“ज्ञानाची वारी,आली आपल्या दरी.” प्रश्नावली 195

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
6 Min Read

           📖 वाचाल तर वाचाल 📖

     📘आजचा परिपाठ 📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- ७ ऑक्टोबर २०२४

🔊🔊 आजचा वार:- सोमवार

📙📘सुविचार :-  केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन

🎗️ जागतिक कापूस दिवस

✒️✒️आजचा दिनविशेष – घटना

▶️3761 : 3761ई.पूर्व : हिब्रू कॅलेंडरनुसार जगाचा पहिला दिवस.
▶️1905 : पुण्यात विलायती कपड्यांची होळी झाली. परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.
▶️1919 : महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले.
▶️1919 : के. एल. एम. (KLM) या विमान कंपनी म्हणून स्थापना झाली.
▶️1933 : पाच छोट्या कंपन्यांच्या एकत्रीकरणाने एअर फ्रान्सची स्थापना झाली.
▶️1949 : जर्मन लोकशाही प्रजासत्ताक (पूर्व जर्मनी) ची स्थापना.
▶️1958 : यूएस क्रूच्या अंतराळ उड्डाण प्रकल्पाचे नाव प्रोजेक्ट मर्करी असे करण्यात आले.
▶️2001 : 11 सप्टेंबरच्या हल्ल्याला उत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला.
▶️2002 : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे असेंब्ली सुरू ठेवण्यासाठी स्पेस शटल अटलांटिसचे STS-112 वर प्रक्षेपण

✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म

➡️1866 : ‘कृष्णाजी केशव दामले’  तथा केशवसुत – मराठी काव्याचे प्रवर्तक यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 1905)
➡️1885 : ‘नील्स बोहर’ – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 18 नोव्हेंबर 1962)
➡️1917 : ‘विनायक महादेव कुलकर्णी’ – कवी आणि बालकुमार-साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 13 मे 2010)
➡️1929 : ‘ग्रॅमी फर्ग्युसन’ – आयमॅक्स कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक यांचा जन्म.
➡️1952 : ‘व्लादिमीर पुतिन’ – रशियाचे 4 थे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
➡️1960 : ‘आश्विनी भिडे-देशपांडे’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
➡️1978 : ‘जहीर खान’ – भारतीय जलदगती गोलंदाज यांचा जन्म
➡️1981 : ‘अभिजीत सावंत’ – भारतीय गायक यांचा जन्म

✒️✒️आजचा दिनविशेष – मृत्यू

👉1708 : ‘गुरू गोबिंद सिंग’ – शिखांचे 10 वे गुरू यांचे निधन. (जन्म : 22 डिसेंबर 1666)
👉1975 : ‘देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा’ – कन्नड कवी व विचारवंत यांचे निधन. (जन्म : 18 जानेवारी 1889 – मुळबागल, कोलार, कर्नाटक)
👉1998 : ‘पद्मश्री भाऊसाहेब वर्तक’ – महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, यांचे निधन.
👉1999 : ‘उमाकांत निमराज ठोमरे’ – साहित्यिक, वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार यांचे निधन. (जन्म : 15 ऑगस्ट 1929 – अहमदनगर)

🌍🌍  जागतिक दिन लेख

                   जागतिक कापूस दिवस
             जागतिक कापूस दिन दरवर्षी 7 ऑक्टोबरला साजरा केला जातो. कापूस या महत्त्वपूर्ण पीकाचे जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या योगदानाला सन्मान देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अविभाज्य विकास संघटनेने (UNCTAD) 2019 साली जागतिक कापूस दिनाची स्थापना केली.
             कापूस हे केवळ वस्त्रउद्योगातच नव्हे तर अनेक औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरले जाते. कापसाच्या उत्पादनामुळे लाखो शेतकऱ्यांना रोजगार मिळतो. विशेषतः भारतासारख्या देशांमध्ये, कापसाचे उत्पादन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
जागतिक कापूस दिनानिमित्ताने, कापूस उद्योगातील शाश्वत विकास, तंत्रज्ञान, आणि शेतकऱ्यांना दिला जाणारा पाठिंबा याबाबत जागरूकता वाढवली जाते. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठांपर्यंत प्रवेश मिळवून देण्याचे महत्त्व अधोरेखित होते. यंदाच्या जागतिक कापूस दिनाचा मुख्य उद्देश कापूस उत्पादनाच्या शाश्वत पद्धतींवर आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानाच्या सुधारण्यावर आहे.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉  आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  सर्वस्व पणाला लावणे – सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे .

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉  खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                     🙏 प्रार्थना 🙏

हम होंगे कमयाब…

हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब,
हम होंगे कामयाब, एक दिन
मन में है विश्वास, पूरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन…

होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर
होगी शांति चारों ओर, एक दिन
मन में है विश्वास, पूरा है विश्वास
होगी शांति चारों ओर एक दिन…

हम चलेंगे साथ-साथ
डाल हाथों में हाथ
हम चलेंगे साथ-साथ, एक दिन
मन में है विश्वास, पूरा है विश्वास
हम चलेंगे साथ-साथ एक दिन…

नहीं डर किसी का आज
नहीं डर किसी का आज, एक दिन
मन में है विश्वास, पूरा है विश्वास
नहीं डर किसी का आज एक दिन…
                                                                                                                                                                               
📘 दिनांकानुसार पाढा :- ७ चा पाढा

                                   ७           ४२
                                 १४           ४९
                                 २१           ५६
                                 २८           ६३
                                 ३५           ७०
🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇
    

                📝 प्रश्नावली १९ 📝

प्रश्न १. भारतीय  संविधानास —- असेही म्हणतात ?
उत्तर – राज्यघटना

प्रश्न २. भारतीय राजमुद्रेखाली  कोणते वाचन लिहिले आहे ?
उत्तर :- सत्यमेव जयते.

प्रश्न ३. भारताचे ध्वजगीत कोणते आहे ?
उत्तर :- विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा.

प्रश्न ४. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते  ?
उत्तर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

प्रश्न ५. भारतीय राष्ट्रगीत मूळ कोणत्या भाषेत लिहिलेले आहे ?
उत्तर :- बंगाली

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

👉 आपल्या माहितीसाठी.

गुलिगत सुरज चव्हाणने उचलली बिग बॉस मराठीची ट्रॉफी, अभिजीत सावंत ठरला उपविजेता.

⭐️विजेता : सूरज चव्हाण
⭐️उपविजेता : अभिजित सावंत

⭐️बिगबॉस मराठी Sesson 5
⭐️अभिजित सावंत – इंडियन आयडल चा पहिला विजेता आहे

बुक्कीत टेंगुल 😎👊  Sq Rq Zq..

Share This Article