“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी.” प्रश्नावली 194

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
6 Min Read

           📖 वाचाल तर वाचाल 📖

       📘 आजचा परिपाठ 📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- ५ ऑक्टोबर २०२४

🔊🔊 आजचा वार:- शनिवार

📙📘सुविचार :-  आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे .

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन

🎗️ जागतिक शिक्षक दिन

🎗️🎗️आजचा दिनविशेष – घटना

▶️1864 : तीव्र चक्रीवादळामुळे कोलकाता शहराचा नाश झाला, सुमारे 60,000 लोकांचा मृत्यू झाला.
▶️1948 : IUCN स्थापना
▶️1948 : अश्गाबात भूकंपात सुमारे 110,000 लोकांचा मृत्यू झाला.
▶️1955 : पंडित नेहरूंच्या हस्ते हिंदुस्थान मशीन टूल्स कारखान्याचे उद्घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
🎆1962 : डॉ. नो हा पहिला जेम्स बाँड चित्रपट प्रदर्शित झाला.
▶️1989 : मीरासाहेब फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
▶️1995 : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर झाला.
▶️1998 : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.


✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

➡️1890 : ‘किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला’ – तत्त्वज्ञ व हरिजन चे संपादक यांचा जन्म.
➡️1922 : ‘यदुनाथ’ – थत्ते लेखक, संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 10 मे 1998)
➡️1922 : ‘शंकरसिंग रघुवंशी’ – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 26 एप्रिल 1987)
➡️1923 : ‘कैलाशपती मिश्रा’ – गुजरातचे राज्यपाल यांचा जन्म. (मृत्यू : 3 नोव्हेंबर 2012)
➡️1932 : ‘माधव आपटे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
➡️1964 : ‘सरबिंदू मुखर्जी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.


✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

👉1929 : ‘वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली’ – भारतीय पुजारि यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1876)
👉1981 : ‘भगवतीचरण वर्मा’ – पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हिन्दी लेखक यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1903)
👉1990 : ‘राजकुमार वर्मा’ – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1905)
▶️1991 : ‘रामनाथ गोएंका’ – इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1904)
👉1992 : ‘बॅ. परशुराम भवानराव पंत’ – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री यांचे निधन.
👉1997 : ‘चित्त बसू’ – संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस यांचे निधन. (जन्म : 25 डिसेंबर 1926)
👉2011 : ‘स्टीव्ह जॉब्ज’ – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 24 फेब्रुवारी 1955)

🌍जागतिक दिन लेख

            जागतिक शिक्षक दिन
जागतिक शिक्षक दिन दरवर्षी 5 ऑक्टोबरला साजरा केला जातो, जो शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आहे. युनेस्कोने 1994 साली हा दिन स्थापन केला, जो 1966 च्या शिक्षकांच्या स्थितीवर केलेल्या शिफारशीच्या वार्षिक स्मरणार्थ आहे. या दिवशी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले जाते, कारण ते केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये जीवनातील मूल्ये आणि कौशल्ये रुजवण्यासाठी प्रयत्नशील असतात.

शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ असतात, जे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि वैयक्तिक आव्हानांचा सामना करण्यास सक्षम करतात. या दिवशी विविध देशांमध्ये शिक्षकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाते, जसे की कमी संसाधने, अल्प वेतन, आणि जास्त कामाचा ताण. प्रत्येक वर्षी या दिवसाचे वेगळे विषय असतात, जसे की शिक्षकांचे सशक्तीकरण, शिक्षणातील नवकल्पना, आणि समान संधी. हा दिवस शिक्षकांना सन्मानित करण्याचा आणि समाजाच्या प्रगतीत त्यांच्या भूमिकेची जाणीव करून देण्याचा दिवस आहे.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉  काना मागुन आली आणि तिखट झाली – श्रेष्ठ पेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  केसाने गला कापणे – घात करणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉  पायात काहीही न घालणारा – अनवाणी

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                     🙏 प्रार्थना 🙏

        तुम ही हो माता

तुम ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो॥धृ॥

तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे
कोई न अपना, सिवा तुम्हारे
तुम्ही हो नैया, तुम्ही खिवय्या॥१॥

जो खिल सके ना, वो फूल हम है
तुम्हारे चरणों की धूल हम है।
दया की दृष्टी सदा ही रखना॥२॥
                                                                                                                                                                       
📘 दिनांकानुसार पाढा :- ५ चा पाढा

                                   ५           ३०
                                 १०           ३५
                                 १५           ४०
                                 २०           ४५
                                 २५           ५०

     🎆🎇🎆🎇🎆🎇🎇🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆

                 📝 प्रश्नावली १९४ 📝

प्रश्न १. नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे ?
उत्तर – मराठी

प्रश्न २. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर :- खान अब्दुल गफार खान.

प्रश्न ३. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली ?
उत्तर :- बलवंतराय मेहता समिती.

प्रश्न ४. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो?
उत्तर :- जपान

प्रश्न ५. सोलापूर जिल्ह्यात —- येथे माळढोक अभयारण्य आहे?
उत्तर :- नान्नज.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

👉 आपल्या माहितीसाठी

*भारतात आत्ताच्या घडीला 11 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे.*
◾️तामिळ (2004)
◾️संस्कृत (2005)
◾️कन्नड (2008)
◾️तेलुगु (2008)
◾️मल्याळम (2013)
◾️ओडिया (2014)

*मराठी 2024.*
👉 पाली,
👉प्राकृत,
👉आसामी
👉बंगाली

*अभिजात भाषेचा दर्जा*
.*(ClassicalLanguage)*

मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात
◾️संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावा
◾️या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे
◾️भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी
◾️प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे
*अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो.*

◾️काही प्रमाणात पैसे मिळतात
◾️अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. 
◾️अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं
◾️प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं
◾️मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करण
◾️प्राचीन ग्रंथ अनुवादित केले जातात

Share This Article