📖 वाचाल तर वाचाल 📖
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- १९ ऑगस्ट २०२४
🔊🔊 आजचा वार:- सोमवार
📙📘सुविचार :- स्वतःला ओळखा आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
📙📘📙 दिनविशेष
🌍 आजचा जागतिक दिन :
🎗️जागतिक मानवतावादी दिवस
🎗️जागतिक छायाचित्रण दिन
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
▶️1856 : गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट.
▶️1909 : इंडियानापोलिस मोटर स्पीडवे ऑटोमोबाईल रेसिंगसाठी उघडला. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात विल्यम बोर्क आणि त्याचा मेकॅनिक मारला जातो
▶️1919 : अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
▶️1945 : व्हिएतनाममध्ये ‘हो ची मिन्ह’ सत्तेवर आले.
👉1991 : सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म
👉1871 : ‘ऑर्व्हिल राइट’ – विल्बर राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते यांचा जन्म. (मृत्यू : 30 जानेवारी 1948)
👉1878 : ‘मनुएल क्वेझोन’ – फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
👉1883 : ‘जोसेमेंडेस काबेसादास’ – पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
👉1883 : ‘कोको चॅनेल’ – चॅनेल कंपनी चे संस्थापिका यांचा जन्म. (मृत्यू : 10 जानेवारी 1971)
👉1886 : ‘मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर’ – स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जानेवारी 1935)
👉1887 : ‘एस. सत्यमूर्ति’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 28 मार्च 1943)
👉1903 : ‘गंगाधरदेवराव खानोलकर’ – लेखक चरित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 सप्टेंबर 1992)
👉1907 : ‘सरदारस्वर्ण सिंग’ – केंद्रीय मंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑक्टोबर 1994)
👉1907 : ‘हजारी प्रसाद द्विवेदी’ – भारतीय इतिहासकार, लेखक, आणि विद्वान यांचा जन्म. (मृत्यू : 19 मे 1979)
👉1913 : ‘पीटर केम्प’ – भारतीय-इंग्लिश सैनिक व लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑक्टोबर 1993)
👉1918 : ‘शंकरदयाळ शर्मा’ – भारताचे 9वे राष्ट्रपती आणि 8वे उपराष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 26 डिसेंबर 1999)
👉1921 : ‘जीन रॉडेनबेरी’ – स्टार ट्रेक कथानकाचे निर्माते यांचा जन्म.
👉1922 : ‘बबनराव नावडीकर’ – मराठी गायक यांचा जन्म.
👉1946 : ‘बिल क्लिंटन’ – अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
👉1967 : ‘खांड्रो रिनपोछे’ – भारतीय आध्यात्मिक नेते यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
➡️1493 : ‘फ्रेडरिक (तिसरा)’ – पवित्र रोमन सम्राट यांचे निधन.
➡️1662 : ‘ब्लेझ पास्कल’ – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 19 जून 1623)
➡️1954 : ‘ऍल्सिदेदि गॅस्पेरी’ – इटलीचे पंतप्रधान यांचे निधन.
➡️1947 : ‘मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1906)
➡️1975 : ‘डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे’ – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 ऑगस्ट 1916)
➡️1990 : ‘रा. के. लेले’ – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक यांचे निधन.
➡️1993 : ‘उत्पल दत्त’ – रंगभूमी आणि चित्रपट कलाकार यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1929)
➡️1993 : ‘य. द. लोकुरकर’ – निर्भिड पत्रकार यांचे निधन.
➡️1994 : ‘लिनसकार्ल पॉलिंग’ – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1901)
🎗️2000 : ‘बिनेंश्वर ब्रह्मा’ – भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1948)
➡️2015 : ‘सनत मेहता’ – भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी यांचे निधन.
जागतिक दिन लेख
🌍 जागतिक मानवतावादी दिवस
जागतिक मानवतावादी दिवस दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील मानवतावादी कार्यकर्त्यांच्या साहस आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे, जे संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी अविरत कार्य करतात. या दिवशी, 2003 मध्ये बगदादमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात 22 लोकांचा बळी गेला होता. त्यापैकी सर्जिओ विएरा डी मेलो हे संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी होते, ज्यांचे योगदान मानवी हक्कांसाठी खूप मोलाचे होते.
मानवतावादी कार्यकर्ते आपत्ती, युद्ध, आणि गरिबी यांसारख्या कठीण परिस्थितीत काम करतात. त्यांचा उद्देश म्हणजे पीडितांना मदत करणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यांचे अधिकार संरक्षित करणे. या कार्यामध्ये त्यांना अनेक धोके आणि अडचणींना तोंड द्यावे लागते, परंतु त्यांची निष्ठा आणि समर्पण अद्वितीय असते.
जागतिक मानवतावादी दिवस आपल्याला या निःस्वार्थ कार्यकर्त्यांचे आभार मानण्याची संधी देतो. त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण आपल्या जगासाठी एक प्रेरणा आहे. या दिवशी, आपण त्यांच्या साहसाची आणि मानवीय मूल्यांच्या जपणुकीची आठवण ठेवून त्यांना सलाम करतो.
🎥 जागतिक छायाचित्रण दिन 🎥
जागतिक छायाचित्रण दिन दरवर्षी 19 ऑगस्टला साजरा केला जातो. 1839 साली फ्रेंच शास्त्रज्ञ लुई दागेर यांनी ‘दागेरोटाइप’ ही पहिली छायाचित्रण पद्धत विकसित केली, त्या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस निवडला गेला आहे. छायाचित्रण कला आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ही एक क्रांतिकारक घटना ठरली.
छायाचित्रण हे केवळ क्षणांचे जतन करण्याचे साधन नाही, तर विचार व्यक्त करण्याचा एक प्रभावी मार्ग देखील आहे. एका छायाचित्राद्वारे एखादी कथा सांगता येते, भावना व्यक्त करता येतात आणि सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटकांचे दस्तावेजीकरण करता येते. आजच्या डिजिटल युगात छायाचित्रण हे अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक झाले आहे. स्मार्टफोन आणि डिजिटल कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येकजण छायाचित्रकार होऊ शकतो.
जागतिक छायाचित्रण दिन हा दिवस छायाचित्रणाच्या महत्वाची आठवण करून देतो आणि छायाचित्रकारांना प्रेरणा देतो. हा दिवस विविध उपक्रम, कार्यशाळा आणि प्रदर्शने यांचे आयोजन करून छायाचित्रकारांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आणि नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. छायाचित्रणाने जगाला एक वेगळा दृष्टिकोन दिला आहे आणि तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरला आहे
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 उचलली जीभ लावली टाळ्याला – दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 हात झटकणे- नामानिराळा होणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 ऐकायला येत नाही असा – बहिरा
🙏 प्रार्थना 🙏
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार तुझ्या दयादातृत्वाला अंत नाहि पार।। असो….।।
तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची तुझ्या कृपेने रे होतिल मोति मृत्तिकेची तुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हार असो तुला देवा! माझा सदा नमस्कार।।
तुझ्या कृपेने रे होइल उषा त्या निशेची तुझ्या कृपेने रे होइल सुधा त्या विषाची तुझ्या कृपेने रे होइल पंगु सिधुपार असो तुला देवा! माझा सदा नमस्कार।।
तुझ्या कृपासिंधूमधला बिंदु जरि मिळेल तरि प्रभो! शतजन्मांची मतृषा शमेल तुझे म्हणुनि आलो राया! बघत बघत दार असो तुला देवा! माझा सदा नमस्कार।।
📖 बोधकथा 📖
मातेचा उपदेश
एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, \”ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!\’ भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो\’ त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही. *
तात्पर्य :- जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणांची जोड द्यावी लागते.
📘 दिनांकानुसार पाढा :- १९ चा पाढा
१९ ११४
३८ १३३
५७ १५२
७६ १७१
९५ १९०
📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📋📝📋📋
🛑 प्रश्नावली १६० 🛑
प्रश्न १. सात बेटांचे शहर कुणाला म्हणतात?
उत्तर :- मुंबई
प्रश्न २. भारतातले पहिले परवानाधारक वैमानिक कोण?
उत्तर :- जे. आर. डी. टाटा
प्रश्न ३. नोबेल सन्मानाचे पहिले भारतीय मानकरी सांगा?
उत्तर :- रवींद्रनाथ टागोर
प्रश्न ४. कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात ?
उत्तर :- उंट
प्रश्न ५. गोपाळ हरी देशमुख यांचे टोपणनाव काय ?
उत्तर :- लोकहितवादी
प्रश्न ६. स्काऊट गाईडच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात?
उत्तर :- जांबोरी
प्रश्न ७.द्रव पदार्थ मोजण्याचे परिमाण कोणते ?
उत्तर :- लीटर
प्रश्न ८. दर महिन्याला प्रसिध्द होणारे ?
उत्तर :- मासिक
प्रश्न ९.भारत देश कोणत्या गोलार्धात आहे.?
उत्तर :- उत्तर गोलार्ध
प्रश्न १०. रंकाळा तलाव कोठे आहे ?
उत्तर :- कोल्हापूर
🕐📋🕐🕐📋🕐📋🕐🕐📋🕐📋🕐📋🕐🕐📋🕐📋🕐🕐📋📋
आपल्या माहितीसाठी.
साहित्यिकांची टोपणनावे.
● अनंत फंदी –शाहीर अनंत घोलप
● अनंततनय –दत्तात्रय अनंत आपटे
● अनिरुध्द पुनर्वसू — नारायण गजानन आठवले
● अनिल — आत्माराम रावजी देशपांडे
● अमरशेख — मेहबूब पठाण
● अज्ञातवासी — दिनकर गंगाधर केळकर
● आनंद — वि.ल.बर्वे
● आरती प्रभु –चिंतामण त्र्यंबक खानोलकर
● काव्यविहारी — धोंडो वासुदेव गद्रे
● कुंजविहारी –हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
● कुमुद —स.अ.शुक्ल
● कुसुमाग्रज –वि.वा.शिरवाडकर
● कृष्णकुमार –सेतू माधव पगडी
● केशवकुमार — प्र.के. अत्रे
● करिश्मा — न.रा.फाटक
● केशवसुत — कृष्णाजी केशव दामले
● गदिमा —ग.दि.माडगुळकर
● गिरीश —शंकर केशव कानेटकर
● ग्रेस –माणिक शंकर गोडघाटे
● गोल्या घुबड — विष्णुशास्त्री चिपळूणकर
● गोविंद —गोविंद त्र्यंबक दरेकर
● गोविंदाग्रज –राम गणेश गडकरी
● चंद्रिका /चंद्रशेखर —-शिवराम महादेव गो-हे
● चारुता सागर — दिनकर दत्तात्रय भोसले
● छोटा गंधर्व —सौदागर नागनाथ गोरे
● बालगंधर्व –नारायणराव राजहंस
● जीवन —संजीवनी मराठे
● ठणठणपाल/अलाणे -फलाणे —जयवंत दळवी
● तुकडोजी महाराज —माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट
● संत तुकाराम —-तुकाराम बोल्होबा अंबिले
● तुकाराम शेंगदाणे —-ज्ञानेश्वर नाडकर्णी
● दत्त (कवी) —-दत्तत्रय कोंडदेव घाटे
● दया पवार (कवी) –दगडू मारुती पवार
● जागल्या (कथालेखक)–दगडू मारुती पवार
● दक्षकर्ण –अशोक रानडे
● दादुमिया –दा.वि.नेने
● दासोपंत —दासोपंत दिगंबर देशपांडे
● दिवाकर –शंकर काशिनाथ गर्गे
● दिवाकर कृष्ण —दिवाकर कृष्ण केळकर
● धनुर्धारी –रा.वि.टिकेकर
● धुंडिराज –मो.ग.रांगणेकर
● नागेश –नागेश गणेश नवरे
● नाथमाधव —-व्दारकानाथ माधवराव पितके
● निशिगंध —-रा.श्री.जोग
● पद्मा —-पद्मा विष्णू गोळे
● पराशंर —लक्ष्मणराव सरदेसाई
● पी.सावळाराम —निवृत्ती रावजी पाटील
● पुष्पदंत —प्र.न.जोशी
● प्रफुल्लदत्त –दत्तात्रय विष्णू तेंडोलकर
● प्रभाकर (शाहीर) –प्रभाकर जनार्दन दातार
● फडकरी —पुरूषोत्तम धाक्रस
● फरिश्ता —न. रा. फाटक
● बाकीबा —-बाळकृष्ण भगवंत बोरकर
● बाबा कदम —वीरसेन आनंद कदम
● बाबुराव अर्नाळकर –चंद्रकांत सखाराम चव्हाण
● बाबुलनाथ —-वि.शा.काळे
● बालकवी –त्र्यंबक बापूजी ठोंबरे
● बाळकराम (विनोदासाठी) ——-राम गणेश गडकरी
● बी —नारायण मुरलीधर गुप्ते
● बी रघुनाथ ——भगवान रघुनाथ कुलकर्णी
● बंधुमाधव –बंधु माधव मोडक (कांबळे)
● भटक्या –प्रमोद नवलकर
● भाऊ पाध्ये –प्रभाकर नारायण पाध्ये
● भानुदास –कृष्णाजी विनायक पोटे
● भानुदास रोहेकर –लीला भागवत
● भालचंद्र नेमाडे —भागवत वना नेमाडे
● मकरंद –बा.सी.मर्ढेकर
● मंगलमूर्ती —मो.ग.रांगणेकर
● मनमोहन –गोपाळ नरहर नातू
● लोककवी श्री मनमोहन–मीनाक्षी दादरकर
● माधव ज्युलियन –माधव त्र्यंबक पटवर्धन
● माधवानुज —डॉ. काशिनाथ हरि मोडक
● मामा वरेरकर ——-भार्गव विट्ठल वरेरकर
● मधू दारूवाला —म.पा.भावे
● मिलिंद माधव —- कॅ. मा कृ. शिंदे