📖 वाचाल तर वाचाल 📖
📘परिपाठ📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- १४ सप्टेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- शनिवार
📙📘सुविचार :- कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍आजचा जागतिक दिन
🎗️ हिंदी दिवस
✒️✒️आजचा दिनविशेष – घटना
▶️1862 : अमेरिकन गृहयुद्ध : दक्षिण माउंटनची लढाई, मेरीलँड मोहिमेचा एक भाग, लढली गेली.
▶️1893 : सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.
▶️1901 : अराजकतावादी लिओन झोल्गोझ यांनी 6 सप्टेंबर रोजी प्राणघातक जखमी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष विल्यम मॅककिन्ले यांचे निधन झाले आणि त्यांच्यानंतर उपाध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी पदभार स्वीकारला.
▶️1917 : रशियाने स्वत :ला प्रजासत्ताक घोषित केले.
▶️1948 : दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.
▶️1949 : हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
▶️1959 : सोव्हिएत संघाचे लुना 2 हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.
▶️1960 : ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.
▶️1978 : व्हेनेरा-2 हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.
▶️1995 : संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
▶️1997 : बिलासपूर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत 81 जण ठार झाले.
▶️1999 : किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
▶️2000 : मायक्रोसॉफ्ट कंपनी ने विंडोज एमई रिलीज केले.
▶️2003 : इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.
▶️2007 : 2007-2008 चे आर्थिक संकट : नॉर्दर्न रॉक बँकेने युनायटेड किंगडममध्ये 150 वर्षांमध्ये चालवलेली पहिली बँक रन अनुभवली.
✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म
➡️1713 : ‘योहान कीज’ – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 29 जुलै 1781)
➡️1867 : ‘विष्णू नरसिंह जोग’ – वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 5 फेब्रुवारी 1920)
➡️1774 : ‘जनरल लॉर्ड विलियम बेंटीक’ – भारतातील 14वे राज्यपाल यांचा जन्म. (मृत्यू : 17 जून 1839)
➡️1897 : ‘पार्श्वनाथ आळतेकर’ – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 1957)
➡️1901 : ‘यमुनाबाई हिर्लेकर’ – शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यांचा जन्म.
➡️1921 : ‘दर्शनसिंहजी महाराज’ – शीख संतकवी यांचा जन्म. (मृत्यू : 30 मे 1989)
➡️1923 : ‘राम जेठमलानी’ – केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित यांचा जन्म.
➡️1932 : ‘डॉ. काशीनाथ घाणेकर’ – रंगभूमी, चित्रपटातील अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 2 मार्च 1986)
➡️1948 : ‘वीणा सहस्रबुद्धे’ – ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका यांचा जन्म.
➡️1957 : ‘केपलर वेसेल्स’ – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
➡️1963 : ‘रॉबिन सिंग’ – अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचा जन्म.
➡️1984 : ‘आयुष्मान खुराना’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
👉1901 : ‘विल्यम मॅकिन्ले’ – अमेरिकेचे 25वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1843)
👉1979 : ‘नूर मोहमद तराकी’ – अफगणिस्तानचे तीसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 15 जुलै 1917)
👉1989 : ‘बेंजामिन पिअरी पाल’ – भारतीय कृषी संशोधक यांचे निधन. (जन्म : 26 मे 1906)
👉1998 : ‘प्रा. राम जोशी’ – शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन.
👉2011 : ‘हरिश्चंद्र बिराजदार’ – कुस्तीगीर व प्रशिक्षक यांचे निधन. (जन्म : 5 जून 1950)
👉2015 : ‘फ्रेड डेलुका’ – सबवे चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 3 ऑक्टोबर 1947)
🌍🌍 जागतिक दिन लेख
हिंदी दिवस
हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबरला साजरा केला जातो. 1949 साली, भारताच्या राज्यघटनेत हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला, आणि या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हिंदी दिवस साजरा केला जातो.हिंदी भाषा आपल्या देशातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय भाषांपैकी एक आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदी ही प्रमुख भाषा म्हणून ओळखली जाते, आणि ती लाखो लोकांची संवाद साधण्याचे माध्यम आहे.
हिंदी दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार वाढवणे.हिंदी दिवस आपल्याला आपल्या भाषिक वारशाचे स्मरण करून देतो आणि आपल्याला तिच्या संवर्धनाची जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करतो. हिंदी ही आपल्या ओळखीचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. तिच्या समृद्धी आणि प्रसारासाठी, तसेच भारतातील विविधता एकत्रित करण्यासाठी, हिंदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदी दिवस आपल्याला या सर्व गोष्टींची जाणीव करून देतो.
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉एका खांबावर द्वारका – एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 सोन्याचे दिवस येणे – अतिशय चांगले दिवस येणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 कादंबरी लिहिणारा – कादंबरीकार
🙏 प्रार्थना 🙏
या लाडक्या मुलांनो
या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार ।
नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार ॥धृ।।
आईस देव माना, वंदा गुरुजनांना।
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा ।
गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥१॥
शिवबापरी जगांत, दिलदार थोर व्हावे।
टिळकापरी सदैव, ध्येयास त्या स्मरावें।
जे चांगलें जगी या, त्याचा करा स्वीकार।।२।।
शाळेत रोज जाता, ते ज्ञान-बिंदु मिळवा।
हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा।
कुलशील थोर माना, ठेवू नका विकार ॥३॥
📝 बोधकथा 📝
ससा आणि कासवाची शर्यत
ससा आणि कासव असे दोघे मित्र होते. सशाला वेगाने पळायला आवडे. कासव बिचारे सावकाश चाले. एकदा दोघांनी दूरच्या डोंगरावरील झाडास आधी कोण शिवतो? अशी पैज लावली. दोघेही निघाले. ससा पळत पुढे निघाला. कासव मात्र सावकाश चालत राहिले. थोडे अंतर गेल्यानंतर वाटेत एक हिरवेगार शेत लागले. त्यात गाजरे लावली होती. सशाने मागे वळून पाहिले, तर कासव खूप दूर होते. त्याने विचार केला, आपण तोपर्यंत गाजरे खाऊ फार तर कासव शेतापर्यंत येईल. मग आपण पुन्हा पळत पुढे जाऊ. सशाने गाजरे खावयास सुरुवात केली. अगदी पोटभर गाजरे खाल्ली. कासव अजूनही दूरच होते. सशास आता झोप येऊ लागली. त्याने विचार केला, आपण थोडी झोप घेऊ तोपर्यंत फार तर कासव शेताच्या थोडे पुढे जाईल; पण आपण ताजे तवाने होऊन जोरात पळू व शर्यत जिंकू. सशाने छान पैकी ताणून दिली. ससा झोपला. इकडे कासवाने ससा झोपला असल्याचे पाहिले पण ते थांबले नाही; तसेच चालत राहिले. थोड्या वेळाने सशास जाग आली पहातो तर काय ? कासव झाडाच्या अगदी जवळ होते. सशाने खूप जोरात धाव घेतली; पण तोपर्यंत कासव झाडापाशी पोचले देखील, अशा रितीने कासवाने शर्यत जिंकली.
तात्पर्य :- सावकाश आणि सतत काम केल्याने यश मिळते.
📘 दिनांकानुसार पाढा :- १४ चा पाढा
१४ ८४
२८ ९८
४२ ११२
५६ १२६
७० १४०
🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🕐🌍🌍🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🕐🌍🕐🌍🕐🌍🕐🌍
📝 प्रश्नावली १८० 📝
प्रश्न १. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
उत्तर :- भारतरत्न
प्रश्न २. महाराष्ट्राचा RTO Code काय आहे ?
उत्तर :- MH
प्रश्न ३. भारतरत्नाने सन्मानित होणारा पहिला खेळाडू कोण ?
उत्तर :- मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर
प्रश्न ४. संविधानाने मान्य केलेल्या भारतीय भाषा किती ?
उत्तर :- 22
प्रश्न ५. महाराष्ट्राचा नृत्यप्रकार कोणता ?
उत्तर :- लावणी
📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📋📝📋📝📋📝📋📝📋
👉आपल्या माहितीसाठी.
भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे
⭐️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
◾️3 मार्च रोजी हैतीने आणीबाण
⭐️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन दोस्त: तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी
⭐️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन.
⭐️ऑपरेशन कावेरी :- सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन अजय :- इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन राहत :- येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले.
⭐️ऑपरेशन करूणा : मोर्चा चक्रीवादळ दरम्यान म्यानमारला मदतीसाठी राबवले होते
⭐️ऑपरेशन ऑल आउट आणि ऑपरेशन सर्व शक्ती : भारतीय सेनेने जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांना संपवण्यासाठी सुरू केले.