“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी.” प्रश्नावली 198

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
6 Min Read

         📖 वाचाल तर वाचाल 📖

     📘आजचा परिपाठ📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- १० ऑक्टोबर २०२४

🔊🔊 आजचा वार:- गुरुवार

📙📘सुविचार :-  संकटातूनच संधीचा जन्म होतो. आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे, जी आपल्याला अधिक मजबूत बनवते.

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन

🎗️ जागतिक मानसिक आरोग्य दिन

✒️✒️आजचा दिनविशेष – घटना

▶️1846 : इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम लासेल यांनी नेपच्यूनचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन शोधला.
▶️1913 : पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.
▶️1942 : सोव्हिएत युनियनने ऑस्ट्रेलियाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.
▶️1944 : दुसरे महायुद्ध – 800 जिप्सी बालकांना छळ छावणीत मारली गेली.
▶️1954 : श्याम ची आई या चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले.
▶️1960 : विद्याधर गोखले यांच्या ‘सुवर्णतुला’ नाटकाचा प्रीमियर झाला.
▶️1964 : टोकियो, जपान येथे 18 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
▶️1967 : बाह्य अवकाश करार अंमलात आला.
▶️1998 : आदर्श सेन आनंद भारताचे 29 वे सरन्यायाधीश बनले

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

➡️1731 : ‘हेन्री कॅव्हेंडिश’ – हायड्रोजन आणि अरागॉन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 24 फेब्रुवारी 1810)
➡️1830 : ‘इसाबेला (दुसरी)’ – स्पेनची राणी यांचा जन्म.
1844 : ‘बद्रुद्दिन तैय्यबजी’ – रा. काँग्रेसचे 3रे अध्यक्ष यांचा जन्म.
➡️1871 : ‘शंकर श्रीकृष्ण देव’ – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक यांचा जन्म. (मृत्यू : 23 एप्रिल 1958)
1877 : ‘विल्यम मॉरिस’ – मॉरिस मोटर्सचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑगस्ट 1963)
➡️1899 : ‘श्रीपाद अमृत डांगे’ – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते यांचा जन्म. (मृत्यू : 22 मे 1991)
➡️1902 : ‘शिवराम कारंथ’ – कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 9 डिसेंबर 1997)
➡️1906 : ‘रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी’ – इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 मे 2001)
➡️1909 : ‘नोशीरवान दोराबजी नगरवाला’ – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी यांचा जन्म. (मृत्यू : 11 सप्टेंबर 1998)
➡️1910 : ‘डॉ. द्वारकानाथ कोटणीस’ – हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक यांचा जन्म.
➡️1912 : ‘राम विलास शर्मा’ – भारतीय कवी आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 30 मे 2000)
➡️1916 : ‘डॉ. लीला मूळगावकर’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचा जन्म.
➡️1954 : ‘रेखा’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म


✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

👉1898 : ‘मणिलाल नथुभाई त्रिवेदी’ – अष्टपैलू लेखक यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1858)
👉1964 : ‘गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म : 9 जुलै 1925)
👉2000 : ‘सिरिमाओ बंदरनायके’ – श्रीलंकेच्या 6व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान यांचे निधन. त्यांनीच सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले. (जन्म : 17 एप्रिल 1916)
👉2006 : ‘सरस्वतीबाई राणे’ – शास्त्रीय गायिका यांचे निधन. (जन्म : 4 ऑक्टोबर 1913)
👉2008 : ‘रोहिणी भाटे’ – कथ्थक नर्तिका यांचे निधन. (जन्म : 14 नोव्हेंबर 1924)
👉2011 : ‘जगजित सिंग’ – गझल गायक यांचे निधन. (जन्म : 8 फेब्रुवारी 1941)

🌍🌍  जागतिक दिन लेख

          जागतिक मानसिक आरोग्य दिन
जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उघडपणे चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे, परंतु अजूनही समाजात मानसिक आरोग्याच्या समस्या दुर्लक्षित केल्या जातात.
समाजाने मानसिक आरोग्याबाबत असलेले गैरसमज दूर करून, एकमेकांना आधार देणे आणि मदत करण्याचे महत्त्व लक्षात ठेवावे. मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना मदत मिळाली पाहिजे, हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.


⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते.

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉   प्राणावर उदार होणे – जिवाची पर्वा न करणे .

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                     🙏 प्रार्थना 🙏

        हीच अमुची प्रार्थना

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
                                                                                                                                        
📘 दिनांकानुसार पाढा :- १० चा पाढा

                                 १०           ६०
                                 २०           ७०
                                 ३०           ८०
                                 ४०           ९०
                                 ५०          १००

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

    

             📋 प्रश्नावली 198 📋

प्रश्न १. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
उत्तर – चित्रपट

प्रश्न २. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
उत्तर :- ज्ञानपीठ

प्रश्न ३. भारताचे राष्ट्रगीत गायन करण्यास किती वेळ लागतो ?
उत्तर :- 52 सेकंद

प्रश्न ४.  हिंदी दिवस कधी साजरा केला जातो ?
उत्तर :- 14 सप्टेंबर

प्रश्न ५.  हळदीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
उत्तर :- सांगली

🎆🎇🎆🎆🎇🎆🎇🎆🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎆🎇🎆

👉 आपल्या माहितीसाठी.

📌 नोबेल भौतिकशास्त्र पारितोषिक 2024: रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने 2024 चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

▪️जॉन जे. हॉपफिल्ड
▪️जेफ्री ई. हिंटन
यांना कृत्रिम न्यूरल नेटवर्कद्वारे मशीन शिक्षणासाठी त्यांच्या मूलभूत योगदानाबद्दल प्रदान केले.

📌प्रथिने डिझाइनमधील प्रगतीसाठी 2024 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक

▪️डेव्हिड बेकर, डेमिस हॅसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांनी 2024 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक सामायिक केले.

Share This Article