📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ११ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- शुक्रवार
📙📘सुविचार :- समस्या तुम्हाला कमकुवत नाही तर मजबूत बनवायला येतात.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍 आजचा जागतिक दिन
🎗️आंतरराष्ट्रीय बालिका दिन
✒️✒️ 11 ऑक्टोबर दिनविशेष – घटना
▶️1811 : ज्युलियाना फेरी जहाज – न्यूयॉर्क बंदरातील पहिली वाफेवर चालणारी फेरी सुरू झाली.
▶️1852 : ऑस्ट्रेलियात सिडनी विद्यापीठाची स्थापना.
▶️1958 : नासाने पायोनियर-1 लाँच केले, त्याचे पहिले अंतराळ संशोधन, ते स्थिर कक्षेत पोहोचण्यात अयशस्वी झाले.
▶️1968 : नासाने अपोलो 7 लाँच केले, ही पहिली यशस्वी क्रूड अपोलो मोहीम
▶️1984 : कॅथरीन डी. सुलिव्हन – स्पेस वॉक करणारी पहिली महिला अमेरिकन अंतराळवीर ठरली.
▶️1987 : श्रीलंकेत भारतीय शांतता रक्षक दलाने ऑपरेशन पवन सुरू केले.
▶️2000 : NASA ने STS-92 लाँच केले, 100 वे स्पेस शटल मिशन होते.
▶️2001 : व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर.
▶️2001 : पोलरॉईड कार्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली.
✒️✒️ 11 ऑक्टोबर दिनविशेष – जन्म
👉1876 : ‘चारुचंद्र बंदोपाध्याय’ – बंगाली कथालेखक व कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 17 डिसेंबर 1938)
👉1902 : ‘लोकनायक जयप्रकाश नारायण’ – स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑक्टोबर 1979)
👉1916 : ‘चंडीकादास अमृतराव देशमुख’ – पद्मविभूषण समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 26 फेब्रुवारी 2010)
👉1916 : ‘मीनाक्षी शिरोडकर’ – चित्रपट व नाट्य अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 3 जून 1997)
👉1923 : ‘डॉ.हरिश्चंद्र मेहरोत्रा’ – भारतीय अमेरिकन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
👉1930 : ‘बेहराम कॉन्ट्रॅक्टर’ – पत्रकार व स्तंभलेखक यांचा जन्म. (मृत्यू : 9 एप्रिल 2001)
👉1932 : ‘सुरेश दलाल’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 10 ऑगस्ट 2012)
👉1942 : ‘अमिताभ बच्चन’ – चित्रपट अभिनेते व निर्माते यांचा जन्म.
👉1943 : ‘कीथ बॉईस’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 11 ऑक्टोबर 1996)
👉1946 : ‘विजय भटकर’ – परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक यांचा जन्म.
👉1951 : ‘मुकूल आनंद’ – हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचा जन्म.
👉1967 : ‘अल्ताफ राजा’ – भारतीय कव्वाली गायक यांचा जन्म.
👉1993 : ‘हार्दिक पंड्या’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
✒️✒️ 11 ऑक्टोबर दिनविशेष – मृत्यू
➡️1968 : ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ – ऊर्फ यांचे निधन. (जन्म : 30 एप्रिल 1909)
🎉1984 : ‘खंडेराव मोरेश्वर रांगणेकर’ – आक्रमक डावखुरे फलंदाज यांचे निधन. (जन्म : 27 जून 1917)
➡️1994 : ‘काकासाहेब दांडेकर’ – कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक यांचे निधन.
➡️1996 : ‘कीथ बॉईस’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 11 ऑक्टोबर 1943)
➡️1997 : ‘विपुल कांति साहा’ – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार यांचे निधन.
➡️➡️1999 : ‘रमाकांत कवठेकर’ – मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक यांचे निधन.
➡️2000 : ‘डोनाल्ड डेवार’ – स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री यांचे निधन. (जन्म : 21 ऑगस्ट 1937)
➡️2002 : ‘दीना पाठक’ – अभिनेत्री यांचे निधन.
➡️2007 : ‘चिन्मोय कुमार घोस’ – भारतीय अध्यात्मिक गुरु यांचे निधन. (जन्म : 27 ऑगस्ट 1931)
➡️2022 : ‘ए. गोपालकृष्णन’ – भारतीय अणु अभियंते
🌍🌍 जागतिक दिन लेख
आंतरराष्ट्रीय बालिका दिन
आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 11 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस मुलींच्या हक्कांसाठी आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, आणि सामाजिक समानता यांसारख्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या दिवसामागे आहे. विशेषतः विकसनशील देशांमध्ये मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे, बालविवाह, आणि लैंगिक भेदभावासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने मुलींच्या शिक्षणावर जोर देऊन त्यांना संधी देण्याची गरज अधोरेखित होते. या दिवसाच्या माध्यमातून जगभरात मुलींच्या विकासासाठी धोरणात्मक उपक्रम राबवले जातात. मुलींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी विविध सामाजिक संस्था, शाळा, आणि सरकारांकडून प्रयत्न केले जातात. समाजातील प्रत्येक मुलगी आपली स्वप्ने साकार करू शकेल, अशी समानता निर्माण करण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. मुलींच्या प्रगतीतच समाजाची प्रगती आहे, ही शिकवण या दिवसाद्वारे दिली जाते.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 अति परिचयात अवज्ञा – जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 अटकेपार झेंडा लावणे – फार मोठा पराक्रम गाजवणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 सहसा न घडणारे – क्वचित
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
सत्यं शिवं सुंदरा
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यं शिवं सुंदरा ।।धृ।।
शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ॥१॥
विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतिरी दयासागरा।।२।।
होऊ आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धीमंत
कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा।।३।।
📘 दिनांकानुसार पाढा :- ११ चा पाढा
११ ६६
२२ ७७
३३ ८८
४४ ९९
५५ ११०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
📝 प्रश्नावली १९९ 📝
प्रश्न १. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ?
उत्तर – 746 वॅट
प्रश्न २. — किरण म्हणजे हेलियमचे केंद्रक होय?
उत्तर :- अल्फा किरण
प्रश्न ३. हृदयात पासून शरीराकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीला काय म्हणतात ?
उत्तर :- धमनी
प्रश्न ४. कोणत्या नदीला कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणतात ?
उत्तर :- पंचगंगा
प्रश्न ५. कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम कोठे होतो ?
उत्तर :- कराड
🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇
👉 आपल्या माहितीसाठी.
🌏 माझा महाराष्ट्र👇
👉 महाराष्ट्र राज्याची राज्यमाता – देशी गाय
👉 महाराष्ट्र राज्याचे राज्यशास्त्र – दांडपट्टा
👉 महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा – पापलेट
👉 महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी – शेकरू
👉 महाराष्ट्राचे राज्य फुल – ताम्हण
👉 महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू – ब्लू मॉर्मन.
👉 महाराष्ट्र राज्याचे राज्य प्राणी – शेकरू
👉 महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत – जय जय महाराष्ट्र माझा.