📖 वाचाल तर वाचाल 📖
📘परिपाठ📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ९ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- बुधवार
📙📘सुविचार :- ”शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते”.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍 आजचा जागतिक दिन
🎗️जागतिक टपाल दिन
✒️✒️आजचा दिनविशेष – घटना
➡️1410 : प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला.
➡️1446 : हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.
➡️1604 : केपलरचा सुपरनोव्हा हा आकाशगंगेमध्ये पाहण्यात आलेला सर्वात अलीकडील सुपरनोव्हा आहे.
➡️1806 : पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.
➡️1960 : विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
➡️1962 : युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले.
➡️1981 : फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.
➡️2006 : उत्तर कोरियाने पहिली आण्विक चाचणी घेतली.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
▶️1877 : ‘गोपबंधु दास’ – भारतीय लेखक यांचा जन्म.
1889 : ‘कॉलेट ई. वूल्मन’ – डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 11 सप्टेंबर 1966)
▶️1891 : ‘शंकरराव वासुदेव किर्लोस्कर’ – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 1 जानेवारी 1975)
▶️1922 : ‘गोपालसमुद्रम नारायण रामचंद्रन’ – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 7 एप्रिल 2001)
▶️1924 : ‘थिरूनलूर करुणाकरन’ – भारतीय कवि आणि स्कॉलर यांचा जन्म. (मृत्यू : 5 जुलै 2006)
✒️✒️आजचा दिनविशेष – मृत्यू
👉1892 : ‘रावबहादूर गोपाळ हरी देशमुख’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 1823)
👉1914 : ‘विनायक कोंडदेव ओक’ – बालवाङ्मयकार यांचे निधन. (जन्म : 25 फेब्रुवारी 1840)
👉1955 : ‘गोविंदराव टेंबे’ – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक यांचे निधन. (जन्म : 5 जून 1881)
👉1987 : ‘गुरू गोपीनाथ’ – कथकली नर्तक यांचे निधन. (जन्म : 24 जून 1908)
👉1998 : ‘जयवंत पाठारे’ – छायालेखक यांचे निधन.
👉1999 : ‘अनंत दामले’ – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी यांचे निधन.
▶️2000 : ‘पॅट्रिक अँथनी पोर्टिअस’ – व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त इंडियन-स्कॉटिश कर्नल यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1918)
👉2006 : ‘कांशी राम’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 15 मार्च 1934)
👉2015 : ‘रवींद्र जैन’ – भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1944)
✒️✒️ जागतिक दिन लेख :
जागतिक टपाल दिन
जागतिक टपाल दिन दरवर्षी 9 ऑक्टोबरला साजरा केला जातो. 1874 मध्ये यूनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) स्थापन करण्यात आले, ज्यामुळे जागतिक टपाल प्रणालीची सुरुवात झाली.
टपाल सेवा ही लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि व्यवसायिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ई-मेल आणि डिजीटल संवादाच्या युगात देखील टपाल सेवा विश्वासार्ह आणि किफायतशीर राहिली आहे. टपाल सेवांमुळे ग्रामीण भागांमध्ये देखील माहिती आणि वस्तू पोहोचवणे सोपे झाले आहे.
जागतिक टपाल दिनानिमित्त विविध देशांमध्ये टपाल कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रम, चर्चासत्रे आणि प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. यामुळे टपाल कर्मचाऱ्यांचे योगदान आणि सेवा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. जगभरातील टपाल नेटवर्क लोकांना एकत्र ठेवण्याचे कार्य सतत करत असते.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 संधान बांधने : जवळीक निर्माण करणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 सूर्योदयापूर्वीची वेळ – उषःकाल
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
तुम ही हो माता
तुम ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो॥धृ॥
तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे
कोई न अपना, सिवा तुम्हारे
तुम्ही हो नैया, तुम्ही खिवय्या॥१॥
जो खिल सके ना, वो फूल हम है
तुम्हारे चरणों की धूल हम है।
दया की दृष्टी सदा ही रखना॥२॥
📘 दिनांकानुसार पाढा :- ९ चा पाढा
९ ५४
१८ ६३
२७ ७२
३६ ८१
४५ ९०
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
📝 प्रश्नावली १९७ 📝
प्रश्न १.कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली ?
उत्तर – लोणार सरोवर
प्रश्न २. मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान सीमा आहे ?
उत्तर :- भारत – चीन
प्रश्न ३. सरदार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर :- नर्मदा
प्रश्न ४. महाराष्ट्र राज्याचा रज्यपक्षी कोणता ?
उत्तर :- हरियाल
प्रश्न ५. सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता ?
उत्तर :- लक्षद्वीप.
🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆
👉 आपल्या माहितीसाठी.
🌏 नद्या व त्यांचे उगमस्थान 👇
गंगा → गंगोत्री (उत्तराखंड)
यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)
सिंधू → मानसरोवर (तिबेट)
नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)
तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)
महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)
ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)
सतलज → कैलास पर्वत(तिबेट)
बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)
गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक
कृष्णा → महाबळेश्वर.
कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)
साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)
रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)
पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).