📖 वाचाल तर वाचाल 📖
📙📘परिपाठ📘📙
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- १७ ऑगस्ट २०२४
🔊🔊 आजचा वार:- शनिवार
📙📘सुविचार :- आळस आणि अति झोप हे दारिद्र्याला जन्म देतात.
📙📘📙 दिनविशेष
🌍 आजचा जागतिक दिन
🎗️जागतिक मधमाशी दिन
🎗️आंतरराष्ट्रीय बेघर प्राणी दिन
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना :
👉1666 : शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून निसटले.
👉1836 : जन्म नोंदणी कायदा ब्रिटिश संसदेने मंजूर केला आणि 1837 मध्ये अंमलात आला.
👉1945 : इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
👉1953 : नार्कोटिक्स एनोनिमसने दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पहिली बैठक घेतली.
👉1982 : पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.
👉1988 : पाकिस्तानचे 6 वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया-उल-हक आणि पाकिस्तानमधील अमेरिकेचे राजदूत अरनॉल्ड राफेल यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.
👉1997 : उस्ताद अली अकबर खान यांना यूएस राष्ट्रीय वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
👉1999 : तुर्कीच्या इझमित शहराजवळ 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप. 17,000 ठार, 44,000 जखमी.
👉2008 : एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत आठ सुवर्णपदके जिंकणारा मायकेल फेल्प्स हा पहिला खेळाडू ठरला.
✒️✒️. आजचा दिनविशेष – जन्म
➡️1761 : ‘पं. विल्यम केरी’ – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक यांचा जन्म. (मृत्यू : 9 जून 1834)
➡️1844 : ‘मेनेलेक (दुसरा)’ – इथियोपियाचा सम्राट यांचा जन्म.
➡️1866 : ‘मीर महबूब अली खान’ – हैदराबादचा सहावा निजाम यांचा जन्म. (मृत्यू : 29 ऑगस्ट 1911)
➡️1888 : ‘बाबूराव जगताप’ – श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक यांचा जन्म.
➡️1893 : ‘मे वेस्ट’ – हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 1980)
➡️1905 : ‘शंकर गणेश दाते’ – ग्रंथसूचीकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 डिसेंबर 1964)
➡️1916 : ‘डॉ. विनायक पेंडसे’ – ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 19 ऑगस्ट 1975)
➡️1926 : ‘जिआंग झिमिन’ – चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव यांचा जन्म.
➡️1932 : ‘व्ही. एस. नायपॉल’ – नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक यांचा जन्म.
➡️1944 : ‘लैरी एलिसन’ – ओरॅकल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक यांचा जन्म.
➡️1949 : ‘निनाद बेडेकर’ – इतिहास संशोधक यांचा जन्म.
➡️1957 : ‘सचिन पिळगांवकर’ – मराठी चित्रपट अभिनेते, निर्माते यांचा जन्म.
➡️1967 : ‘सुप्रिया पिळगांवकर’ – मराठी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
➡️1970 : अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
▶️1304 : ‘गोफुकाकुसा’ – जपानी सम्राट यांचे निधन.
▶️1850 : ‘जोस डे सान मार्टिन’ – पेरू देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 25 फेब्रुवारी 1778)
▶️1909 : ‘मदनलाल धिंग्रा’ – क्रांतीकारक यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 1883)
▶️1924 : ‘टॉम केन्डॉल’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचे निधन.
▶️1988 : ‘मुहम्मद झिया उल हक’ – पाकिस्तानचे 6 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 12 ऑगस्ट 1924)
🌍🌍 – जागतिक दिन लेख
🌍 जागतिक मधमाशी दिन
जागतिक मधमाशी दिन (World Honey Bee Day) हा दिवस दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश मधमाश्यांचे पर्यावरणातील महत्त्व, त्यांचे संरक्षण आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.
मधमाश्या या पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाच्या परागीकरण करणाऱ्या कीटकांपैकी एक आहेत. त्या झाडांच्या फुलांमधील परागकण एकमेकांमध्ये नेऊन फळे आणि बियांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे शेतीसाठी मधमाश्यांचे योगदान अनमोल आहे. परंतु, सध्या पर्यावरणातील बदल, रासायनिक कीटकनाशकांचा वापर आणि जंगलतोड यामुळे मधमाश्यांची संख्या कमी होत चालली आहे.
जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने, आपण सर्वांनी एकत्र येऊन मधमाश्यांचे संरक्षण कसे करता येईल याचा विचार करावा. जैविक शेतीला प्रोत्साहन देणे, विषारी रसायनांचा वापर टाळणे, आणि मधमाश्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे या गोष्टींमध्ये आपला सहभाग असावा.
मधमाश्यांचे संवर्धन हे केवळ पर्यावरणासाठीच नाही तर मानवी अन्नसाखळीसाठीदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने, आपण या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या कीटकांसाठी आपली जबाबदारी ओळखून त्यांचे रक्षण करूया.
🌍 आंतरराष्ट्रीय बेघर प्राणी दिन
आंतरराष्ट्रीय बेघर प्राणी दिन (International Homeless Animal Day) दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश बेघर प्राण्यांच्या समस्येवर जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी उपाययोजना शोधणे हा आहे.
आपल्या आजूबाजूला अनेक प्राणी बेघर, भुकेले, आणि आधारविहीन असतात. यामध्ये कुत्री, मांजरी, आणि इतर पाळीव प्राणी मोठ्या संख्येने असतात. या प्राण्यांना योग्य अन्न, निवारा, आणि उपचार मिळणे ही मोठी समस्या आहे. बेघर प्राण्यांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे पाळीव प्राण्यांचे अयोग्य व्यवस्थापन, त्यांच्या संख्येवर नियंत्रण नसणे, आणि समाजातील संवेदनशीलतेचा अभाव.
आंतरराष्ट्रीय बेघर प्राणी दिनाच्या निमित्ताने, आपण सर्वांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहायला हवे. प्राण्यांना पाळण्याआधी त्यांची योग्य जबाबदारी घेण्याची तयारी असावी, पाळीव प्राण्यांची नसबंदी करावी, आणि जे प्राणी बेघर आहेत त्यांच्यासाठी आवास, अन्न आणि उपचाराची व्यवस्था करावी.
या दिवशी, विविध संस्था आणि स्वयंसेवक प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करतात, जनजागृती मोहिमा राबवतात आणि बेघर प्राण्यांसाठी मदत करतात. आपणही या कार्यात सहभागी होऊन या प्राण्यांना एक चांगले जीवन देण्यासाठी आपले योगदान देऊ शकतो.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 कधी तुपाशी तर कधी उपाशी – सांसारिक स्थिती नेहमीच सारखी राहत नाही .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 हस्तगत करणे – ताब्यात घेणे .
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 शिस्तीची आवड असणारा – शिस्तप्रिय
🙏 प्रार्थना 🙏
या लाडक्या मुलांनो
या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार ।
नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार ॥धृ।।
आईस देव माना, वंदा गुरुजनांना।
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा ।
गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥१॥
शिवबापरी जगांत, दिलदार थोर व्हावे।
टिळकापरी सदैव, ध्येयास त्या स्मरावें।
जे चांगलें जगी या, त्याचा करा स्वीकार।।२।।
शाळेत रोज जाता, ते ज्ञान-बिंदु मिळवा।
हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा।
कुलशील थोर माना, ठेवू नका विकार ॥३॥
🕐📝 बोधकथा 📝🕐
प्रामाणिक लाकूडतोड्या
एका गावामध्ये एक लाकूडतोड्या राहत होता. लाकूडतोडून आपला संसार चालत होता. एके दिवशी तो झाड शोधत एका नदीकाठी गेला त्याला एक मोठे झाड सापडले तो त्या झाडावर फांदी तोडण्यासाठी चढला आणि फांदी तोडू लागला.अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली नदीत पडली.त्याच्याजवळ दुसरी कुराड घेणे इतपत ही पैसे नव्हते तो खूप निरास झाला आणि नदीकाठी येऊन रडू नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकून प्रकट झाली आणि त्याला विचारू लागली की का रे तू रडत आहेस. लाकूडतोड्या सरिता देवीला आपली कुऱ्हाड नदीत पडली असे सांगतो.
सरिता देवी लगेच नदीत बुडी घेऊन हातात सोन्याची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते आणि लाकूडतोड्याला विचारते ही आहे का तुझी कुऱ्हाड. लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो देवी ही माझी कुऱ्हाड नाही मग देवी त्याला चांदीची खुराक दाखवणे तो परत मान हलवून ही देखील नाही कुऱ्हाड माझी देवीला सांग.
आता देवी पुन्हा बुडी घेऊन नदीत जाते व लोखंडाची खुराक घेऊन प्रकट होते इतक्यात लाकूडतोड्या म्हणतो होय हीच माझी कुऱ्हाड आहे देवी.
देवी म्हणते तू खूप प्रामाणिक आहे या प्रामाणिकपणामुळे या तीनही कुऱ्हाडी तुलाच बक्षीस स्वरूपात ठेव.
तात्पर्य:- प्रामाणिकपणाची फळे ही गोडच असतात त्यामुळे नेहमी खरे बोलावे.
📘 दिनांकानुसार पाढा :- १७ चा पाढा
१७ १०२
३४ ११९
५१ १३६
६८ १५३
८६ १७०
📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📋📝📋📝📋
🛑 प्रश्नावली १५९ 🛑
प्रश्न १. 1 सेमी म्हणजे किती मिमी ?
उत्तर :- 10 मिमी
प्रश्न २. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?
उत्तर :- धारावी, मुंबई
प्रश्न ३. आंतरराष्ट्रीय भाषा कोणती ?
उत्तर :- इंग्रजी
प्रश्न ४. मानवी मेंदूचे वजन किती असते ?
उत्तर :- 1350 ग्रॅम (1300 ते 1400 ग्रॅम)
प्रश्न ५. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- डॉ बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न ६. विदर्भातील एकूण जिल्हे किती ?
उत्तर :- 11
प्रश्न ७. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी \’ज्ञानेश्वरी\’ हा ग्रंथ कोठे लिहिला ?
उत्तर :- नेवासे (अहमदनगर)
प्रश्न ८. \’चंदीगड\’ ही कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे ?
उत्तर :- पंजाब व हरियाणा
प्रस्न ९. भारतात सहारा हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तर :- मुंबई
प्रश्न १० लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?
उत्तर :-मीटर
📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘
👉 आपल्या माहितीसाठी
ऑगस्ट महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस.
🔷१ ऑगस्ट -जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन
🔷१ ऑगस्ट -महसूल दिन
🔷१ ऑगस्ट -मुस्लिम महिला हक्क दिन
(तिहेरी तलाकच्या प्रथेवर बंदी घालणारा \’मुस्लिम महिला विवाहावरील हक्कांचे संरक्षण कायदा २०१९\’ लागू झाल्याच्या स्मरणार्थ २०२० पासून साजरा केला जातो.)
🔷१ ऑगस्ट – वर्ल्ड वाइड वेब दिन
🔷३ ऑगस्ट – भारतीय अवयव दान दिन
🔷६ ऑगस्ट – हिरोशिमा दिन
🔷७ ऑगस्ट -भालाफेक दिन
(अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राच्या ऐतिहासिक सुवर्णपदकाच्या स्मरणार्थ ७ ऑगस्ट हा राष्ट्रीय भाला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.)
🔷७ ऑगस्ट – राष्ट्रीय हातमाग दिन
🔷९ ऑगस्ट – जागतिक आदिवासी दिवस
🔷९ ऑगस्ट – नागासाकी दिन
🔷१० ऑगस्ट – जागतिक जैवइंधन दिन
🔷१० ऑगस्ट – जागतिक सिंह दिन
🔷१२ ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय युवा दिन
🔷१२ ऑगस्ट – जागतिक हत्ती दिन
🔷१९ ऑगस्ट – जागतिक फोटोग्राफी दिन
🔷२० ऑगस्ट – अक्षय ऊर्जा दिवस
🔷२० – सद्भावना दिवस (राजीव गांधी जयंती)
🔷२१ ऑगस्ट- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
🔷२९ ऑगस्ट -राष्ट्रीय क्रीडा दिन
(हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन)
🔷२९ ऑगस्ट- आंतरराष्ट्रीय अणु चाचण्यांविरुद्ध दिवस
🔷३१ ऑगस्ट- जागतिक संस्कृत दिन