📖 वाचाल तर वाचाल 📖
📘 परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ५ सप्टेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- गुरुवार
📙📘सुविचार :- आपले विचार नेहमी चांगलेच ठेवा.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍आजचा जागतिक दिन
🎗️शिक्षक दिन
🎗️आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिन
✒️✒️आजचा दिनविशेष – घटना :
👉1939: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने तटस्थतेची घोषणा केली.
👉1961: स्वतंत्र राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू झाली..
👉1967: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे 7वे कुलगुरू झाले.
👉1970: इटालियन ग्रँड प्रिक्सच्या सरावात मारले गेल्यानंतर फॉर्म्युला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप मरणोत्तर जिंकणारा जोकिन रँड हा एकमेव ड्रायव्हर ठरला.
👉1972: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिम्पिकमध्ये इस्रायली खेळाडूंना ओलीस ठेवले.
👉1975: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न.
👉1977: व्हॉयेजर 1 या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
👉1984: STS-41-D स्पेस शटल डिस्कव्हरी त्याच्या पहिल्या प्रवासानंतर उतरले.
👉1986: मुंबई, भारतातून 358 लोकांसह पॅन ॲम फ्लाइट 73 चे कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपहरण करण्यात आले.
✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म
▶️1187: ‘लुई (आठवा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 8 नोव्हेंबर 1226)
▶️1638: ‘लुई (चौदावा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 1 सप्टेंबर 1715)
▶️1872: ‘व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई’ भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 18 नोव्हेंबर 1936)
▶️1888: ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन’ – भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 17 एप्रिल 1975)
▶️1895: ‘अनंत काकबा प्रियोळकर’ – भाषा व इतिहास संशोधक, लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 13 एप्रिल 1973)
▶️1907: ‘जयंत पांडुरंग नाईक’ – शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑगस्ट 1981)
▶️1910: ‘फिरोझ पालिया’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
▶️1920: ‘लीलावती भागवत’ – बालसाहित्यिका यांचा जन्म. (मृत्यू: 25 नोव्हेंबर 2013)
▶️1928: ‘दमयंती जोशी’ – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना यांचा जन्म. (मृत्यू: 19 सप्टेंबर 2004)
▶️1940: ‘रॅक्वेल वेल्श’ – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म.
▶️1946: ‘फ्रेडी मर्क्युरी’ – मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार यांचा जन्म.
▶️1952: ‘विधू विनोद चोप्रा’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक यांचा जन्म.
▶️1954: ‘रिचर्ड ऑस्टिन’ – वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
▶️1986: ‘प्रग्यान ओझा’ – भारतीय क्रिकेटर यांचा जन्म.
✒️✒️आजचा दिनविशेष – मृत्यू
➡️1877: ‘क्रेझी हॉर्स’ – अमेरिकेतील सू जमातीचा नेता यांचे निधन.
➡️1906: ‘लुडविग बोल्टझमन’ – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 20 फेब्रुवारी 1844)
➡️1918: ‘रतनजी जमसेठजी टाटा’ – उद्योगपती सर यांचे निधन. (जन्म: 20 जानेवारी 1871)
➡️1876: ‘मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा’ – चिली देशाचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 21 एप्रिल 1790)
➡️1978: ‘रॉय किणीकर’ – कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार यांचे निधन.
➡️1985 : ‘नीरजा भानोत’ – भारतीय फ्लाइट अटेंडंट, अशोक चक्र प्राप्तकर्ता, जिवावर उदार होऊन बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचविले आणि ते करताना वयाच्या २३ वर्षी शहीद.
➡️1991: ‘शरद जोशी’ – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार यांचे निधन. (जन्म: 21 मे 1931)
➡️1992: ‘अतूर संगतानी’ – उद्योगपती यांचे निधन.
➡️1995: ‘सलील चौधरी’ – हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार यांचे निधन. (जन्म: 19 नोव्हेंबर 1922 – चिंगरीपोथा, 24 परगणा, पश्चिम बंगाल)
➡️1996: ‘बॅसिल सालदवदोर डिसोझा’ – भारतीय बिशप यांचे निधन. (जन्म: 23 मे 1926)
➡️1997: ‘मदर तेरेसा’ – नोबेल पुरस्कार विजेत्या यांचे निधन. (जन्म: 26 ऑगस्ट 1910)
➡️2000: ‘रॉय फ्रेड्रिक्स’ – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1942)
➡️2015: ‘आदेश श्रीवास्तव’ – भारतीय गायक-गीतकार यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 2015)
🌍🌍आजचा दिनविशेष – जागतिक दिन लेख
📝 शिक्षक दिन. 📝
शिक्षक दिन हा दिवस दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, जे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. डॉ. राधाकृष्णन हे एक महान शिक्षक, तत्त्वज्ञ, आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जयंतीचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी विनंती केली होती.
शिक्षक दिन हा शिक्षणाच्या महत्त्वाचे स्मरण करून देणारा आणि शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करणारा दिवस आहे. शिक्षक हे केवळ ज्ञान देणारेच नाहीत तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे घडवणारे मार्गदर्शक असतात. त्यांच्या शिकवणी आणि प्रेरणेने विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतात.
या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्था शिक्षकांच्या सन्मानार्थ कार्यक्रमांचे आयोजन करतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांना आदरपूर्वक शुभेच्छा देतात आणि त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, आणि विविध उपक्रम राबवतात. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात जावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव होते आणि त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
शिक्षक दिन साजरा करणे हे शिक्षक-विद्यार्थी नात्याचे एक प्रतीक आहे, ज्यामुळे दोघांमधील संबंध अधिक दृढ होतात.
😊 आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिन 😊
आंतरराष्ट्रीय दान दिन (International Day of Charity) दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्रांनी केली असून, त्याचा उद्देश जगभरातील दानशूरतेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि समाजातील गरजू लोकांच्या मदतीसाठी लोकांना प्रेरित करणे हा आहे.
5 सप्टेंबर हा दिवस मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीचा दिवस म्हणून ओळखला जातो, आणि त्यांच्या दानशूरतेच्या कार्याची आठवण म्हणून या दिवशी आंतरराष्ट्रीय दान दिन साजरा केला जातो. मदर तेरेसा यांनी आपल्या आयुष्यभर गरिब, निराधार, आणि आजारी लोकांची सेवा केली. त्यांचा सेवाभाव आणि निःस्वार्थपणा आजही अनेक लोकांना प्रेरणा देतो.
आंतरराष्ट्रीय दान दिन साजरा करण्यामागचा हेतू लोकांमध्ये दानशूरतेची भावना जागृत करणे आहे. या दिवशी विविध संस्था, स्वयंसेवी संघटना, आणि सामान्य नागरिक एकत्र येऊन गरजू लोकांसाठी निधी जमा करतात, सेवाभावी उपक्रम राबवतात, आणि लोकांमध्ये समाजसेवेचे महत्त्व पटवून देतात.
या दिवशी आपल्या समाजासाठी, आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांसाठी काहीतरी करणे हीच खरी आंतरराष्ट्रीय दान दिन साजरा करण्याची पद्धत आहे. दानशूरता ही केवळ आर्थिक मदत नसून, वेळ, श्रम, आणि प्रेम यांचा समावेश असतो, ज्यामुळे समाजात एकात्मता आणि मानवता वाढीस लागते.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉आपलेच दात आणि आपलेच ओठ – आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 हमरीतुमरीवर येणे – जोराने भांडू लागणे .
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ
🙏 प्रार्थना 🙏
हे राष्ट्र देवतांचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची रामायणे घडावी येथे पराक्रमाची शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा हे क्षेत्र पुण्यदायी भगवन् तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासनातळीचा पायाच \’सत्य\’ आहे येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
📝 बोधकथा 📝
मुंगी व कोशातला किडा
एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.’ यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, ‘अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.’ इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.
तात्पर्य– संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.
📘 दिनांकानुसार पाढा :- ५ चा पाढा
५ ३०
१० ३५
१५ ४०
२० ४५
२५ ५०
🕐📋🕐📋🕐📋🕐📋🕐📋🕐📋📋📋📋📋📋🕐📋📋📋🕐🕐🕐
📝 प्रश्नावली १७५ 📝
प्रश्न १. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर – महात्मा फुले.
प्रश्न २. मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर – 27 फेब्रुवारी.
प्रश्न ३. महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो ?
उत्तर – वसंतराव नाईक.
प्रश्न ४. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कुठे आहे ?
उत्तर – हेमलकसा.
प्रश्न ५. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते ?
उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
🏞️🌍🏞️🌍🌍🏞️🌍🏞️🌍🌍🏞️🏞️🌍🌍🏞️🌍🏞️🌍🏞️🌍🏞️🌍🏞️🌍
👉आपल्या माहितीसाठी.
मूलद्रव्य, संज्ञा आणि लॅटिन नाव.
👉 सोने – ( Au ) – ऑरम
👉 चांदी – ( Ag ) – अर्जेंटिनम
👉 तांबे – ( Cu ) – क्यूप्रम
👉 पारा – ( Hg ) – हायड्रारजिरम
👉 सोडियम – ( Na ) – नॅट्रियम
👉 लोह – ( Fe ) – फेरम
👉 कथिल – ( Sn ) – स्टॅनियम
👉 शिसे – ( Pb ) – प्लंबम