\”ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.\” प्रश्नावली 166

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
10 Min Read

                  📖 वाचाल तर वाचाल 📖

\"\"

         📙📘परिपाठ 📘📙


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-  २६ ऑगस्ट २०२४

🔊🔊 आजचा वार:- सोमवार

📙📘सुविचार :- जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका,विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

📙📘📙 दिनविशेष

✒️✒️. आजचा जागतिक दिन

🌍 महिला समानता दिन
🌍 हॅप्पी डॉग डे

✒️✒️आजचा दिनविशेष – घटना
👉1303 : अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकला.
👉1498 : मायकेल एंजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.
👉1768 : कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले.
👉1791 : जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.
👉1883 : सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात 136 गावे उध्वस्त 36,000 लोक मारले गेले.
👉1944 : दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉल पॅरिसमध्ये दाखल.
👉1972 : 20 व्या ऑलिम्पिक खेळांना म्युनिक, जर्मनी येथे सुरुवात झाली.
👉1994 : लॉन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम अंतराचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के.के. बिर्ला फाऊंडेशन पुरस्कार जाहीर झाला.
👉1996 : माजी राष्ट्राध्यक्ष चुन डू वान यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना दक्षिण कोरियातील 1979 च्या लष्करी उठावासाठी साडेबावीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म

▶️1740 : ‘जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र’ – हॉट एअर बलून चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1810)
▶️1743 : ‘अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझियर’ – आधुनिक रसायनशास्त्राचा जनक यांचा जन्म. (मृत्यू : 8 मे 1794)
▶️1910 : ‘मदर तेरेसा’ – भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका यांचा जन्म. (मृत्यू : 5 सप्टेंबर 1997)
▶️1922 : ‘ग. प्र. प्रधान’ – समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती यांचा जन्म. (मृत्यू : 29 मे 2010)
▶️1927 : ‘बी. व्ही. दोशी’ – प्रख्यात वास्तुविशारद यांचा जन्म.
▶️1928 : ‘ओम प्रकाश मंजाल’ – हिरो साइकिलचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 2015)
▶️1944 : ‘अनिल अवचट’ – लेखक सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म.

आजचा दिनविशेष – मृत्यू
➡️1723 : ‘अँथनी व्हॉन लीवेनहॉक’ – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1632)
➡️1948 : ‘कृष्णाजी खाडिलकर’ – नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 25 नोव्हेंबर 1872)
➡️1955 : ‘अ. ना. भालेराव’ – मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक यांचे निधन.
➡️1955 : ‘बालन के. नायर’ – मल्याळी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
➡️1974 : ‘चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग’ – पॅरिस ते न्यूयॉर्क ही 5,800 कि.मी. विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे 33 तासात जिंकणारा वैमानिक यांचे निधन. (जन्म : 4 फेब्रुवारी 1902)
➡️1999 : ‘नरेन्द्रनाथ’ – डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू यांचे निधन.
➡️2012 : ‘ए. के. हनगल’ – चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 1 फेब्रुवारी 1917)


          🌍 आजचे जागतिक दिवस 🌍

              महिला समानता दिन
महिला समानता दिन दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या अधिकारांची, समानतेची आणि स्वातंत्र्याची आठवण करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. महिला समानता दिनाची सुरुवात अमेरिकेत 1920 साली झाली, जेव्हा महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. हा दिवस आता जागतिक पातळीवर महिलांच्या समान हक्कांसाठी लढणाऱ्या चळवळींचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.

महिला समानता हा विषय केवळ अधिकारांचा प्रश्न नसून समाजाच्या सर्व अंगांमध्ये महिलांना समान संधी मिळण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. शिक्षण, रोजगार, राजकारण, आणि इतर सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना समान हक्क मिळणे हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे आणि सुरक्षिततेचे महत्त्व वाढवणे गरजेचे आहे.

महिला समानता दिनानिमित्त, विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यातून महिलांच्या प्रश्नांवर चर्चा होते आणि समाधानाच्या दिशेने पावले उचलली जातात.

हा दिवस महिलांच्या सन्मानासाठी, त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पटवण्यासाठी, आणि समानतेच्या दिशेने चाललेल्या संघर्षात त्यांना पाठिंबा देण्यासाठी साजरा केला जातो. महिला समानता दिनाच्या निमित्ताने, आपण सर्वांनी मिळून एक अधिक समृद्ध आणि न्याय्य समाज घडवण्याचा संकल्प केला पाहिजे.

            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

  📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉  एका माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे .

   ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  बारा वाजणे – पूर्ण नाश होणे.

  ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा – मार्गदर्शक       

                     🙏 प्रार्थना 🙏

                      नमो भास्करा

             नमो भास्करा दे अनोखा प्रकाश
            तनाचा मनाचा कराया विकास
            गतीच्या विकासास द्यावा प्रकाश
           झणी होऊ दे दुर्गुणांचा विनाश
           नमो शारदा मी तुझा नम्र दास
           अशी बुद्धी देई मला तुचि खास
           घडो मायभूमी अहर्निश सेवा
          मनाला अहंकार कधी ना शिवावा।


                        📝 बोधकथा 📝

                सदैव उदार रहने का महत्व

ये कहानी रमेश नाम के एक लड़के की है। रमेश बहुत ही उदार और दिल से खुशियों का संचालक था। वह हमेशा दूसरों की मदद करने को तैयार रहता था।

एक दिन, गाँव में अचानक एक बड़ी आपदा आई। बाढ़ के पानी ने गाँव को बाढ़ के खतरे से दुखी हालत में डाल दिया। लोग पानी के बहाव से परेशान थे और उनके पास खाने का भी सामान नहीं था।

रमेश ने अपने उदार दिल का साक्षात्कार किया और वह बच्चों के साथ खाना बाँटने और पानी की मदद करने का काम करने लगा। उसने बच्चों को संबोधित करके उन्हें खुश और आत्मविश्वासी बनाया।

इसके बाद, गाँव के लोग भी उसके प्रेरणास्पद काम की सराहना करने लगे और गाँव को फिर से खुशियों का नया संसार मिला। रमेश की उदारता और सेवा भावना ने सबको प्रेरित किया कि हमें सदैव उदार रहना चाहिए।

तात्पर्य: इस छोटी बोधकथा से हमें यह सिखने को मिलता है कि उदार दिल और सेवा भावना का महत्व कितना अधिक है।
हमें दूसरों की मदद करने में खुशी मिलती है और हमारे उदारता से हम अपने आस-पास के लोगों के जीवन को भी बेहतर बना सकते हैं।

                                                                                                                               
📘 दिनांकानुसार पाढा :- २६ चा पाढा

                                  २६           १५६
                                  ५२           १८२
                                  ७८           २०८
                                  १०४         २३४
                                  १३०         २६०

🌍🌍🌍🌍🌍🌍🌍📖📖📖📖🌍🌍🌍🌍🌍🌍🌍📖📖📖🌍🌍🌍

                 प्रश्नावली १६६

प्रश्न १. वायूचा वेग सर्वात जास्त —– मध्ये असतो ?
उत्तर :- स्थायु

प्रश्न २. हवेचा दाब कोणत्या कोणत्या उपकरणात मोजतात ?
उत्तर :- बॅरोमीटर

प्रश्न ३. न्युमोनिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
उत्तर :- फुफ्फुस

प्रश्न ४. कोणत्या वायूला \’ लाफिंग गॅस \’ म्हणतात ?
उत्तर :- नायट्रस ऑक्साईड

प्रश्न ५. द्रव्याची चौथी अवस्था कोणती ?
उत्तर :- प्लास्मा ( आयानद्रायू )


📋📝📋📝📋📝📋📝📋📝📝📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋

👉 आपल्या माहितीसाठी

*भारत सरकारच्या महत्वाच्या योजना :-*

🚨2015🚨
1. NITI आयोग – 1 जानेवारी 2015
2. हृदय योजना-21 जानेवारी 2015
3. बेटी बचाओ बेटी पढाओ -22 जानेवारी 2015
4. सुकन्या समृद्धी योजना -22 जानेवारी 2015


5. मुद्रा बँक योजना -8 एप्रिल 2015

6. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना -9 मे 2015

7. अटल पेन्शन योजना-9 मे 2015

8. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना -9 मे 2015

9. उस्ताद योजना (USTAD)-14 मे 2015

10. प्रधानमंत्री आवास योजना -25 जून 2015


11. अमृत योजना -25 जून 2015

12. स्मार्ट सिटी योजना -25 जून 2015

13. डिजिटल इंडिया मिशन-1 जुलै 2015

14. स्किल इंडिया मिशन-15 जुलै 2015

15. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना -25 जुलै 2015

16. नई मंजिल -8 ऑगस्ट 2015

17. सहज योजना-30 ऑगस्ट 2015

18. स्वावलंबन आरोग्य योजना – 21 सप्टेंबर 2015

19. मेक इन इंडिया -25 सप्टेंबर 2015

20. Make in india योजना – 5 नोव्हेंबर 2015

21. सुवर्ण मुद्रीकरण योजना -5 नोव्हेंबर 2015

22. उदय योजना (UDAY)-5 नोव्हेंबर 2015

23. वन रँक वन पेन्शन योजना -7 नोव्हेंबर 2015

24. ज्ञान योजना-30 नोव्हेंबर 2015

25. किलकारी योजना -25 डिसेंबर 2015

26. नगामी गंगे, मोहिमेचा पहिला टप्पा सुरू झाला – 5 जानेवारी 2016

27. स्टार्टअप इंडिया-16 जानेवारी 2016

28. पंतप्रधान पीक विमा योजना -18 फेब्रुवारी 2016

29. सेतू भारतम प्रकल्प-4 मार्च 2016

30. स्टँड अप इंडिया योजना – 5 एप्रिल 2016

31. ग्रामोदय से भारत उदय अभियान – 14 एप्रिल 2016

32. प्रधानमंत्री अज्वला योजना – 1 मे 2016

33. पंतप्रधान कृषी सिंचन योजना – 31 मे 2016

34. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना -1 जून 2016

35. नागमी गंगे कार्यक्रम -7 जुलै 2016

36. भारतासाठी गॅस-6 सप्टेंबर 2016

37. उड्डाण योजना -21
ऑक्टोबर 2016

38. सौर सुजला योजना -1 नोव्हेंबर 2016

39. प्रधानमंत्री युवा योजना-9 नोव्हेंबर 2016

40. भीम अॅप – 30 डिसेंबर 2016

41. भारतनेट प्रकल्प टप्पा
– 2 -19 जुलै 2017

42. प्रधानमंत्री वय वंदना योजना -21 जुलै 2017

43. आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना-21 ऑगस्ट 2017

44. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना- सौभाग्य-25 सप्टेंबर 2017

45. साथी मोहीम -24 ऑक्टोबर 2017

46. दीनदयाल स्पर्श योजना- 3 नोव्हेंबर 2017.

   

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *