📖 वाचाल तर वाचाल 📖
📘परिपाठ📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ९ सप्टेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- सोमवार
📙📘सुविचार :-सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍आजचा जागतिक दिन
🎗️हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
🎗️आंतरराष्ट्रीय सुडोकू दिन
✒️✒️आजचा दिनविशेष – घटना
👉1543 : नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.
👉1791 : वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.
👉1839 : जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.
👉1850 : कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे 31वे राज्य बनले.
👉1939 : प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.
👉1945 : दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.
👉1985 : मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.
👉1990 : श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे 184 तामिळींची हत्या केली.
👉1991 : ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
👉1994 : स्पेस शटल प्रोग्राम : STS-64 वर स्पेस शटल डिस्कव्हरी लाँच करण्यात आली.
👉1997 : 7 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.
👉2001 : व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
👉2006 : स्पेस शटल प्रोग्राम : स्पेस शटल अटलांटिस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे एकत्रीकरण पुन्हा सुरू करण्यासाठी STS-115 वर प्रक्षेपित करण्यात आले. 2003 मध्ये कोलंबिया आपत्तीनंतरची ही पहिली ISS असेंब्ली मिशन आहे
👉2009 : दुबई मेट्रो, अरबी द्वीपकल्पातील पहिले शहरी रेल्वे नेटवर्क, समारंभपूर्वक उद्घाटन झाले.
👉2012 : सलग 21 यशस्वी PSLV प्रक्षेपणांच्या मालिकेत भारतीय अंतराळ संस्थेने आतापर्यंतचा सर्वात वजनदार परदेशी उपग्रह प्रक्षेपण केले.
👉2015 : एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.
👉2016 : उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.
✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म
▶️1828 : ‘लिओ टॉलस्टॉय’ – रशियन लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 20 नोव्हेंबर 1910)
▶️1850 : ‘भारतेंदू हरिश्चंद्र’ – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 6 जानेवारी 1885)
▶️1890 : ‘कर्नल सँडर्स’ – केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 डिसेंबर 1980)
▶️1910 : ‘नवलमल फिरोदिया’ – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू : 26 मार्च 1997)
▶️1904 : ‘फिनोझ खान’ – भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू यांचा जन्म. (मृत्यू : 21 एप्रिल 2005)
▶️1905 : ‘ब्रह्मारीश हुसैन शा’ – भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 24 सप्टेंबर 1981)
▶️1909 : ‘लीला चिटणीस’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 14 जुलै 2003)
▶️1941 : ‘अबीद अली’ – अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म.
▶️1941 : ‘डेनिस रिची’ – सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 12 ऑक्टोबर 2011)
▶️1950 : ‘श्रीधर फडके’ – संगीतकार यांचा जन्म.
▶️1967 : ‘अक्षयकुमार’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
▶️1974 : ‘कॅप्टन विक्रम बात्रा’ – कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
➡️1438 : ‘एडवर्ड’ – पोर्तुगालचा राजा यांचे निधन. (जन्म : 31 ऑक्टोबर 1391)
➡️1942 : ‘शिरीष कुमार’ – स्वातंत्र्यसैनिक यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म : 28 डिसेंबर 1926)
➡️1960 : ‘जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर यांचे निधन. (जन्म : 6 एप्रिल 1890)
➡️1976 : ‘माओ त्से तुंग’ – आधुनिक चीनचे शिल्पकार यांचे निधन. (जन्म : 26 डिसेंबर 1893)
➡️1978 : ‘जॅक एल. वॉर्नर’ – वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक यांचे निधन. (जन्म : 2 ऑगस्ट 1892)
➡️1994 : ‘सत्यभामाबाई पंढरपूरकर’ – लावणी सम्राज्ञी यांचे निधन.
➡️1997 : ‘आर. एस. भट’ – युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन.
➡️1999 : ‘पुरुषोत्तम दारव्हेकर’ – नाटककार व लेखक यांचे निधन.
➡️2001 : ‘अहमदशाह मसूद’ – अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री यांची हत्या. (जन्म : 2 सप्टेंबर 1953)
➡️2010 : ‘वसंत नीलकंठ गुप्ते’ – समाजवादी कामगारनेते, लेखक यांचे निधन. (जन्म : 9 मे 1928)
➡️2012 : ‘व्हर्गिस कुरियन’ – भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1921)
✒️✒️ जागतिक दिन लेख
🌍🌍शिक्षणावर होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षणाचा आंतरराष्ट्रीय दिवस
शिक्षणावर होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षणाचा आंतरराष्ट्रीय दिवस 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरात शिक्षणावरील हल्ल्यांचे गांभीर्य आणि त्यांचे दूरगामी परिणाम यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पाळला जातो. युद्धग्रस्त आणि संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये शालेय संस्था, विद्यार्थी, आणि शिक्षक अनेकदा हिंसाचाराचे लक्ष्य बनतात. यामुळे शैक्षणिक प्रणालींची हानी होते आणि लाखो मुलांचे भविष्य धोक्यात येते.संयुक्त राष्ट्र आणि विविध आंतरराष्ट्रीय संस्था या दिवशी शिक्षणावर होणाऱ्या हल्ल्यांवर लक्ष केंद्रित करून या समस्येच्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांनी शिक्षण क्षेत्रात सुरक्षितता आणि सुरक्षा निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. या दिवसाच्या माध्यमातून शिक्षणाच्या अधिकाराला समर्थन देणे, आणि शिक्षण हे प्रत्येक मुलाचे मूलभूत हक्क आहे, हे अधोरेखित केले जाते.
शिक्षणावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे केवळ विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही, तर संपूर्ण समाजाचे भवितव्य अंधकारमय होते. म्हणूनच, हा दिवस आपल्याला या समस्येचे गांभीर्य जाणून घेण्यास आणि या हल्ल्यांपासून शिक्षण संस्थांचे रक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यास महत्त्वाचा आहे.
🌍🌍 आंतरराष्ट्रीय सुडोकू दिन
आंतरराष्ट्रीय सुडोकू दिन दरवर्षी 9 सप्टेंबरला साजरा केला जातो. सुडोकू हा खेळ जगभरात लोकप्रिय आहे, कारण तो बुद्धिमत्तेचा खेळ आहे जो मेंदूला चालना देतो. सुडोकूचे मूलत : गणिताशी थेट संबंध नसून, हा एक तर्कशक्तीवर आधारित कोडे आहे. यामध्ये 9×9 च्या ग्रिडमध्ये संख्यांना अशा पद्धतीने मांडायचे असते की प्रत्येक पंक्ती, स्तंभ, आणि 3×3 च्या उप-ग्रिडमध्ये 1 ते 9 या सर्व संख्यांचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय सुडोकू दिन हा खेळाच्या प्रेमींसाठी एक विशेष दिवस आहे, जो त्यांच्या आवडत्या खेळाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रेरणा देतो. या दिवशी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये सुडोकू प्रेमी आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करतात. हा दिवस फक्त मनोरंजनासाठीच नाही, तर मेंदूला ताजेतवाने करण्यासाठी आणि तर्कशक्ती वाढविण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉आवळा देऊन कोहळा काढणे – आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 हातचा मळ असणे – सहज शक्य असणे .
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 कविता करणारा – कवी
🙏 प्रार्थना 🙏
हे शारदे माँ- हे शारदे माँ
हे शारदे माँ- हे शारदे माँ अज्ञानता से हमें तार दे माँ तू स्वर की देवी, ये संगीत तुझसे। हर शब्द तेरा, ये हर गीत तुझसे ।। हम हैं अकेले, हम हैं अधूरे। तेरी शरण हम, हमें प्यार दे माँ। हे शारदे माँ
मुनियों ने समझी, गुणियों ने जानी। वेदों की भाषा, पुराणों की वाणी।। हम भी तो समझें, हम भी तो जानें। विद्या का हमको तू अधिकार दे माँ।। हे शारदे माँ
तू श्वेतवर्णी कमल पे विराजे। हाथों में वीणा मुकुट सिर पे साजे।। मन से हमारे मिटा दो अँधेरे। उजालों का हमको तू संसार दे माँ।। हे शारदे माँ
📝 बोधकथा 📝
एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,\”दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?\” लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,\”अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो.\”
तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.
📘 दिनांकानुसार पाढा :- ९ चा पाढा
९ ५४
१८ ६३
२७ ७२
३६ ८१
४५ ९०
🌍🌍🕐🕐🌍🌍🕐🕐🌍🌍🕐🕐🌍🌍🕐🕐🌍🌍🌍🕐🕐🌍🌍🕐🕐
📝 प्रश्नावली 📝
प्रश्न १. गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?
उत्तर :- सरपंच
प्रश्न २. गावात कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?
उत्तर :- पोलीस पाटील
प्रश्न ३. महाराष्ट्रातील \’जंगलाचा जिल्हा\’ कोणता ?
उत्तर :-गडचिरोली
प्रश्न ४. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर :- अहिल्यानगर
प्रश्न ५.महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
उत्तर:- मुंबई शहर
📋📋📝📝📋📋📝📝📋📋📝📝📋📋📋📝📝📋📋📝📝
👉आपल्या माहितीसाठी
*92 वी घटनादुरुस्ती कायदा, 2003 :*
◾️आठव्या परिशिष्टामध्ये चार भाषांचा समावेश करण्यात आला
◾️ अधिकृत भाषा संख्या 18 वरून 22 करण्यात आली
◾️बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली यांना आठव्या शेड्यूलमध्ये जोडण्यात आले
➖➖➖➖
*95 वी घटनादुरुस्ती कायदा, 2009*
◾️ अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण 10 वर्षांनी वाढवण्यात आले (लोकसभा + राज्यांच्या विधानपरिषद मध्ये)-2020 पर्यंत
◾️ अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व 10 वर्षांनी वाढवली
➖➖➖➖
*97 वी घटनादुरुस्ती 2011*
◾️ सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण
◾️सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार (अनुच्छेद 19)
◾️सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य धोरणाचे नवीन मार्गदर्शक तत्व (अनुच्छेद 43-B)
◾️सहकारी संस्थांसाठी राज्यघटनेत नवीन भाग IX-B समाविष्ट केला
➖➖➖➖
*99 वी घटनादुरुस्ती 2014*
◾️ सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणुकीसाठी राष्ट्रीय न्यायालय नेमणूक आयोग स्थापना (2015 ला हा SC ने रद्द केली घटनादुरुस्ती)
➖➖➖
*100 वी घटनादुरुस्ती 2015*
◾️भारत आणि बांगलादेश यांच्यातील 1974 च्या भू-सीमा करारानुसार काही भाग बांगलादेश ला दिला तर काही भाग भारताने घेतला
◾️यानुसार राज्यघटनेच्या पहिल्या शेड्यूलमधील चार राज्यांच्या ●आसाम ●पश्चिम बंगाल ●मेघालय ●त्रिपुरा प्रदेशांशी संबंधित तरतुदींमध्ये दुरुस्ती केली गेली
➖➖➖➖
*101 वी घटना दुरुस्ती कायदा, 2016*
◾️वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला.
➖➖➖➖➖
*102 वी सुधारणा कायदा, 2018*
◾️ 1993 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला (NCBC) घटनात्मक दर्जा देण्यात आला.
◾️ सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला
➖➖➖➖
*103 वी घटनादुरुस्ती 2019*
◾️EWS 10% आरक्षण
➖➖➖➖
*104 वी घटना दुरुस्ती कायदा, 2020*
◾️ अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण दहा वर्षांनी वाढवण्यात आले (लोकसभा + राज्यांच्या विधानपरिषद मध्ये)
◾️ अँग्लो इंडियन समाजाचे राखीव प्रतिनिधित्व बंद केले
➖➖➖➖
*105 वी घटनादुरुस्ती कायदा, 2021*
⭐️सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) यादी तयार करण्यासाठी राज्य सरकारांचे अधिकार दिला आणि ती यादी केंद्रीय यादीपेक्षा भिन्न असू शकते
➖➖➖
*106 वी घटनादुरुस्ती 2023.*
⭐️लोकसभा , राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभा मधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी येत्या 15 वर्षांच्या कालावधीसाठी राखीव ठेवण्यासाठी