” ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली २०२.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
8 Min Read

          📖 वाचाल तर वाचाल 📖

    📘आजचा दिनविशेष📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- १६ ऑक्टोबर २०२४

🔊🔊 आजचा वार:- बुधवार

📙📘सुविचार :-  आत्मविश्वास हि यशाची पहिली पायरी आहे.

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन


जागतिक अन्न दिन

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

1905 : भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीचा आदेश दिला.
1951 : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.
1978 : वांडा रुटकिएविझ माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली युरोपियन महिला ठरली.
1986 : रेनॉल्ड मेसनर 8000 मीटरपेक्षा उंच 14 शिखरे सर करणारी पहिली व्यक्ती ठरली.
1995 : स्कॉटलंडमधील स्काय ब्रिज उघडला.
1999 : जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

1670 : ‘बंदा सिंग बहादूर’ – शिख सेनापती यांचा जन्म. (मृत्यू : 9 जून 1716)
1890 : ‘अनंत हरी गद्रे’ – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक यांचा जन्म. (मृत्यू : 3 सप्टेंबर 1967)
1896 : ‘सेठ गोविंद दास’ – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 18 जून 1974)
1907 : ‘सोपानदेव चौधरी’ – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1982)
1948 : ‘हेमा मालिनी’ – अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक यांचा जन्म.
1949 : ‘क्रेझी मोहन’ – भारतीय अभिनेते, पटकथालेखक आणि नाटककार यांचा जन्म.
1959 : ‘अजय सरपोतदार’ – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 3 जून 2010)
1982 : ‘पृथ्वीराज सुकुमारन’ – भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माता यांचा जन्म.

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1799 : ‘वीरपदिया कट्टाबोम्मन’ – भारतीय स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 3 जानेवारी 1760)
1905 : ‘पंत महाराज बाळेकुन्द्री’ – आध्यात्मिक गुरू यांचे निधन. (जन्म : 3 सप्टेंबर 1855)
1944 : ‘गुरुनाथ प्रभाकर ओगले’ – उद्योजक, प्रभाकर कंदिलचे निर्माते यांचे निधन.
1948 : ‘माधव नारायण जोशी’ – नाटककार यांचे निधन.
1950 : ‘दादासाहेब केतकर’ – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन.
1951 : ‘लियाकत अली खान’ – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या. (जन्म : 1 ऑक्टोबर 1895)
1997 : ‘दत्ता गोर्ले’ – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक यांचे निधन.
2002 : ‘नागनाथ संतराम इनामदार’ – लेखक यांचे निधन. (जन्म : 23 नोव्हेंबर 1923)
2013 : ‘गोविंद पुरुषोत्तम देशपांडे’ – भारतीय नाटककार यांचे निधन.

जागतिक दिन लेख

                    जागतिक अन्न दिन
          जागतिक अन्न दिन दरवर्षी 16 ऑक्टोबरला साजरा केला जातो, जो अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) स्थापनेच्या स्मरणार्थ आहे. 1945 साली FAO ची स्थापना करण्यात आली, आणि तेव्हापासून जागतिक अन्न दिनाचा उद्देश जगभरातील भुकेची समस्या कमी करणे, अन्नसुरक्षेची जनजागृती करणे, आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे. या दिवसाचे मुख्य ध्येय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला पोषक आणि पुरेसे अन्न उपलब्ध व्हावे, याची खात्री करणे.
                 जागतिक अन्न दिनाचे प्रत्येक वर्षी एक विशिष्ट थीम असते, जसे की “शून्य भूक”, “शाश्वत शेती”, इत्यादी, ज्याद्वारे विविध समस्या आणि त्यावरील उपायांवर चर्चा केली जाते. या दिवशी विविध कार्यक्रम, जनजागृती मोहीम आणि चर्चा आयोजित केल्या जातात, ज्यात अन्न सुरक्षेची समस्या, कुपोषण, आणि अन्न उत्पादनातील असमानता यावर लक्ष केंद्रित केले जाते. जागतिक अन्न दिन हा एक महत्त्वाचा दिवस आहे, जो अन्न उत्पादन आणि वितरणाच्या क्षेत्रातील सुधारणांकडे लक्ष वेधतो.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 अंगापेक्षा बोंगा मोठा – मूळ गोष्टींपेक्षा तिच्या आनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे .

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉   हात टेकणे – नाइलाज झाल्याने माघार घेणे.

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 तीन रस्ते एकत्र येतात ती जागा – तिठा.

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                     🙏 प्रार्थना 🙏

                  दयाकर दान प्रार्थना

दयाकर दान भक्ती का, हमे परमात्मा देना
दया करना, हमारी आत्मा मे, शुद्धता देना।

हमारे ध्यान मे आओ, प्रभू आँखों मे बस जाओ
अंधेरे दिल मे आकर के परमज्योजी जगा देना।।

बहा दो प्रेम की गंगा दिलों में प्रेम का सागर
हमे आपस मे मिल जुल कर प्रभू रहना सिखा देना।

हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म ही सेवा
सदा ईमान हो सेवा व सेवक चर बना देना।

वतन के वास्ते जीना, वतन के वास्ते मरना
वतन पर जान फिदा करना, प्रभू हम को सिखा देना ।।          
                
📘 दिनांकानुसार पाढा :- १६ चा पाढा

                                 १६            ९६
                                 ३२           ११२
                                 ४८           १२८
                                 ६४           १४४
                                 ८०           १६०

     ⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

              📝 प्रश्नावली २०२ 📝

प्रश्न १. ‘ तिहार जेल ‘ कोणत्या शहरात आहे ?
उत्तर – दिल्ली
———————————–
प्रश्न २.महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या शहरात भरतो ?
उत्तर – नाशिक
———————————–
प्रश्न ३. महाराष्ट्रातील आकाराने सर्वांत लहान जिल्हा कोणता ?
उत्तर – मुंबई
———————————–
प्रश्न ४.’ मसुरी ‘ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर – उत्तराखंड
———————————–
प्रश्न ५.  आंतरराष्ट्रीय योगदिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?
उत्तर – २१ जून

🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇

👉 आपल्या माहितीसाठी.

◾️15 ऑक्टोबर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो
राज्यात 15 ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’ माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस
◾️महाराष्ट्र संबंधित महत्वाचे दिवस ◾️
⭐️महाराष्ट्र दिन – 1 मे (1960)
⭐️महाराष्ट्र पंचायतराज स्थापना – 1 मे (1962)
⭐️हुतात्मा स्मृती दिवस – 21 नोव्हेंबर
⭐️बालिका दिवस –  3 जानेवारी (सावित्रीबाई फुले जयंती)
⭐️पत्रकार दिन – 6 जानेवारी (बाळशास्त्री जांभेकर जयंती)
⭐️राज्य क्रीडा दिन – 15 जानेवारी (खाशाबा जाधव जन्मदिवस)
⭐️सिंचन दिवस – 26 फेब्रुवारी ( शंकराव चव्हाण स्मृती)
⭐️महाराष्ट्र राजभाषा दिन – 27 फेब्रुवारी (कुसुमाग्रज जयंती)
⭐️उद्योग दिन महाराष्ट्र – 10 मार्च (लक्ष्मण किर्लोस्कर स्मृतीदिन)
⭐️समता दिवस – 12 मार्च (यशवंतराव चव्हाण जन्मदिन)
⭐️शिक्षक हक्क दिवस -11 एप्रिल (जोतिबा फुले जयंती)
⭐️ज्ञान दिवस -14 एप्रिल (डॉ बाबासाहेब जन्मदिवस)
⭐️महाराष्ट्र दिन : 1 मे
⭐️शिवस्वराज्य दिन – 6 जून
⭐️सामाजिक न्याय दिन – 26 जून (शाहू महाराज जयंती)
⭐️कृषि दिन – 1 जुलै (वसंतराव नाईक जयंती)
⭐️शेतकरी दिन – 29 ऑगस्ट 
⭐️रेशीम दिवस – 1 सप्टेंबर
⭐️श्रमप्रतिष्ठा दिन – 22 सप्टेंबर (कर्मवीर भाऊराव जयंती)
⭐️राज्य माहिती अधिकार दिन – 28 सप्टेंबर
⭐️ ज्येष्ठ नागरिक दिवस – 1 ऑक्टोबर
⭐️रंगभूमी दिवस – 5  नोव्हेंबर (विष्णुदास भावे जयंती)
⭐️विद्यार्थी दिन – 7 नोव्हेंबर (डॉ बाबासाहेबांच्या स्मरणार्थ)
⭐️जैवतंत्रज्ञान दिवस  – 14 नोव्हेंबर
⭐️हुंडाबंदी दिवस – 26 नोव्हेंबर


Share This Article