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
➡️1989 : ‘प्राजक्ता माळी’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
▶️1827 : ‘जॉर्ज कॅनिंग’ – ब्रिटनचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 11 एप्रिल 1770)
▶️1897 : ‘व्हिक्टर मेयर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 8 सप्टेंबर 1848)
🌍1998 : ‘डॉ. सुमती क्षेत्रमाडे’ – लेखिका व कादंबरीकार यांचे निधन.
▶️1999 : ‘गजानन नरहर सरपोतदार’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन.




🌍 🌍 जागतिक दिन लेख 🌍🌍

                  आंतरराष्ट्रीय सहकार्य दिवस
             आंतरराष्ट्रीय सहकार्य दिवस हा विविधतेला आणि समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी, विविध समाजघटकांनी एकत्र येऊन एकमेकांना समर्थन देण्याची आणि सहकार्याची भूमिका बजावण्याची महत्त्वाची आवश्यकता लक्षात आणून दिली जाते. अल्पसंख्यांक, वंचित वर्ग यांना सहकार्य देणे आणि त्यांच्या हक्कांची मान्यता मिळवून देणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या माध्यमातून लोकांमध्ये सहकार्याची भावना वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्य दिवस साजरा करून आपण विविधतेचे स्वागत करतो आणि एकजूट व सदभावनेने समाजाला अधिक समावेशक बनवतो. हाच दिवस आपल्याला आठवण करून देतो की, एकत्रित प्रयत्नानेच आपण अधिक न्यायपूर्ण आणि समावेशक समाजाची निर्मिती करू शकतो.
                                         
        🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

  📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉   अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप – अतिशय उतावळेपणाची कृती .

   ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉 हरभऱ्याच्या झाडावर चढवणे – खोटी स्तुती करून मोठेपणा देणे .

  ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 कोणत्याही पक्षात सामील न होणारा – अपक्ष

              🙏 प्रार्थना 🙏

     सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु

सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु,
करते हैं हम शुरु आज का काम प्रभु,
सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु,
करते हैं हम शुरु आज का काम प्रभु,

शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाएं हम,
विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम,
हाँ, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम,
तुम्ही से है आगाज़ तुम्हीं से अंजाम प्रभु,
करते है हम शुरु आज का काम प्रभु,
सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु,
करते हैं हम शुरु आज का काम प्रभु,

गुरुओं का सत्कार कभी न भूले हम,
इतना बनें महान गगन को छु ले हम,
हाँ, इतना बनें महान गगन को छु ले हम,
तुम्हीं से है हर सुबह तुम्ही से शाम प्रभु,
करते है हम शुरु आज का काम प्रभु,
सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु,
करते हैं हम शुरु आज का काम प्रभु,           

          
                🕐📝 बोधकथा 📝🕐

                         श्रीमंत व्यापारी
एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता.
        तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला आहेत रोगांनी विळखा घातला.
तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टराकडे जाण्याची वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले.
        एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूम मध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नौकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले.
अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्ह्यायाला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, \”मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे.\”
तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, \”तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.
आत्मा म्हणाली, \”माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसित झाले आहे.\”
\”तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे. आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही.\” एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली.

तात्पर्य: शरीर व चांगले स्वास्थ ही सर्वात मोठी संपत्ती आहे.
                                                                     
📘 दिनांकानुसार पाढा :- ८ चा पाढा

                                  ८          ४८
                                  १६        ५६
                                  २४        ६४
                                  ३२        ७२
                                  ४०        ८०

🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐📝📝📝📝📝📝📝🕐🕐🕐🕐🕐🕐🕐



 

             🛑 प्रश्नावली 🛑

            आपला भारत भाग – १

प्रश्न १.भारताची राजधानी कोणती ? 
उत्तर :- दिल्ली

प्रश्न २.भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ?
उत्तर :- तिरंगा

प्रश्न ३.भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ?
उत्तर :- त्रिमुख सिंह

प्रश्न ४.भारताचे बोधवाक्य कोणते आहे ?
उत्तर :- सत्यमेव जयते

प्रश्न ५.भारताचे राष्ट्रगीत कोणते ? 
उत्तर :- जन गण मन

प्रश्न ६. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ?
उत्तर :- कमळ

प्रश्न ७.भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर :- मोर

प्रश्न ८.भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? 
उत्तर :-वाघ

प्रश्न ९.भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?
उत्तर :-वंदे मातरम

प्रश्न १०.भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे ?
उत्तर :- हिंदी

📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋📖📋

👉 आपल्या माहितीसाठी.

📘📙 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे

📰 1920 : मूकनायक सुरु

🔱  1924 : बहिष्कृत हितकारणी सभा

📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु

🔱 1927 : समता समाज संघ

📰 1928 : समता पाक्षिक सुरु

📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु

🔱  1936 : स्वतंत्र मजूर पक्ष

🔱  1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.

🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन

🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन

🔱  1951 : भारतीय बौद्ध महासभा

📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *