“ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.” प्रश्नावली 206

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
9 Min Read

             📖 वाचाल तर वाचाल 📖

       📘आजचा परिपाठ📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- २१ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- सोमवार

📙📘सुविचार :- शिक्षक ज्ञानाचा दीप असतो तो अज्ञानाच्या अंधारात उजेड देतो

📙📘📙 दिनविशेष
🌍🌍 आजचा जागतिक दिन

🎗️ पोलीस स्मृतिदिन

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

1879 : थॉमस एडिसनने लाइट बल्बच्या डिझाइनसाठी पेटंटसाठी अर्ज केला.
1888 : स्विस सोशल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना झाली.
1934 : जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
1943 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात आझाद हिंद सेनेचे प्रामुख्याने भारताचे पहिले स्वतंत्र सरकार स्थापन केले.
1951 : डॉडॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी दिल्लीत भारतीय जनसंघाची स्थापना केली.
1983 : मीटरची व्याख्या एका सेकंदाच्या 1/299,792,458 मध्ये व्हॅक्यूममध्ये प्रकाशाच्या अंतराने केली जाते.
1989 : जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेव सिंग आणि हरविंदर सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
1992 : अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री ‘अपर्णा सेन’ यांना ‘महापृथ्वी’ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
1999 : चित्रपट निर्माते ‘बी. आर. चोप्रा’ यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर.

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

1833 : ‘अल्फ्रेड नोबेल’ – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते यांचा जन्म. (मृत्यू : 10 डिसेंबर 1896)
1887 : ‘कृष्णा सिंह’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 31 जानेवारी 1961)
1917 : ‘राम फाटक’ – गायक व संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 26 सप्टेंबर 2002)
1920 : ‘गं. ना. कोपरकर’ – धर्मभास्कर यांचा जन्म.
1931 : ‘शम्मी कपूर’ – हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 14 ऑगस्ट 2011)
1937 : ‘फारुख अब्दुल्ला’ – काश्मिरी राजकारणी यांचा जन्म.
1949 : ‘बेंजामिन नेत्यान्याहू’ – इस्त्रायलचे 9 वे पंतप्रधान यांचा जन्म.


✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1835 : ‘मुथुस्वामी दीक्षीतार’ – तामिळ कवी व संगीतकार यांचे निधन. (जन्म : 24 मार्च 1775)
1981 : ‘दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे’ – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी यांचे निधन. (जन्म : 31 जानेवारी 1896 – धारवाड, कर्नाटक)
1990 : ‘प्रभात रंजन सरकार’ – भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 21 मे 1921)
1995 : ‘लिंडा गुडमन’ – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका यांचे निधन. (जन्म : 9 एप्रिल 1925)
2010 : ‘अ. अय्यप्पन’ – भारतीय कवी आणि अनुवादक यांचे निधन. (जन्म : 27 ऑक्टोबर 1949)
2012 : ‘यश चोप्रा’ – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यांचे निधन. (जन्म : 27 सप्टेंबर 1932)

✒️✒️ जागतिक दिन लेख

                     पोलीस स्मृतिदिन
पोलीस स्मृतिदिन (Police Commemoration Day) दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस देशाची सुरक्षा आणि नागरिकांचे रक्षण करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित आहे. 1959 साली लडाखच्या हिंद-चीन सीमेवर चीनी सैनिकांनी भारतीय पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात 10 पोलीस शहीद झाले होते. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
या दिवशी देशभरात पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शहीद पोलीस जवानांना आदरांजली वाहून त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानित केले जाते. पोलीस दल देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असतात, आणि त्यांचे योगदान समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

पोलीस स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या त्यागाची आणि देशासाठी दिलेल्या सेवेची आठवण करून दिली जाते. हा दिवस पोलीस दलातील अधिकारी आणि जवानांच्या कर्तव्यदक्षतेचा सन्मान करण्याचा दिवस आहे, ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती देऊन देशवासीयांचे रक्षण केले.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 गाढवाला गुळाची चव काय ? – ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  संभ्रमात पडणे : गोंधळात पडणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 दोन डोंगरामधील चिंचोली वाट – खिंड

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                     🙏 प्रार्थना 🙏

                 ए मलिक तेरे बंदे हम

ऐ मालिक तेरे बन्दे हम…. ऐसे हों हमारे करम….. नेकी पर चले और बदी से ले,…… ताकी हँसते हुए निकले दम……. ऐ मालिक तेरे बंदे हम…….

ये अंधेरा घना छा रहा, तेरा इंसान घबरा रहा। हो रहा बेख़बर, कुछ ना आता नज़र, सुख का सूरज छिपा जा रहा। है तेरी रोशनी में जो दम, वो अमावस को कर दे पूनम। नेकी पर चले और वती से टले, ताकी हँसते हुए निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम……….

बड़ा कमज़ोर है आदमी, अभी लाखों हैं इस में कमी। पर तू जो खड़ा, है दयालु बड़ा, तेरी कृपा से धरती थमी। दिया तूने हमें जब जनम, तू ही ले लेगा हम सब के ग़म। नेकी पर चले और वती से टले, ताकी हँसते हुए निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम……..

जब जुल्मों का हो सामना, तब तू ही हमें थामना। वो बुराई करें, हम भलाई करे, न ही बदले की हो भावना। बढ़ उठे प्यार का हर कदम, और मिठे बैर का ये भरम।

नेकी पर चले और बदी से टले, ताकी हँसते हुये निकले दम। ऐ मालिक तेरे बंदे हम…. ..

                     🔊   बोधकथा 🔊

                        श्रीमंत व्यापारी
एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता.
तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला आहेत रोगांनी विळखा घातला.
तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टराकडे जाण्याची वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले.
एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूम मध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नौकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले.

अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्ह्यायाला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, “मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे.”
तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, “तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.
आत्मा म्हणाला, “माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसित झाले आहे.”
“तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे. आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही.” एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली.

तात्पर्य: शरीर व चांगले स्वास्थ ही सर्वात मोठी संपत्ती आहे.आपल्या शरीराकडे लक्ष द्या आणि आपले आरोग्य चांगले ठेवा
                
📘 दिनांकानुसार पाढा :- २१ चा पाढा

                                 २१           १२६
                                 ४२           १४७
                                 ६३           १६८
                                 ८४           १८९
                                 १०५         २१०

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️ 

                📝 प्रश्नावली 206 📝

प्रश्न १. तंबाखूमुळे असणारे विषारी द्रव्य कोणते  ?
उत्तर – निकोटिन
—————————————–
प्रश्न २. सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे  ?
उत्तर – श्रीहरिकोटा
—————————————–
प्रश्न ३.  मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या  ?
उत्तर – बराकपुर
—————————————–
प्रश्न ४. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय  ?
उत्तर – मुरलीधर देवीदास आमटे.
—————————————–
प्रश्न ५.  सतीबंदीची  चळवळ राबविण्यामध्ये कोणी मुख्य भूमिका बजावली ?
उत्तर – राजा राममोहन रॉय
—————————————–

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

👉 आपल्या माहितीसाठी .

🌐नोबेल पारितोषिक विजेता

🎯 फिजियोलॉजी किंवा मेडिसिन 2024 मध्ये नोबेल पारितोषिक
◾व्हिक्टर एम्ब्रोस (यूएसए)
◾️गॅरी रुवकुन (यूएसए)

🎯 भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024
◾️ जॉन हॉपफिल्ड (यूएसए)
◾️ जेफ्री हिंटन (यूके)

🎯 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024
◾️डेव्हिड बेकर  (यूएसए)
◾️डेमिस हसाबिस (यूके)
◾️जॉन एम. जम्पर (यूएसए)

🎯 साहित्यातील नोबेल पारितोषिक 2024
◾️हान कांग (दक्षिण कोरिया)

🎯 नोबेल शांतता पुरस्कार 2024
◾️ निहोन हिडांक्यो (जपान संघटना

Share This Article