\”ज्ञानाची वारी आली आपल्या दरी.\” प्रश्नावली १६०. Prashnavali 160.
📖 वाचाल तर वाचाल 📖
📙📘परिपाठ📘📙
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २० ऑगस्ट २०२४
🔊🔊 आजचा वार:- मंगळवार
📙📘सुविचार :- मेहनतीशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही.
📙📘📙 दिनविशेष
🌍 आजचा जागतिक दिन
🎗️ जागतिक मच्छर दिवस
🎗️ आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिवहन दिन
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
👉1666 : छत्रपती शिवाजी राजाने दख्खनमध्ये प्रवेश करण्यासाठी बनावट कागदपत्रांसह ठाणे येथील नरवीर घाटी पार केली.
👉1828 : राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
👉1897 : सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
👉1914 : पहिले महायुद्ध – जर्मन सैन्याने ब्रुसेल्स शहर ताब्यात घेतले.
👉1920 : जगातील पहिले व्यावसायिक रेडिओ स्टेशन 8MK (आताचे WWJ) डेट्रॉईट, मिशिगन येथे उघडले.
👉1920 : नॅशनल फुटबॉल लीगची डेट्रॉइट येथे स्थापना.
👉1941 : दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भूमिगत चळवळ चिरडण्यासाठी जर्मन लोकांनी एका दिवसात 50,000 नागरिकांना अटक केली.
👉1953 : सोव्हिएत युनियनने कबूल केले की त्यांनी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
👉1960 : सेनेगलने मालीपासून आपले स्वातंत्र्य घोषित केले.
1977 : व्हॉयेजर 1 चे प्रक्षेपण.
👉1988 : 8 वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धविराम करारावर स्वाक्षरी झाली.
👉1991 : एस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र घोषित केले.
👉1992 : भारतात, मीतेई भाषा (अधिकृतपणे मणिपुरी भाषा म्हणून ओळखली जाते) अनुसूचित भाषांच्या यादीत समाविष्ट केली गेली आणि भारत सरकारच्या अधिकृत भाषांपैकी एक बनली.
👉1995 : फिरोजाबाद रेल्वे अपघातात 258 ठार.
👉2008 : कुस्तीपटू सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
▶️1779 : ‘जेकब बर्झेलिअस’ – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 7 ऑगस्ट 1848)
▶️1833 : ‘बेंजामिन हॅरिसन’ – अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 13 मार्च 1901)
▶️1896 : ‘गोस्त पाल’ – भारतीय फुटबॉल खेळाडू यांचा जन्म. (मृत्यू : 8 एप्रिल 1976)
▶️1940 : ‘रेक्स सेलर्स’ – भारतीय-ऑस्ट्रेलियन क्रिकेटर यांचा जन्म.
▶️1941 : ‘स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया’ – युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 11 मार्च 2006)
▶️1944 : ‘राजीव गांधी’ – भारताचे 6वे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू : 21 मे 1991)
▶️1946 : ‘एन. आर. नारायण मूर्ती’ – इन्फोसिस चे सहसंस्थापक यांचा जन्म.
▶️1986 : ‘तनिया सचदेव’ – भारतीय बुद्धिबळपटू यांचा जन्म.
▶️1987 : ‘झाकीर खान’ – भारतीय स्टँड-अप कॉमेडियन, लेखक, कवी, प्रस्तुतकर्ता आणि अभिनेता यांचा जन्म.
✒️✒️आजचा दिनविशेष – मृत्यू
➡️1939 : ‘एग्नेस गिबर्ने’ – भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक यांचे निधन. (जन्म : 19 नोव्हेंबर 1845)
➡️1984 : ‘रघुवीर भोपळे’ – सुप्रसिद्ध जादूगार यांचे निधन. (जन्म : 24 मे 1924)
➡️1985 : ‘हरचंदसिंग लोंगोवाल’ – अकाली दलाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 2 जानेवारी 1932)
➡️1988 : ‘माधवराव शिंदे’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक यांचे निधन.
➡️1997 : ‘प्रागजी डोस्सा’ – गुजराथी नाटककार लेखक यांचे निधन. (जन्म : 7 ऑक्टोबर 1907)
➡️2000 : ‘प्राणलाल मेहता’ – चित्रपट निर्माते यांचे निधन.
➡️2001 : ‘एम. आर. यार्दी’ – प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष यांचे निधन.
➡️2011 : ‘राम शरण शर्मा’ – भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1919)
➡️2013 : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर’ – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक यांचे निधन.
➡️2013 : ‘जयंत साळगावकर’ – ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक यांचे निधन. (जन्म : 1 फेब्रुवारी 1929)
➡️2014 : ‘बी. के. अय्यंगार’ – भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 14 नोव्हेंबर 1918)
🌍🌍 जागतिक दिन लेख :
🌍 आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिवहन दिन
आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिवहन दिन दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस वैद्यकीय परिवहन सेवांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. रुग्णांच्या त्वरित आणि सुरक्षित वाहतुकीसाठी या कर्मचाऱ्यांचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. अॅम्बुलन्स चालक, वैद्यकीय वाहतूक कर्मचारी, आणि वैद्यकीय एअरलिफ्ट टीम्स या सर्वांची भूमिका रुग्णांच्या जीव वाचविण्यात महत्त्वाची असते.
आपत्कालीन परिस्थितीत किंवा गंभीर आजारांच्या वेळी वैद्यकीय परिवहन सेवांचा महत्त्वपूर्ण वापर होतो. वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचवणे, आवश्यक रुग्णालयात रुग्णाला जलद पोहोचवणे, तसेच रक्त, अवयव आणि औषधांची वाहतूक करणे या सर्व गोष्टींसाठी या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या कामामुळे अनेक जणांचे जीव वाचतात आणि गंभीर परिस्थितीत रुग्णांना योग्य उपचार मिळतात.
या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाला ओळखणे, त्यांचे कौतुक करणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. वैद्यकीय परिवहन सेवांचा वापर जगभरात विविध आपत्कालीन परिस्थितीत केला जातो, आणि त्यांना दिलेला योग्य सन्मान त्यांच्या कार्यासाठी प्रेरणादायक ठरतो. हा दिवस त्यांच्या अविरत कार्याला सलाम करण्याचा दिवस आहे.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 करावे तसे भरावे – जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 उत्तराचे दिवे जळणे – भरपूर उधळपट्टी करणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 दुसऱ्याच्या मनातली ओळखणारा – मनकवडा
🙏 प्रार्थना 🙏
हीच अमुची प्रार्थना
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
📖 बोधकथा 📖
हुशार शेतकरी
एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होती. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई. वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते. एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो. मध्ये गेल्यावरती तो शेळी साठी एक गवताची पेंडी तयार करतो. व खूप पाऊस चालू होतो. त्याला घरी येता वेळेस नदी पार करून यावे लागत.
नदीला खूप पूर आला होता. शेतकरी शेळी वाघ व गवताची पेंढी घेऊन नदीकिनारी येतो. काही सुचत नाही की आता नदी कशी पार करावी.काय करावे असे तो विचारात पडतो तो मदत होईल का ते पाहू लागतो.किनारी त्याला एक नाव दिसते तो त्या नावे जवळ जातो. एका वेळेस दोन जणांना घेऊन जाईल या अवस्थेत होती. शेतकऱ्यापुढे प्रश्न पडला की आपण यांना नदीकिनारी कसे घेऊन जावे. शेतकरी विचार करतो की आपण जर पहिल्यांदा गवताची पेंडी घेऊन गेलो तर वाघ शेळीला खाऊन टाकेल व वाघाला घेऊन गेलो शेळी गवत खाऊन टाकेल.
तो विचार करतो आणि नावे मध्ये शेळीला घेऊन दुसऱ्या टोकाला सोडून येतो. वाघाला घेतो आणि दुसऱ्या टोकावर ती सोडून येतो आता तो आधी आपल्यासोबत परत या टोकावर घेऊन येतो व गवताला घेऊन जातो,परत तो वापस येतो व शेळीला घेऊन जातो. अशी करून तो नदी सुखरूप पार करतो.
तात्पर्य : विचार करून काम केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही
📘 दिनांकानुसार पाढा :- २० चा पाढा
२० १२०
४० १४०
६० १६०
८० १८०
१०० २००
🕐📋🕐📋🕐📋🕐📋🕐📋🕐📋🕐📋🕐📋🕐📋🕐📋🕐📋🕐📋
📋 प्रश्नावली १६१ 📋
प्रश्न १. थर्मोकॉलच्या ताटांवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ?
उत्तर :- झारखंड.
प्रश्न २. देशातील पहिले आधार गाव कोणते ?
उत्तर :- टेंभली.(नंदूरबार)
प्रश्न ३.जागतिक जल दिन कधी साजरा करतात ?
उत्तर :- २२ मार्च.
प्रश्न ४. महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा कोणता आहे ?
उत्तर :- गडचिरोली.
प्रश्न ५. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे ?
उत्तर :- ताम्हण.
प्रश्न ६. धुळे शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे ?
उत्तर :- पांझरा.
प्रश्न ७. भारतातील चहाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
उत्तर :- आसाम.
प्रश्न ८. विमानाचा शोध कोणी लावला ?
उत्तर :- राईट बंधू.
प्रश्न ९. \’पानीपत\’ हे स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर :- हरियाणा.
प्रश्न १०. \’गोविंदाग्रज\’ हे कोणाचे टोपणनाव आहे ?
उत्तर :- राम गणेश गडकरी.
🌍🕐🌍🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🌍🕐🌍🕐🕐🌍🕐
👉 आपल्या माहितीसाठी.
रोग आणि संबंधित भाग
👉 क्षयरोग – फुफ्फुस
👉 न्युमोनिया – फुफ्फुस
👉 कावीळ – यकृत
👉 मधुमेह – पाणथरी ग्रंथी
👉 टायफाईड – मोठे आतडे
👉 ऑस्टिओपोरोसिस – हाडे
👉 एक्सीमा – त्वचा
👉 कंजक्टिव्हायसीस – डोळा
👉 ग्लॅकोमा – डोळा
Very nice job sirjiii