📖 वाचाल तर वाचाल 📖
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ३ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- गुरुवार
📙📘सुविचार :- स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करावी लागते.
📙📘📙 दिनविशेष
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
👉1670 : शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरतवर हल्ला केला.
👉1949 : WERD, युनायटेड स्टेट्समधील पहिले कृष्णवर्णीय मालकीचे रेडिओ स्टेशन, अटलांटा येथे उघडले.
👉1952 : युनायटेड किंग्डमने अण्वस्त्राची यशस्वी चाचणी केली, जगातील तिसरे अण्वस्त्रधारी राष्ट्र बनले.
👉1962 : प्रकल्प बुध : सिग्मा 7 मधील यूएस अंतराळवीर वॅली शिर्रा, केप कॅनवेरल येथून सहा-ऑर्बिट फ्लाइटसाठी प्रक्षेपित केले गेले.
👉1985 : स्पेस शटल अटलांटिसने एसटीएस-51-जे वर दोन DSCS-III उपग्रह घेऊन पहिले उड्डाण केले.
👉1990 : पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी पुन्हा एकत्र झाले.
👉2008 : राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी यूएस आर्थिक व्यवस्थेसाठी 2008 च्या आपत्कालीन आर्थिक स्थिरीकरण कायद्यावर स्वाक्षरी केली.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
▶️1903 : ‘स्वामी रामानंद तीर्थ’ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 22 जानेवारी 1972)
▶️1907 : ‘नरहर शेषराव पोहनेरकर’ – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 2 सप्टेंबर 1990)
▶️1919 : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचा जन्म. (मृत्यू : 9 जानेवारी 2013)
▶️1921 : ‘रे लिंडवॉल’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 23 जून 1996)
▶️1947 : ‘फ्रेड डेलुका’ – सबवे रेस्टॉरंट चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 14 सप्टेंबर 2015)
▶️1949 : ‘जे. पी. दत्ता’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
✒️✒️आजचा दिनविशेष – मृत्यू
➡️1959 : ‘दत्तात्रय तुकाराम बांदेकर’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक यांचे निधन. (जन्म : 22 सप्टेंबर 1909)
➡️1995 : ‘मायलापुर पोन्नुसामी शिवगनम’ – भारतीय लेखक व राजकारणी यांचे निधन. (जन्म : 26 जुन 1906)
➡️1999 : ‘अकिओ मोरिटा’ – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 26 जानेवारी 1921)
➡️2007 : ‘एम. एन. विजयन’ – भारतीय पत्रकार, लेखक यांचे निधन. (जन्म : 8 जून 1930)
➡️2012 : ‘केदारनाथ सहानी’ – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1926)
======££££====££££====££££====££££==
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 उठता लाथ बसता बुक्की – प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 अत्तराचे दिवे जळणे – भरपूर उधळपट्टी करणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 सतत पडणारा पाऊस – झडी
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
शारदे माँ, हे शारदे माँ
हे शारदे माँ, हे शारदे माँ
हे शारदे माँ, हे शारदे माँ
अज्ञानता से हमें तार दे माँ हे शारदे माँ॥
तू स्वर की देवी, ये संगीत तुझसे
हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे
हम है अकेले, हम है अधूरे
तेरी शरण हम, हमें प्यार दे माँ
हे शारदे माँ, हे शारदे माँ
अज्ञानता से हमें तार दे माँ॥
मुनियों ने समझी, गुणियों ने जानी
वेदों की भाषा, पुराणों की बानी
हम भी तो समझे, हम भी तो जाने
विद्या का हमको अधिकार दे माँ
हे शारदे माँ, हे शारदे माँ
अज्ञानता से हमें तार दे माँ॥
तू श्वेतवर्णी, कमल पर विराजे
हाथों में वीणा, मुकुट सर पे साजे
मन से हमारे मिटाके अँधेरे
हमको उजालों का संसार दे माँ
हे शारदे माँ, हे शारदे माँ
अज्ञानता से हमें तार दे माँ॥
📘 दिनांकानुसार पाढा :- ३ चा पाढा
३ १८
६ २१
९ २४
१२ २७
१५ ३०
🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇
📝 प्रश्नावली १९२ 📝
प्रश्न १. पुरंदरचा तह शिवाजी महाराज आणि —– यांच्यामध्ये झाला ?
उत्तर :- जयसिंह ( ११ जून १६६५ )
प्रश्न २. नुकतेच महाराष्ट्र शासनाने कोणत्या प्राण्याला रज्यमाता घोषित केले ?
उत्तर :- गाई
प्रश्न ३. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?
उत्तर :- अरबी समुद्र
प्रश्न ४. सोडियम क्लोराईड म्हणजेच —?
उत्तर :- मीठ
प्रश्न ५. लसीकरणाच जनक कोणाला म्हणतात ?
उत्तर :- एडवर्ड जेन्नर
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
👉 आपल्या माहितीसाठी.
🌏महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा 🌏
1. वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
2. उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गानिकार टेकड्या.
3. ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
4. पूर्वेस: चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर,
5. दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
🌏 महाराष्ट्राच्या राजकीय सीमा व सरहद्द 🌏
◾️पश्चिमेस : अरबी समुद्र
◾️वायव्येस: गुजरात व दादरा नगर हवेली.
◾️उत्तरेस : मध्यप्रदेश.
◾️पूर्वेस : छत्तीसगड.
◾️आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
◾️ दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.