आजचा परिपाठ,प्रश्नावली, सामान्यज्ञान
📖 वाचाल तर वाचाल 📖
📘 आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २३ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- बुधवार
📙📘सुविचार :- जर हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची इच्छा पण बाळगू नये.
📙📘📙 दिनविशेष
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
1850 : अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क अधिवेशन सुरू झाले.
1890 : हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून लघुकथा लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
1973 : संयुक्त राष्ट्रांनी लादलेल्या निर्बंधांमुळे इस्रायल आणि सीरिया यांच्यातील युद्ध संपले.
1997 : किरण बेदी यांना सामाजिक कार्यासाठी जर्मन जोसेफ ब्यूस पुरस्कार प्रदान.
1998 : इस्रायल आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाने वाई नदी मेमोरँडमवर स्वाक्षरी केली.
2001 : ऍपल कॉम्प्युटरने आयपॉड रिलीज केले
2007 : STS-120 वर स्पेस शटल डिस्कव्हरी लाँच करण्यात आली, पामेला मेलरॉय ही दुसरी महिला स्पेस शटल कमांडर बनली.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
1778 : ‘चन्नम्मा’ – कित्तूरची राणी यांचा जन्म. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1829)
1879 : ‘शंकर रामचंद्र राजवाडे’ – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू : 27 नोव्हेंबर 1952)
1900 : ‘डग्लस जार्डिन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 18 जून 1958)
1923 : ‘दामोदर दिनकर कुलकर्णी’ – श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 22 फेब्रुवारी 2000)
1923 : ‘असलम फारुखी’ – भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान यांचा जन्म. (मृत्यू : 15 जुन 2016)
1924 : ‘पं. राम मराठे’ – संगीतकार, गायक व नट संगीतभूषण यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1989)
1937 : ‘देवेन वर्मा’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 2 डिसेंबर 2014)
1940 : ‘पेले’ – ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू यांचा जन्म.
1945 : ‘शफी इनामदार’ – अभिनेते व नाट्यनिर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 13 मार्च 1996)
1974 : ‘अरविंद अडिगा’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म.
1979 : ‘प्रभास’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
1975 : ‘मलायका अरोरा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
1981 : ‘सिद्धार्थ जाधव’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1915 : ‘डब्ल्यू. जी. ग्रेस’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 18 जुलै 1848)
1921 : ‘जॉन बॉईड डनलॉप’ – चाकात हवा भरलेली ट्यूब वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1840)
1957 : ‘ख्रिश्चन डायर’ – एस.ए. चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1905)
2012 : ‘सुनील गंगोपाध्याय’ – बंगाली कवी व कादंबरीकार यांचे निधन. (जन्म : 7 सप्टेंबर 1934)
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 बुचकळ्यात पडणे – गोंधळून जाणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रधारी
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
हीच अमुची प्रार्थना
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे.
🔊 बोधकथा 🔊
देवतांचा अहंकार
उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्वराने देवांवर कृपा केली आणि त्यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्यावर प्रत्येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्यातील प्रत्येक जण विजयाचे श्रेय स्वतःकडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्छ मानत असे. यामुळे देवतांमध्ये विनाकारण वाद चालु झाले. त्यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्यातील वैमनस्य यांना पराजित करेल. ही समस्या सोडविण्यासाठी ईश्वर एक विशाल यक्षाच्या रूपात देवतांच्या समोर हजर झाले. देवतांनी आश्चर्याने त्यांना पाहिले आणि त्यांचा परिचय करून घेण्यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्यांना विचारले, “आपण कोण आहात?” अग्नि देवतेने स्वाभिमानाने उत्तर दिले,” आपण मला ओळखत नाही? मी तेजस्वी अग्नि आहे. मी ठरवल्यास सारी पृथ्वी जाळून भस्म करून टाकीन.” यक्षाने त्यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्यासाठी गेले. तेव्हाने यक्षाने त्यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्हणाले,” मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.” यक्षाने तीच वाळलेली काडी त्यांना उडवण्यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्वराचा परिचय दिला. आता देवतांना त्यांच्या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्यांचा अहंकार नष्ट झाला.
तात्पर्य ::~ अहंकार आणि अहंकाऱ्याचे पतन निश्चीतच होत असते. आपली शक्ति योग्य कार्याला लावल्यास सार्थक होत असते.
📘 दिनांकानुसार पाढा :- २३ चा पाढा
२३ १३८
४६ १६१
६९ १८४
९२ २०७
११५ २३०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝 प्रश्नावली 208 📝
प्रश्न १. जागतिक ओझोन दिन कधी असतो ?
उत्तर :- १६ सप्टेंबर.
प्रश्न २.कोणत्या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असे म्हटले जाते ?
उत्तर :- नॉर्वे.
प्रश्न ३.नोबेल सन्मानाचे पहिले भारतीय मानकरी कोण ?
उत्तर :- रवींद्रनाथ टागोर.
प्रश्न ४.‘मोनालिसा’ या जगप्रसिद्ध चित्राचे चित्रकार कोण?
उत्तर :- लिओनार्दो दा व्हिंची.
प्रश्न ५. दोन ताऱ्यामधील अंतर मोजण्याचे एकक कोणते ?
उत्तर :- प्रकाशवर्ष.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
👉 आपल्या माहितीसाठी.
❗️ नवीन जिल्हा ❗️ मूळ जिल्हा ❗️निर्मिती
◾️सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981
◾️जालना : औरंगाबाद : 1 मे 1981
◾️लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982
◾️गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982
◾️मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990
◾️वाशीम : अकोला : 1 जुलै 1998
◾️नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998
◾️हिंगोली : परभणी : 1 मे 1999
◾️गोंदिया : भंडारा : 1 मे 1999
◾️पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014
◾️महाराष्ट्र स्थापने वेळी 26 जिल्हे 229 तालुके 4 महसूल विभाग होते
✨आता – 36 जिल्हे , 358 तालुके , 6 महसूल विभाग आहेत
✅महाराष्ट्र क्षेत्रफळ – 307,713 km चौ. किमी
✅क्षेत्रफळा नुसार भारतात – 3 रा क्रमांक
✅पूर्व पश्चिम लांबी – 800 Km
✅उत्तर दक्षिण लांबी – 700 Km
✅लाभलेला समुद्र किनारा – 720 Km (Imp)
✅एकूण जिल्हे – 36
✅जिल्हा परिषद -34
✅एकूण तालुके – 358
✅पंचायत समित्या- 351
✅महानगरपालिका – 29 (जालना 29 वी)
✅नगरपरिषद – 244
✅नगरपंचायती – 146
✅कटक मंडळे – 7
✅ग्रामपंचायती – 27,782