\”ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.\” प्रश्नावली 169

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
13 Min Read

             📖 वाचाल तर वाचाल 📖

\"\"

        📙📘परिपाठ📘📙


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-  २९ ऑगस्ट २०२४

🔊🔊 आजचा वार:- गुरुवार

📙📘सुविचार :- नेहमी सत्याचाच विजय होतो.

📙📘📙 दिनविशेष

✒️✒️ आजचा जागतिक दिन

🌍राष्ट्रीय क्रीडा दिन
🌍अणु चाचण्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

👉1498 : वास्को द गामा कालिकतहून पोर्तुगालला परतला.
👉1825 : पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
👉1831 : मायकेल फॅराडेने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शोधले.
👉1833 : युनायटेड किंगडम साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घालण्यात आली.
👉1898 : गुडइयर कंपनीची स्थापना झाली.
👉1918 : टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
👉1947 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
👉1966 : द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
👉1974 : चौधरी चरण सिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
👉2004 : मायकेल शूमाकरने पाचव्यांदा फॉर्म्युला वन ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकली.
👉2013 : राष्ट्रीय क्रीडा दिन

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

➡️1880 : ‘माधव श्रीहरी अणे’ – स्वातंत्र्यसैनिक लोकनायक यांचा जन्म. (मृत्यू : 26 जानेवारी 1968)
➡️1887 : ‘जीवराज नारायण मेहता’ – भारतीय डॉक्टर आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 1978)
➡️1901 : ‘विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील’ – सहकारमहर्षी पद्मश्री यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 1980)
➡️1905 : ‘मेजर ध्यानचंद’ – भारतीय हॉकीपटू यांचा जन्म. (मृत्यू : 3 डिसेंबर 1979)
➡️1915 : ‘इन्ग्रिड बर्गमन’ – स्वीडीश अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 29 ऑगस्ट 1982)
➡️1923 : ‘हिरालाल गायकवाड’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
➡️1923 : ‘रिचर्ड अ‍ॅटनबरो’ – इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते यांचा जन्म.
➡️1958 : ‘मायकेल जॅक्सन’ – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 25 जून 2009)
➡️1959 : ‘अक्किनेनी नागार्जुन’ – दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

▶️1906 : ‘पद्मनजी मुळे’ – मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक बाबा यांचे निधन.
▶️1969 : ‘मेहबूब हुसेन पटेल’ – लोकशाहीर यांचे निधन. (जन्म : 20 ऑक्टोबर 1916)
▶️1975 : ‘इमॉनडी व्हॅलेरा’ – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1882)
▶️1982 : ‘इन्ग्रिड बर्गमन’ – स्वीडीश अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 29 ऑगस्ट 1915)
▶️1986 : ‘गजानन श्रीपत खेर’ – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 15 जून 1898)
▶️2007 : ‘बनारसीदास गुप्ता’ – स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 5 नोव्हेंबर 1917)
▶️2008 : ‘जयश्री गडकर’ – मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 21 फेब्रुवारी 1942)
             
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

  📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉आजा मेला नातू झाला – एखादे नुकसान झाले असता , त्याच वेळी फायद्याची गोष्ट होणे.

   ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉 अवगत होणे – प्राप्त होणे

  ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 कल्पना नसताना अचानक घडलेली घटना – अकल्पित


                     🙏 प्रार्थना 🙏
                
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे हमसे, भूलकर भी कोई भूल हो ना


दूर अज्ञान के हो अँधेरे तू हमें ज्ञान की रौशनी दे
हर बुराई से बचके रहें हम जीतनी भी दे भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसी का किसी से भावना मन में बदले की हो ना

इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे हमसे भूलकर भी कोई भूल हो ना

हम न सोचें हमें क्या मिला है हम ये सोचें क्या किया है अर्पण
फूल खुशियों के बांटें सभी को सबका जीवन ही बन जाए मधुवन
अपनी करुणा को जल तू बहा के कर दे पावन हर एक मन का कोना

इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे हमसे भूलकर भी कोई भूल हो ना
         


                        📝 बोधकथा 📝

                                   सवय     
                             ━━━━━
*एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायला प्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍या हातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व मरून गेला.

तात्‍पर्य : – जास्‍त काळ पारतंत्र्यात (गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.

                ▶️▶️ व्यक्तिविशेष

                        ध्यानचंद सिंग

जन्म :- २९ ऑगस्ट १९०५
मृत्यू :- ३ डिसेंबर १९७९
              मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये आॅलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता कि भारताने १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी ७ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८-१ ने नामावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती जी त्यांनी नाकारली. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक त्यांनी एकूण 580 गोल केले.गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने १९५६ साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. त्यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणुन साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त Fit India चळवळ सुरू झाली.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व लोक जमतात आणि राष्ट्रीय क्रीडा दिन उत्सव यशस्वी करतात.
                                                                                                                                               
📘 दिनांकानुसार पाढा :- २९ चा पाढा

                                  २९           १७४
                                  ५८           २०
                                  ८७           २३२
                                  ११६         २६१
                                  १४५         २९०

    🕐🌍🕐🌍🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍

                🛑 प्रश्नावली 169 🛑

प्रश्न १. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात ?
उत्तर :- राष्ट्रीय क्रीडा दिवस

प्रश्न २. \’ गेट वे ऑफ इंडिया\’ कोणत्या शहरात आहे ?
उत्तर :- मुंबई

प्रश्न ३. \’जय जवान जय किसान\’ ही घोषणा कोणी दिली ?
उत्तर :- लालबहादूर शास्त्री

प्रश्न ४. भारतातील चहाचे सर्वाधिक उत्पन्न करणारे राज्य कोणते ?
उत्तर :-  आसाम

प्रश्न ५. पी टी उषा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर :- धावपटू

🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐

👉 आपल्या माहितीसाठी.

📖देशातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)

📖देशातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली

📖देशातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश

📖देशातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)

📖देशातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर)

📖देशातील पहिली फूड बँक – दिल्ली

📖देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

📖देशातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर

📖देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश

📖देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी

📖देशातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (उत्तरप्रदेश)

📖देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

📖देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

📖देशातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर

📖देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर

📖देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी – मुंबई

📖देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात

📖देशातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)

📖देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे

📖देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश

📖देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर

📖देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

📖देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

📖देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई

📖देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

📖देशातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली

📖देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे

📖देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक

📖देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)

📖देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश

📖देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर

📖देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे -पुणे

📖देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम

📖देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

📖देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड)

📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड

📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

📖देशातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा

📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत

📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र

📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल

📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश

📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान

📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा

📖देशातील पहिले स्त्री बटालियन – हडी राणी (राजस्थान)

📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई – बँकीग सेवा देणारे राज्य – महाराष्ट्र

📖देशातील पहिले ई – पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य – दिल्ली

📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा – नदिया (प.बंगाल)

📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य – महाराष्ट्र

📖देशातील  पहिला खासगी विमानतळ – दुर्गापूर (प.बंगाल)

📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली

📖देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *