📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- १८ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- शुक्रवार
📙📘सुविचार :- ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण
📙📘📙 दिनविशेष
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
1906 : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.
1919 : राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकर यांच्या बळवंत संगीत नाटक मंडळीने केला.
1922 : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना.
1954 : टेक्सास इन्स्ट्रुमेंट्सने रीजेंसी TR-1 ची घोषणा केली, जो पहिला मोठ्या प्रमाणात उत्पादित ट्रान्झिस्टर रेडिओ आहे.
1963 : फेलिसेट, अंतराळात सोडलेली पहिली मांजर बनली.
1967 : सोव्हिएत रशियाचे व्हीनूसा-4 अंतराळयान शुक्रावर उतरले.
2002 : सचिन तेंडुलकर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 20,000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.
2019 : NASA अंतराळवीर जेसिका मीर आणि क्रिस्टीना कोच पॉवर कंट्रोलर बदलण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर पडल्यावर पहिल्या महिला स्पेसवॉकमध्ये भाग घेतात.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
1861 : ‘चिंतामणराव वैद्य’ – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1938)
1925 : ‘इब्राहिम अल्काझी’ – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक यांचा जन्म.
1950 : ‘ओम पुरी’ – अभिनेता यांचा जन्म.
1956 : ‘मार्टिना नवरातिलोव्हा’ – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
1974 : ‘अमिश त्रिपाठी’ – भारतीय लेखक यांचा जन्म.
1977 : ‘कुणाल कपूर’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
1977 : ‘स्वप्नील जोशी’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
1984 : ‘फ्रीडा पिंटो’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1871 : ‘चार्ल्स बॅबेज’ – पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक यांचे निधन. (जन्म : 26 डिसेंबर 1791)
1909 : ‘लालमोहन घोष’ – देशभक्त, काँग्रेसचे 16 वे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1849 – कलकत्ता)
1931 : ‘थॉमस अल्वा एडिसन’ – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक यांचे निधन. (जन्म : 11 फेब्रुवारी 1847)
1951 : ‘हिराबाई पेडणेकर’ – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार यांचे निधन. (जन्म : 22 नोव्हेंबर 1885)
1976 : ‘विश्वनाथ सत्यनारायण’ – भारतीय कवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 10 सप्टेंबर 1895)
1983 : ‘विजय मांजरेकर’ – क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1931)
1987 : ‘वसंतराव तुळपुळे’ – कम्युनिस्ट कार्यकर्ते यांचे निधन.
1993 : ‘मंदाकिनी विश्वनाथ आठवले’ – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री यांचे निधन.
1995 : ‘ई. महमद’ – छायालेखक यांचे निधन.
2004 : ‘वीरप्पन’ – चंदन तस्कर याचे निधन. (जन्म : 18 जानेवारी 1952)
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 स्वर्ग दोन बोटे उरणे : आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
दिवा पाहुनि लक्ष्मी येते
दिवा पाहुनि लक्ष्मी येते
करु तिची प्रार्थना, करु तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा ॥
शुंभकरोति कल्याणम्, शुभंकरोति कल्याणम् ॥१॥
जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशा दिशांतुनि या लक्ष्मीच्या
दिसती पाऊलखुणा
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, ॥੨॥
या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता
सौख्य मिळे जीवना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, …. ॥३॥
🔊 बोधकथा 🔊
कष्टाचे फळ
☞ ̄ᴥ ̄☞☞ ̄ᴥ ̄☞
एका गावामध्ये एक खूप श्रीमंत शेतकरी होता. त्यांचाकडे खूप पैसा होता पण,त्याची पाच मुले ही खूप आळशी होती .कोणतेच परिश्रम करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. या गोष्टीचा त्या श्रीमंत शेतकऱ्यांला मोठा विचार पडायचा की माझ्या म्रुत्यू नंतर ही माझी मुले काहीच करणार नाही सर्व सम्पत्ति फुकट जाईल,म्हणून त्या शेतकऱ्यांनी सर्व मुलांना बोलावले व सांगितले कि मी गावाला जात आहे तेंव्हा तुम्ही सर्व शेतं खोदून शेतात आपल्या पूर्वजांनी सोने ठेवले आहे .ते सर्व सोने तुम्ही काढून सर्व वाटून घ्या मी वापस ये पर्यंत हे कार्य पूर्ण करा .शेतकरी गावाला गेल्यानंतर सर्व मुलांनी पूर्ण शेतं खोदले त्यांना कुठे सोने दिसले नाही पण ,शेतं पूर्ण खोदले व पाऊस सूध्हा भरपूर पडला तेंव्हा सर्वानी शेतांमध्ये धान पेरले व चांगले उत्पन्न सुध्हा निघाले .त्यांनी ते धान मार्केट ला विकून खूप धन जमवले शेतकरी वापस आला तेंव्हा सर्व हकीगत त्या मुलांनी सांगितली तेंव्हा शेतकरी खूप खुश झाला व म्हणाला हेच खरे धन
❝ तात्पर्य ❞ :- खूप मेहनतीने व कष्टाने कोणतेही कार्य केले तर यश नक्कीच मिळते .
📘 दिनांकानुसार पाढा :- १८ चा पाढा
१८ १०८
३६ १२६
५४ १४४
७२ १६२
९० १८०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝 प्रश्नावली २०४ 📝
प्रश्न १. वनस्पती अन्न कोणाच्या साहाय्याने करतात ?
उत्तर – हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाश
—————————————–
प्रश्न २. वनस्पतींमध्ये अण्णा तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
उत्तर – प्रकाश संश्लेषण
—————————————–
प्रश्न ३. आकाशामध्ये वीज चमकते तेंव्हा नायट्रोजन आणि ऑक्सीजन यांचा संयोग होऊन काय तयार होते ?
उत्तर – नायट्रिक ऑक्साइड
—————————————–
प्रश्न ४. ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून वाचण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो ?
उत्तर – तडीतवाहक
—————————————–
प्रश्न ५. महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तयार होणाऱ्या लाटांना काय म्हणतात ?
उत्तर – त्सुनामी
—————————————–
🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇
👉आपल्या माहितीसाठी.
📌 पंतप्रधान पद आणि संविधान तरतुदी
◾️कलम 75 : पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या द्वारे केली जाईल
◾️कलम 74(1) : राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल
◾️अनुसूचित तिसरी : शपथ कशी असवी हे अनुसूचित 3 मध्ये सांगितले आहे
◾️मंत्र्यांची संख्या 15% पेक्षा जास्त असणार नाही म्हणजे 543 चे 15% = 81 पर्यंत मंत्र्यांची संख्या असते
📌पंतप्रधान आणि त्यांची वर्षे.
◾️सर्वात जास्त काळ राहिलेले पंतप्रधान : जवाहरलाल नेहरू (16 वर्षे 286 दिवस )
◾️पाहिले काळजीवाहू पंतप्रधान : गुलझारीलाल नंदा
◾️पहिल्या महिला पंतप्रधान : इंधिरा गांधी
◾️सर्वात जास्त वय आसलेले पंतप्रधान : मोरारजी देसाई
◾️राजीनामा देणारे पाहिले पंतप्रधान : मोरारजी देसाई
◾️सर्वात कमी वय असलेले पंतप्रधान : राजीव गांधी
◾️कधीही संसदेला सामोरे न गेलेले पंतप्रधान : चौधरी चरणसिंग ( पाठिंबा काढला इंदिरा नेहरूंनी)
◾️सर्वात कमी काळ राहिलेले पंतप्रधान : अटलबिहारी वाजपेयी
◾️तिसऱ्यांदा शपथ घेणारे गैर काँग्रेसचे नेते : नरेंद्र मोदी