\”ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.\” प्रश्नावली 173

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
9 Min Read

             📖 वाचाल तर वाचाल 📖

\"\"

        📙📘परिपाठ📘📙


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :-  सप्टेंबर २०२४

🔊🔊 आजचा वार:- मंगळवार

📙📘सुविचार :-  आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.

📙📘📙 दिनविशेष

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

👉301 : 301ई.पूर्व  : जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.
👉1752 : अमेरिकेत ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्यास सुरुवात झाली.
👉1916 : श्रीमती ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली.
👉1935 : सर माल्कम कॅम्पबेल ताशी 300 मैल वेगाने ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ती बनले.
👉1971 : कतारला स्वातंत्र्य मिळाले.
👉2016 : यूएस आणि चीन, एकत्रितपणे जगातील 40% कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार, दोघांनी पॅरिस जागतिक हवामान कराराला औपचारिकपणे मान्यता दिली.
👉2017 :  उत्तर कोरियाने सहावी आणि सर्वात शक्तिशाली आण्विक चाचणी घेतली.

✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म

▶️1855 : ‘पंत महाराज बाळेकुंद्री’ – आध्यात्मिक गुरू यांचा जन्म. (मृत्यू : 16 ऑक्टोबर 1905)
▶️1869 : ‘फ्रिट्झ प्रेग्ल’ – सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 1930)
▶️1875 : ‘फर्डिनांड पोर्श्या’ – पोर्श्या मोटार कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 30 जानेवारी 1951)
▶️1905 : ‘कार्ल डेव्हिड अँडरसनयांचा’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जन्म.
▶️1923 : ‘किशन महाराज’ – प्रख्यात तबलावादक यांचा जन्म. (मृत्यू : 4 मे 2008)
▶️1923 : ‘ग्लेन बेल’ – टाको बेल चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 2012)
▶️1923 : ‘कृष्णराव साबळे’ – महाराष्ट्र शाहीर यांचा जन्म.
▶️1927 : ‘अरुण कुमार चटर्जी’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 24 जुलै 1980)
▶️1931 : ‘श्याम फडके’ – नाटककार यांचा जन्म.
▶️1938 : ‘रायोजी नोयोरी’ – नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
▶️1940 : ‘प्यारेलाल शर्मा’ – लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार यांचा जन्म.
▶️1956 : ‘जिझु दासगुप्ता’ – भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 21 डिसेंबर 2012)
▶️1958 : ‘शक्ती कपूर’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
▶️1965 : ‘चार्ली शीन’ – अमेरिकन अभिनेता यांचा जन्म.
▶️1971 : ‘किरण देसाई’ – भारतीय-अमेरिकन लेखक यांचा जन्म.
▶️1974 : ‘राहुल संघवी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
▶️1976 : ‘विवेक ओबेरॉय’ – चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
▶️1992 : ‘साक्षी मलिक’ – भारतीय कुस्तीपटू यांचा जन्म.

✒️✒️आजचा दिनविशेष – मृत्यू

➡️1658 : ‘ऑलिव्हर क्रॉमवेल’ – इंग्लंडचा राज्यकर्ता यांचे निधन.
➡️1948 : ‘एडवर्ड बेनेस’ – चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
➡️1953 : ‘लक्ष्मण पर्वतकर’ – तबला, घुमट व सारंगीवादक यांचे निधन.
➡️1958 : ‘माधव केशव काटदरे’ – निसर्गकवी यांचे निधन. (जन्म : 3 डिसेंबर 1892)
➡️1967 : ‘अनंत हरी गद्रे’ – वार्ताहर, संपादक यांचे निधन. (जन्म : 16 ऑक्टोबर 1890)
➡️1991 : ‘फ्रँक काप्रा’ – अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
➡️2000 : ‘पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर’ – स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती यांचे निधन.
➡️2014 : ‘ए. पी. वेंकटेश्वरन’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म : 2 ऑगस्ट 1930)


            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉उकराल माती तर पिकतील मोती – मशागत केल्यास चांगले पीक येते .

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉 हात देणे – मदत करणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 नदीची सुरुवात होते ते ठिकाण :- उगम

                     🙏 प्रार्थना 🙏
                
             बलसागर भारत होवो

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

                        📝 बोधकथा 📝
                               
                           खरे दुःख
  एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,\”दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?\” लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,\”अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो.\”

तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.                                                                                                                              
📘 दिनांकानुसार पाढा :- ३ चा पाढा

                                  ३           १८
                                  ६           २
                                  ९           २४
                                  १२         २७
                                  १५         ३०

    🌍🕐🌍🌍🕐🌍🌍🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🌍🕐

                🛑 प्रश्नावली १७३ 🛑



प्रश्न १. संविधान दिवस  म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
उत्तर :- २६ नोव्हेंबर

प्रश्न २. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- डॉ. राजेंद्र प्रसाद

प्रश्न ३. संविधान सभेचे कामकाज किती दिवस चालले ?
उत्तर :- २ वर्षे ११ महिने १८ दिवस

प्रश्न ४. संविधान सभेतील सर्वात महत्त्वाची समिती कोणती होती ?
उत्तर :- मसुदा समिती

प्रश्न ५. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

📝📋📝📋📋📝📋📝📝📋📝📝📋📝📋📝📋📝📋📝📝📝📋📝

👉 पसायदान.

आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||

जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||

दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||

वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||

चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||

चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||

किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||

आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥

येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||

🌍📝🌍📝🌍📝🌍🌍🌍🌍📝🌍📝🌍📝🌍📝🌍📝🌍📝🌍🌍📝

👉 आपल्या माहितीसाठी

💠🔰 तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम

1. औरंगाबाद – 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर – 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे – 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती – 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक – 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण – 7 जिल्हे , 50 तालुके

💠🔰महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :

1. यवतमाळ , नांदेड – 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर – 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर – 15 तालुके.

💠🔰कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :

1. पालघर जिल्हा – दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा – भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा – पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा – सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा – काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

🌊 महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने) :-

➡️🔰नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):

1.गोदावरी – 69000
2. भीमा – 46184
3. वर्धा – 46182
4. वैनगंगा – 38000
5. तापी – 31200
6. कृष्णा – 28700

➡️🔰लांबीनुसार(किमी) :

1. गोदावरी – 668
2. पैनगंगा – 495
3. वर्धा – 455
4. भीमा – 451
5. वैनगंगा – 295
6. कृष्णा – 282
7. तापी – 208

➡️🔰 पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी) :

1. कृष्णा – 769
2. वैनगंगा – 719
3. गोदावरी – 404
4. भीमा – 309
5. तापी – 229

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *