📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ४ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- शुक्रवार
📙📘सुविचार :- धैर्य ही कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे.
📙📘📙 दिनविशेष
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
👉1943 : दुसरे महायुद्ध – युनायटेड स्टेट्सने सॉलोमन बेटांवर कब्जा केला.
👉1957 : स्पुतनिक 1 पृथ्वीभोवती फिरणारा पहिला कृत्रिम उपग्रह बनला
👉1959 : सोव्हिएत रशियाच्या लुनिक-3 अंतराळयानाने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली आणि चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाची छायाचित्रे घेतली.
👉1966 : युनायटेड किंगडमपासून बासुटोलँडचे स्वातंत्र्य. राष्ट्राचे नवीन नाव लेसोथो
👉1983 : नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – 2 ही गाडी ताशी 1019 किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.
👉1992 : मोझांबिकमधील गृहयुद्ध संपुष्टात आले.
👉2006 : ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.
✒️ आजचा दिनविशेष – जन्म
➡️1822 : ‘रुदरफोर्ड हेस’ – अमेरिकेचे 19 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 17 जानेवारी 1893)
➡️1884 : ‘रामचंद्र शुक्ला’ – भारतीय इतिहासकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 2 फेब्रुवारी 1941)
➡️1913 : ‘सरस्वतीबाई राणे’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू : 10 ऑक्टोबर 2006)
➡️1913 : ‘मार्टिअल सेलेस्टीन’ – हैती देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 4 फेब्रुवारी 2011)
➡️1914 : ‘म. वा. धोंड’ – मराठी समीक्षक यांचा जन्म.
➡️1916 : ‘धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला’ – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक यांचा जन्म.
➡️1928 : ‘ऑल्विन टॉफलर’ – अमेरिकन पत्रकार व लेखक यांचा जन्म.
➡️1935 : ‘अरुण सरनाईक’ – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जून 1984)
➡️1997 : ‘ऋषभ पंत’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
▶️1847 : ‘राजे प्रतापसिंह भोसले’ – महाराष्ट्रातील प्रजाहितदक्ष राजे यांचे निधन. (जन्म : 18 जानेवारी 1793)
▶️1921 : ‘केशवराव भोसले’ – गायक, नट यांचे निधन. (जन्म : 9 ऑगस्ट 1890)
▶️1966 : ‘अनंत अंतरकर’ – सत्यकथा चे संपादक यांचे निधन. (जन्म : 1 डिसेंबर 1911)
▶️1982 : ‘सोपानदेव चौधरी’ – मराठी कवी यांचे निधन. (जन्म : 16 ऑक्टोबर 1907)
▶️1989 : ‘पं. राम मराठे’ – संगीतकार, गायक व नट संगीतभूषण यांचे निधन. (जन्म : 23 ऑक्टोबर 1924)
▶️2002 : ‘भाई भगत’ – वृत्तपत्र निवेदक यांचे निधन.
▶️2015 : ‘एडिडा नागेश्वर राव’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म : 24 एप्रिल 1934)
===££££====££££====££££====££££==
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 उधारीची पोते, सव्वा हात रिते – उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 हस्तगत करणे – ताब्यात घेणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 कधीही मरण नसणारे – अमर
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
हमको मन की शक्ति, देना….
हमको मन की शक्ति, देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद की जय करें
हमको मन की शक्ति, देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद की जय करें
भेद-भाव अपने दिल से साफ़ कर सकें
दूसरों से भूल हो तो माफ़ कर सकें
झूठ से बचे रहें, सच का दम भरें
दूसरों की जय से पहले खुद की जय करें
हमको मन की शक्ति, देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद की जय करें
मुश्किलें पड़े तो हम पे, इतना कर्म करें
साथ दे तो धर्म का, चलें तो धर्म पर
खुदपे होसला रहे, बदी से ना डरें
दूसरों की जय से पहले, खुद को जय करें
📘 दिनांकानुसार पाढा :- ४ चा पाढा
४ २४
८ २८
१२ ३२
१६ ३६
२० ४०
🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇
📝 प्रश्नावली १९३ 📝
प्रश्न १. मलेरियाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो ?
उत्तर :- ॲनफिलीस डासाची मादी
प्रश्न २. ओ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?
उत्तर :- रातांधळेपणा
प्रश्न ३. पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?
उत्तर :- सूर्यप्रकाश
प्रश्न ४. हाडे बळकट होण्यासाठी कोणत्या जीवनसत्त्वाची आवश्यकता असते ?
उत्तर :- ड जीवनसत्व
प्रश्न ५. पेसमेकर हे —– चा विकार असलेल्या लोकांसाठी वापरले जाते ?
उत्तर :- हृदयाचा
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
👉 आपल्या माहितीसाठी
🔥मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा..🔥
▪️ऑक्टोबर 2024 पर्यंत भारतातील पुढील 11 भाषांना अभिजात भाषांचा (Classical Languages) दर्जा प्राप्त झालेला आहे.
1) तमिळ (2004) T
2) संस्कृत (2005) S
3) कन्नड (2008) K
4) तेलगू (2008) T
5) मल्याळम (2013) M
6) ओडिया (2014) O
▪️2024 :
7) मराठी
8) पाली
9) बंगाली
10) आसामी
11) प्राकृत
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पुढील 4 निकष लावले जातात :
1) भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान
1500-2000 वर्षे प्राचीन असावा.
2) हे साहित्य महत्वाचे, मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, ती
कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) सध्याच्या भाषेपासून स्वरुप वेगळे असावे.