📖 वाचाल तर वाचाल 📖
📙📘परिपाठ 📘📙
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ३१ ऑगस्ट २०२४
🔊🔊 आजचा वार:- शनिवार
📙📘सुविचार :- स्वतःच्या मनाचे शिल्पकार बना.
📙📘📙 दिनविशेष
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
👉1920 : डेट्रॉईटमध्ये 8 MK ने प्रसारित केलेला पहिला रेडिओ कार्यक्रम.
👉1920 : खिलाफत चळवळीची सुरुवात.
👉1947 : भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
👉1957 : मलाया (आता मलेशिया) फेडरेशनने युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळवले.
👉1962 : त्रिनिदाद आणि टोबॅगोला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
👉1996 : पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
👉1970 : राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
👉1971 : अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
👉1991 : किर्गिस्तानला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले.
👉1996 : पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार.
👉2016 : ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष डिल्मा रौसेफ यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला आणि त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
➡️1870 : ‘मारिया माँटेसरी’ – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ज्ञ, पूर्वप्राथमिक शाळानां माँटेसरी या नावाने ओळखले जाते यांचा जन्म. (मृत्यू : 6 मे 1952)
➡️1902 : ‘दामू धोत्रे’ – रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक यांचा जन्म.
➡️1907 : ‘रॅमन मॅगसेसे’ – फिलिपाइन्सचे 7वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 17 मार्च 1957)
➡️1919 : ‘अमृता प्रीतम’ – कागज ते कॅन्व्हास या कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पंजाबी भाषेतील प्रथितयश लेखिका व कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू : 31 ऑक्टोबर 2005)
➡️1931 : ‘जयवंत कुलकर्णी’ – पार्श्वगायक यांचा जन्म. (मृत्यू : 10 जुलै 2005)
➡️1940 : ‘शिवाजी सावंत’ – मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 18 सप्टेंबर 2002)
➡️1944 : ‘क्लाइव्ह लॉइड’ – वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू यांचा जन्म.
➡️1963 : ‘ऋतुपर्णा घोष’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
➡️1969 : ‘जवागल श्रीनाथ’ – जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
➡️1979 : ‘युवन शंकर राजा’ – भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
▶️1422 : ‘हेन्री (पाचवा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म : 16 सप्टेंबर 1386)
▶️1973 : ‘ताराबाई मोडक’ – शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या यांचे निधन. (जन्म : 19 एप्रिल 1892)
▶️1995 : ‘सरदार बियंत सिंग’ – पंजाबचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1922)
▶️2012 : ‘काशीराम राणा’ – भाजपाचे लोकसभा सदस्य यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1938)
▶️2020 : ‘प्रणब मुखर्जी’ – भारताचे 13वे राष्ट्रपती (जन्म : 11 डिसेंबर 1935)
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉अति परिचयात अवज्ञा – जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉राख होणे – पूर्णपणे नष्ट होणे .
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 क्षमा करणारी वृत्ती असणारा – क्षमाशील
🙏 प्रार्थना 🙏
या भारतात बंधुभाव नित्य बसू दे।
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।
दे वरचि असा दे॥धृ॥
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे।
मतभेद नसू दे॥१॥
सकलांस कळो मानवता, राष्ट्रभावना।
ही सर्व स्थळी मिळुनी समुदाय-प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथे दिसू दे॥२॥
जातीभाव विसरूनिया एक हो आम्ही।
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी।
खलनिंदका मनींही सत्य न्याय वसू दे॥३॥
सौंदर्य रमो घराघरा स्वर्गियापरी।
ही नष्ट होऊ दे विपत्ति भीतीबावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजि बसू दे॥४॥
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
📝 बोधकथा 📝
ससा आणि त्याचे मित्र
एक जंगल होते. गाय, घोड़ा, गाढव, आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला वाटले आपणही त्यांच्याशी मैत्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला व म्हणाला,\” तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसेच मलाही तुमचा मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली व त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससा पण त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता. अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वाना जाणीव झाली.
ससा गाईला म्हणाला, \”तू मला तुझ्या पाठीवर बसव जेंव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव.\” गाय म्हणाली, \”आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे.\” तेंव्हा ससा घोडयाकडे गेला आणि म्हणाला,\” तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव घोडा म्हणाला, \”मित्र मी तुला पाठीवर घेतले असते पण मला खाली बसताच येत नाही.मी तुला कसे पाठीवर घेवू?\” तेंव्हा ससा गाढवाला म्हणाला, \”मित्रा तू तरी मला मदत कर\” गाढव म्हणाले\” मी तर आता घरी चाललो तू बघ\” मग शेवटी ससा बकरी कडे गेला व म्हणाला, \”बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?\” बकरी म्हणाली, \”अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचावयाच्या नादात त्यांनी मलाच फाडून खातील. तेंव्हा तू तुझे बघ\” एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला, \”असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे !!\”
तात्पर्य :- मित्राची खरी ओळख संकटात होते. आपले म्हणणारे संकटात सोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.
📘 दिनांकानुसार पाढा :- ३० चा पाढा
३१ १८६
६२ २१७
९३ २४८
१२४ २७९
१५५ ३१०
🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐
🛑 प्रश्नावली १७१ 🛑
प्रश्न १. पत्री सरकारची स्थापना कोणी केली ?
उत्तर – क्रांतिसिंह नाना पाटील
प्रश्न २. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता ?
उत्तर – सोलापूर
प्रश्न ३. एक हॉर्स पावर म्हणजे किती वॅट ?
उत्तर – 746 वॅट
प्रश्न ४. पेशींना ऊर्जा पुरविण्याचे काम कोण करते ?
उत्तर – तंतूकनिका
प्रश्न ५. प्रौढ मानवी शरीरात किती हाडे असतात ?
उत्तर – 206
📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📝📋📝📋
👉 आपल्या माहितीसाठी
नेताजी सुभाष चंद्र बोस
जन्म :- २३ जानेवारी १८९७
मृत्यू :- १८ ऑगस्ट १९४५
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म ओरिसातील एका बंगाली कुटुंबात झाला होता आजच्या युगात ज्याप्रमाणे विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला आयएस आयपीएस बनायचं असेल तर मुंबई पुणे या मोठ्या शहरात जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा लागतो त्याचप्रमाणे नेताजी सुभाष चंद्र बोस यांना त्यांच्या काळातील भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले कारण ब्रिटिश सरकार ही परीक्षा हेतू पुरस्कार इंग्लंड येथे ठेवत असे जेणेकरून भारतीय व्यक्ती या स्पर्धा परीक्षेपासून दूर राहील आणि कमीत कमी भारतीय अधिकारी पदावर विराजमान होतील हा हेतू इंग्रजांचा होता परंतु काही भारतीय आपले ज्ञान कौशल्य पैसा पणाला लावून ही परीक्षा देऊन इंग्रजांच्या प्रशासना सामील होऊन भारतीय लोकांना याचा फायदा कसा करता येईल याचा विचार करत होते त्यापैकी नेताजी सुभाषचंद्र बोस एक होती नेताजींनी ही कठीण परीक्षा पास केली नेताजींनी 1921 मध्ये काँग्रेस च्या जवाहरलाल नेहरू गटात सामील झाली परंतु नेहरूंचा काँग्रेस गट हा घटनात्मक सुधारण्यासाठी कमी उत्सुक होता व समाजवादी विचाराकडे अधिक प्रमाणात झुकलेला होता या गटात काही वर्ष काम केल्यानंतर नेताजींना 1938 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष पद मिळाले पुढे 1939 च्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये नेताजी सुभाष चंद्र विरुद्ध महात्मा गांधी यांनी अध्यक्षपदाचा दावेदार दक्षिण भारतातील पट्टा सीतारामय्या यांना मतदानाद्वारे काँग्रेस कमिटीला निवडून देण्याचे आवाहन केले परंतु तरीही नेताजी सुभाष चंद्र बोस यांना काँग्रेस कमिटी कडून अधिक मत मिळाले व 1939 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पद नेताजी सुभाष चंद्र बोस यांनाच मिळाले यादरम्यान त्यांच्याविरुद्ध उभे असलेले महात्मा गांधीजींचे अनुयायी पट्टा सीतारामय्या यांचा पराभव झाला यादरम्यान नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी काँग्रेस च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला या दरम्यान नेताजी सुभाष चंद्र बोस व महात्मा गांधी यांच्या मतभेद सदृश्य परिस्थिती निर्माण झाली काँग्रेस मधील काँग्रेस कमिटी व सदस्यांचे कामकाज व भारतीय स्वातंत्र्य यामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांना स्वातंत्र्यलढ्यासाठी पाहिजे तशी आवश्यक विचारधारा व कृतीचा अभाव दिसत होता कारण या दरम्यान जगामध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले होते या युद्धाचा फायदा आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कसा करता येईल याचा विचार नेताजी सुभाष चंद्र बोस करत होते आपल्या भारत देशातून इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी दुसरा महत्त्वाचा फायदा घेत इंग्रजांना देशातून हाकलून लावण्यासाठी सशस्त्र क्रांती झाली पाहिजे असे विचार नेताजींचे होते यादरम्यान नेताजी एप्रिल 1941 मध्ये जर्मनीमधील बर्लिन शहरात पोहोचले यादरम्यान त्यांनी बर्लिन शहरामध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली पुढील काळात म्हणजे 1942 मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस व जर्मनीचे हिटलर यांच्यात भेट झाली पुढील काळात नेताजी सुभाष चंद्र बोस हे पाणबुडीतून जपानच्या ताब्यात असलेला भूप्रदेश म्हणजे सुमात्रा येथे उतरले जपानमध्ये भारतीय सुपुत्र रासबिहारी बोस यांनी इंग्रजांच्या वतीने जे भारतीय युद्ध सैनिक जपानच्या विरोधात लढत होते त्यांना जपान सरकारने अटक केली होती कारण दुसऱ्या महायुद्धात जपान विरुद्ध इंग्लंड असा लढा सुरू होता या युद्धात इंग्रजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांना इंग्रजांच्या सैन्यात सामील करण्यात आले होते भारतीय लोकांची कोणतीही चूक नसताना भारतीय लोकांचा सैन्य म्हणून इंग्रज सरकार वापर करून घेत होती इंग्रजांचे दुसऱ्या महायुद्धात ज्या ज्या राष्ट्राविरुद्ध युद्ध सुरू होते त्या त्या राष्ट्रांविरुद्ध भारतीय लोकांना इंग्रजांची सैन्य म्हणून पाठवून भारतीय नागरिकांचा दुसऱ्या महायुद्धात बळी घेण्याची सत्र मोठ्या प्रमाणात सुरू होते याच दरम्यान जपान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या युद्धात जपान सरकारने इंग्लंडच्या बाजूने लढत असलेल्या भारतीयांना अटक केलेली होती यादरम्यान रासबिहारी बोस यांनी भारतीय सैनिकांची सुटका करण्यासाठी जपान सरकारसोबत चर्चा करून इंग्लंड विरुद्ध भारतीय सैनिकांची एक फौज निर्माण केली होती या दरम्यान नेताजी सुभाष चंद्र बोस ज्यावेळेस जपानमध्ये गेले त्यावेळेस राज बिहारी बोस यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांना या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केले व हे सैन्य आझाद हिंद सेना म्हणून जगविख्यात झाली यामध्ये सर्व जाती-धर्माचे सैन्य होते तसेच महिलांचाही या आझाद हिंद सेनेत समावेश होता भारताच्या इतिहासामध्ये आझाद हिंद सेनेचे कार्य सोनेरी अक्षराने लिहिला गेला या सर्व कार्याचे प्रत्यक्ष नेतृत्व व कृती सुभाष चंद्र बोस यांनी केले देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांकडे अर्ज विनंती करण्यापेक्षा इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून देणे त्यांचा पराभव करणे हाच मार्ग योग्य आहे व त्यावर प्रत्यक्ष कृती करणे हेच भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे असे मत नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे होते कारण जगामध्ये ज्या ज्या देशाने स्वातंत्र्य मिळवलेले होते त्या त्या देशांमध्ये सशस्त्र क्रांती झाल्यानंतरच त्या संबंधित देशाला स्वातंत्र्य मिळाले होते याचे उदाहरण म्हणजे अमेरिकेचे स्वातंत्र्य जगाच्या इतिहासामध्ये अनेक देशांनी इंग्रजांची सत्ता उलथून लावण्यासाठी सशस्त्र क्रांती केली होती त्याला भारत कसा अपवाद असू शकतो याचा विचार नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी केला होता नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे कार्य आणि देशासाठी दिलेले बलिदान भारताच्या इतिहासात स्वर्ण अक्षराने लिहिलेले 18 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या ताब्यातील तैवान मध्ये त्यांचा विमानाचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला
🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳