परिपाठ,प्रश्नावली,बोधकथा, सामान्याज्ञान.
📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २४ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- गुरुवार
📙📘सुविचार :- जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका,विजय हा नेहमी सत्याचाच होतो.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍 आजचा जागतिक दिन
🎗️जागतिक पोलिओ दिन
🎗️संयुक्त राष्ट्र दिन
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
1861 : युनायटेड स्टेट्समधील पहिली आंतरखंडीय टेलिग्राफ लाइन पूर्ण झाली.
1901 : एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
1909 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसरा साजरा करण्यात आला.
1945 : संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली.
1946 : V-2 क्रमांक-13 रॉकेटवर बसलेल्या कॅमेऱ्याने अंतराळातून पृथ्वीचे पहिले छायाचित्र घेतले.
1949 : संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाने काम सुरू केले.
1972 : दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.
1984 : भारतातील पहिला भुयारी मार्ग कोलकात्यात सुरू झाला.
1997 : सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रीमियम इम्पीरियल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1998 : लघुग्रह पट्ट्याचा शोध घेण्यासाठी आणि नवीन अंतराळ यान तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी डीप स्पेस 1 लाँच करण्यात आले.
2000 : थोर समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांना केंद्र सरकारचा पुरस्कार. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला..
2016 : सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून काढण्यात आले.
2018 : जगातील सर्वात लांब समुद्र क्रॉसिंग, हाँगकाँग-झुहाई-मकाऊ ब्रिज, सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
1775 : ‘बहादूरशहा जफर’ – दिल्लीचा शेवटचा बादशहा यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 1862)
1868 : ‘भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी’ – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार यांचा जन्म. (मृत्यू : 13 एप्रिल 1951)
1894 : ‘विभुद्धभाषण मुखोपाध्याय’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू : 29 जुलै 1987)
1910 : ‘लीला भालजी पेंढारकर’ – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री यांचा जन्म.
1914 : ‘लक्ष्मी सहगल’ – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन यांचा जन्म. (मृत्यू : 23 जुलै 2012)
1921 : ‘रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण’ – व्यंगचित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 26 जानेवारी 2015)
1926 : ‘केदारनाथ सहानी’ – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर यांचा जन्म. (मृत्यू : 3 ऑक्टोबर 2012)
1935 : ‘मार्क टुली’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म.
1963 : ‘अरविंद रघुनाथन’ – भारतीय अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म.
1972 : ‘मल्लिका शेरावत’ – अभिनेत्री व मॉडेल यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1922 : ‘जॉर्ज कॅडबरी’ – कॅडबरी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1839)
1944 : ‘लुई रेनॉल्ट’ – रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 12 फेब्रुवारी 1877)
1991 : ‘इस्मत चुगताई’ – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका यांचे निधन. (जन्म : 15 ऑगस्ट 1915)
1992 : ‘अरविंद गोखले’ – मराठी नवकथेचे जनक यांचे निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1919)
1995 : ‘माधवराव साने’ – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष यांचे निधन.
2011 : ‘जॉन मॅककार्थी’ – लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक यांचे निधन. (जन्म : 4 सप्टेंबर 1927)
2013 : ‘मन्ना डे’ – पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म : 1 मे 1919)
2014 : ‘एस. एस. राजेंद्रन’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन.
✒️✒️ जागतिक दिन लेख
📌 जागतिक पोलिओ दिन
जागतिक पोलिओ दिन (World Polio Day) दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे पोलिओ या घातक आजाराविषयी जागरूकता वाढवणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करणे. पोलिओ हा एक विषाणूजन्य आजार आहे जो विशेषतः लहान मुलांवर परिणाम करतो आणि गंभीर अवस्थेत त्यामुळे पक्षाघात होऊ शकतो.
या दिवसाची सुरुवात रोटरी इंटरनॅशनल या संघटनेने केली, ज्यामुळे जगभरातील पोलिओ निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणावर मोहिमा राबवण्यात आल्या. 1955 मध्ये डॉ. जोनास सॉक यांनी पोलिओ लसीचा शोध लावला, ज्यामुळे या आजाराच्या नियंत्रणात मोठी मदत झाली.
आज अनेक देश पोलिओमुक्त झाले असले तरी काही देशांमध्ये अद्यापही पोलिओची समस्या आहे. या दिवशी लसीकरणाच्या महत्त्वावर भर दिला जातो, कारण पोलिओचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी साधन आहे. जागतिक पोलिओ दिनाच्या माध्यमातून पोलिओमुक्त जग निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली जाते.
📌 संयुक्त राष्ट्र दिन
संयुक्त राष्ट्र दिन (United Nations Day) दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, जेव्हा 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे जगभरातील शांती, सुरक्षा, मानवी हक्क, आणि विकासाच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या योगदानाचे स्मरण करणे आणि जागतिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करणे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने अनेक आंतरराष्ट्रीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि जागतिक स्तरावर एकजूट निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये शांती स्थापनेच्या मोहिमा, मानवाधिकार संरक्षण, गरिबी निर्मूलन, पर्यावरण संरक्षण, शिक्षण आणि आरोग्य सेवा यांसारख्या अनेक विषयांचा समावेश होतो.
या दिवशी विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये जागतिक नेते आणि नागरिक एकत्र येऊन जागतिक आव्हानांवर चर्चा करतात. संयुक्त राष्ट्र दिन हा सहकार्य, शांतता, आणि प्रगती यांसाठी आंतरराष्ट्रीय समाजाच्या बांधिलकीचा सन्मान करणारा दिवस आहे, ज्यामुळे एक सुसंविधीत आणि शाश्वत जग निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य होते.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 आईची माया अन् पोर जाईल वाया – फार लाड केले तर मुले बिघडतात .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 ओटीत घळणे – संगोपनासाठी दुसऱ्यांच्या हवाली करणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 गुप्त बातम्या काढणारा – गुप्तहेर.
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु,
करते हैं हम शुरु आज का काम प्रभु ।
सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु,
करते हैं हम शुरु आज का काम प्रभु ।
शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाएं हम,
विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम ।
शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाएं हम,
विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम ।
हाँ, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम ।
तुम्ही से है आगाज़ तुम्हीं से अंजाम प्रभु,
करते है हम शुरु आज का काम प्रभु ।
सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु,
करते हैं हम शुरु आज का काम प्रभु ।
गुरुओं का सत्कार कभी न भूले हम,
इतना बनें महान गगन को छु ले हम ।
गुरुओं का सत्कार कभी न भूले हम,
इतना बनें महान गगन को छु ले हम ।
हाँ, इतना बनें महान गगन को छु ले हम ।
तुम्हीं से है हर सुबह तुम्ही से शाम प्रभु,
करते है हम शुरु आज का काम प्रभु ।
सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु,
करते हैं हम शुरु आज का काम प्रभु ।
🔊 बोधकथा 🔊
बंध विश्वासाचे
एकदा एक छोटी मुलगी आणि तिचे वडील एक पूल पार करत असतात. मुलगी पडेल, याची वडिलांना थोडी भीती वाटते आणि ते तिला म्हणतात…
“बाळा, माझा हात धर”
मुलगी पटकन म्हणते, “नको बाबा, तुम्हीच माझा हात धरा…
वडील कौतुकाने विचारतात,”अगं बाळा, काय फरक पडतो?’
मुलगी म्हणते, “खूप फरक पडतो बाबा. मी तुमचा हात धरला आणि मला काही झाले, तर मी पटकन हात सोडून देईन.
पण मला माहितीय, तुम्ही माझा हात धरला असताना काहीही झालं तरी तो सोडणार नाही.’
तात्पर्य ::~
कोणत्याही नात्यामधील विश्वास बंधनकारक नसतो, तर तो एक न तुटणारा बंध असतो.
📘 दिनांकानुसार पाढा :- २४ चा पाढा
२४ १४४
४८ १६८
७२ १९२
९६ २१६
१२० २४०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝 प्रश्नावली २०९ 📝
प्रश्न १. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
उत्तर :- बुध
प्रश्न २. भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर कोठे आहे ?
उत्तर :- मुंबई
प्रश्न ३. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
उत्तर :- रुपाली चाकणकर
प्रश्न ४. जगप्रसिद्ध पुष्कर सरोवर कोठे आहे ?
उत्तर :- अजमेर (राजस्थान) .
प्रश्न ५. जगात पहिला परमाणू हल्ला झालेले शहर कोणते ?
उत्तर :- हिरोशिमा.
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
👉 आपल्या माहितीसाठी.
▪️आंब्यांच्या झाडांची – राई
▪️प्रश्नपत्रिकांचा – संच
▪️उंटांचा, लमाणांचा – तांडा
▪️पालेभाजीची – गड्डी/जुडी
▪️नोटांची, पोत्यांची – थप्पी
▪️करवंदांची – जाळी
▪️फुलझाडांचा – ताटवा
▪️खेळाडूंचा – संघ
▪️भाकऱ्यांची, रुपयांची – चवड
▪️यात्रेकरूंचा – जथा
▪️जहाजांचा – काफिला
▪️वाद्यांचा – वृंद/मेळ
▪️द्राक्षांचा – घड, घोस
▪️माणसांचा – जमाव
▪️नोटांचे – पुडके
▪️मेंढ्यांचा – कळप
▪️वेलींचा – कुंज
▪️हरिणांचा – कळप
▪️माकडांची – टोळी
▪️पक्ष्यांचा – थवा
▪️उपकरणांचा – संच
▪️प्रवाशांची – झुंबड
▪️पुस्तकांचा, वह्यांचा – गठ्ठा
▪️केळ्यांचा – लोंगर/घड
▪️फळांचा – घोस / ढीग
▪️किल्ल्यांचा – जुडगा
▪️बांबूचे – बेट
▪️गुरांचा – कळप
▪️महिलांचे – मंडळ
▪️चोरांची/दरोडेखोरांची – टोळी
▪️वस्तूंचा – संच
▪️तारकांचा- पुंज, समूह
▪️गुरांचा – कळप
▪️महिलांचे – मंडळ
▪️चोरांची/दरोडेखोरांची – टोळी
▪️वस्तूंचा – संच
▪️तारकांचा – पुंज, समूह