“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी.” प्रश्नावली 196

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
7 Min Read

         📖 वाचाल तर वाचाल 📖

     📘आजचा परिपाठ📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- ८ ऑक्टोबर २०२४

🔊🔊 आजचा वार:- मंगळवार

📙📘सुविचार :-  practice makes man perfect.
📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन

🎗️भारतीय हवाई दल दिन

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

👉1932 : इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.
👉1939 : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.
👉1959 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.
👉1962 : अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
👉1962 : नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.
👉1972 : वन्यजीव सप्ताह
👉1978 : ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर 317.60 ताशी मैल वेगाचा विक्रम केला.
👉1982 : पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.
👉2001 : सप्टेंबर 11 च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची  स्थापना केली.
👉2005 : काश्मीर मध्ये झालेल्या 7.6 रिश्टर भूकंपा मुळे सुमारे 86,000 – 87,500 लोक मृत्युमुखी पडले, 69,000- 72,500 जण जखमी झाले आणि 2.8 दशलक्ष लोक बेघर झाले.

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

➡️1891 : ‘शंकरराव वासुदेव किर्लोस्कर’ – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 1 जानेवारी 1975)
➡️1922 : ‘गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन’ – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 7 एप्रिल 2001 – चेन्नई, तामिळनाडू)
➡️1924 : ‘थिरूनलूर करुणाकरन’ – भारतीय कवि आणि स्कॉलर यांचा जन्म. (मृत्यू : 5 जुलै 2006)
➡️1926 : ‘कुलभूषण पंडित तथा राजकुमार’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू : 3 जुलै 1996)
➡️1930 : ‘अलेसदैर मिल्ने’ – भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता यांचा जन्म. (मृत्यू : 8 जानेवारी 2013)
➡️1935 : ‘मिल्खा सिंग’ – द फ्लाइंग सिख यांचा जन्म.
➡️1993 : ‘डॉ. काजल तांबे’ – पशुवैद्यक यांचा जन्म.

आजचा दिनविशेष – मृत्यू
▶️1888 : ‘महादेव मोरेश्वर कुंटे’ – कवी व संस्कृतचे प्राध्यापक यांचे निधन. (जन्म : 1 ऑगस्ट 1835 – माहुली, सांगली, महाराष्ट्र)
▶️1936 : ‘धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ प्रेमचंद’ – हिन्दी साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1880)
▶️1967 : ‘क्लेमंट अ‍ॅटली’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 3 जानेवारी 1883)
▶️1979 : ‘जयप्रकाश नारायण’ – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेतेलोकनायक यांचे निधन. (जन्म : 11 ऑक्टोबर 1902)
▶️1996 : ‘गोदावरी परुळेकर’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका यांचे निधन. (जन्म : 14 ऑगस्ट 1907)
▶️1998 : ‘इंदिराबाई हळबे’ – देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा यांचे निधन.
▶️2012 : ‘नवल किशोर शर्मा’ – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म : 5 जुलै 1925)
▶️2012 : ‘वर्षा भोसले’ – पत्रकार व पार्श्वगायिका यांचे निधन.
जागतिक दिन लेख

                 भारतीय हवाई दल दिन

              भारतीय हवाई दल दिन दरवर्षी 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो, जो 1932 साली भारतीय हवाई दलाच्या स्थापनेची आठवण करून देतो. या दिवसाचा उद्देश हवाई दलाच्या शौर्य, समर्पण, आणि त्यागाला सन्मान देणे आहे. भारतीय हवाई दल देशाच्या हवाई संरक्षणासाठी आणि आंतरराष्ट्रीय शांतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
                 भारतीय हवाई दलाने विविध युद्धांमध्ये आणि आपत्ती व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्ये, तसेच कारगिल युद्धात हवाई दलाने देशाच्या संरक्षणात निर्णायक भूमिका निभावली. आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक लढाऊ विमानं, आणि कुशल पायलट्स यांच्या बळावर भारतीय हवाई दल जगातील प्रमुख हवाई दलांमध्ये गणले जाते.
                 हवाई दल दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी विमानांचे भव्य प्रदर्शन, पथ संचलन, आणि शौर्य पदके प्रदान समारंभ आयोजित केले जातात. हा दिवस भारतीय हवाई दलाच्या पराक्रमाला आणि देशाच्या संरक्षणातील त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहण्याचा एक खास दिवस आहे.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉  आवळा देऊन कोहळा काढणे – आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे .

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  अभिवादन करणे – वंदन करणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 जे माहीत नाही ते – अज्ञात

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                     🙏 प्रार्थना 🙏

या भारतात बंधुभाव नित्य बसू दे।
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।
दे वरचि असा दे॥धृ॥

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे।
मतभेद नसू दे॥१॥

सकलांस कळो मानवता, राष्ट्रभावना।
ही सर्व स्थळी मिळुनी समुदाय-प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथे दिसू दे॥२॥

जातीभाव विसरूनिया एक हो आम्ही।
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी।
खलनिंदका मनींही सत्य न्याय वसू दे॥३॥

सौंदर्य रमो घराघरात स्वर्गियापरी।
ही नष्ट होऊ दे विपत्ति भीतीबावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजि बसू दे॥४॥
                                                                                                                                                                               
📘 दिनांकानुसार पाढा :- ८ चा पाढा

                                   ८           ४८
                                 १६           ५६
                                 २४           ६४
                                 ३२           ७२
                                 ४०           ८०

     🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎇🎇

                📝 प्रश्नावली १९६ 📝

प्रश्न १. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ?
उत्तर – नागपूर

प्रश्न २. संविधानातील कलम 370 हे कोणत्या राज्याशी निगडीत होते ?
उत्तर :- जम्मू आणि काश्मीर.

प्रश्न ३.  महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?
उत्तर :- नागपूर

प्रश्न ४.  दौलताबाद  किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय ?
उत्तर :- देवगिरी

प्रश्न ५. संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी कोणती ?
उत्तर :- देहू

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

👉 आपल्या माहितीसाठी.

▶️ वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेलची घोषणा 2024
1)  व्हिक्टर अ‍ॅम्ब्रोस
2) गॅरी रुवकून यांना

⭕️ ‘मायक्रो आएनए’ आणि त्याचे कार्य यावरील शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे.

⭕️ शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असं नोबेल कमिटीने म्हटलं आहे.

⭕️ नोबेल पारितोषिकाची सुरुवात : 1901

⭕️ हे पुरस्कार स्टॉकहोम, स्वीडन येथे दिले जात आहेत. दरवर्षी 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच अंदाजे 8.90 कोटी रुपयांचे नोबेल पारितोषिक देण्यात येतात.

Share This Article