” ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली 210 prashnavali 210
📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २५ ऑक्टोबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- शुक्रवार
📙📘सुविचार :- दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.
📙📘📙 दिनविशेष
🌍 जागतिक दिन
🎗️ आंतरराष्ट्रीय कलाकार दिन
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
1951 : स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुका सुरू झाल्या.
1962 : युगांडा संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
1971 : चीन संयुक्त राष्ट्र संघात सामील झाला. तैपेची हकालपट्टी.
1994 : ए. एम. अहमदी यांनी भारताचे 26 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
1999 : दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्यांदा मिळाले.
2001 : मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी जारी केला, जी मायक्रोसॉफ्टच्या सर्वात यशस्वी ऑपरेटिंग सिस्टमपैकी एक बनली.
2007 : एरबस ए-380चे प्रथम प्रवासी उड्डाण.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
1864 : ‘जॉन फ्रान्सिस डॉज’ – डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 14 जानेवारी 1920)
1929 : ‘एम.एन. व्यंकटचल्या’ – भारताचे 25 वे सरन्यायाधीश यांचा जन्म.
1937 : ‘डॉ. अशोक रानडे’ – संगीत समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 30 जुलै 2011)
1945 : ‘अपर्णा सेन’ – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1647 : ‘इव्हानजेलिस्टा टॉरिसेली’ – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा संशोधक यांचे निधन. (जन्म : 15 ऑक्टोबर 1608)
1955 : ‘पं. दत्तात्रय विष्णू पलुसकर’ – शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म : 28 मे 1921)
1960 : ‘हॅरी फर्ग्युसन’ – फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 4 नोव्हेंबर 1884)
1980 : ‘अब्दूल हयी लुधियानवी’ – शायर व गीतकार यांचे निधन. (जन्म : 8 मार्च 1921)
2003 : ‘पांडुरंगशास्त्री आठवले’ – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 19 ऑक्टोबर 1920)
2009 : ‘चित्तरंजन कोल्हटकर’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म : 14 जानेवारी 1923)
2012 : ‘जसपाल भट्टी’ – विनोदी अभिनेते यांचे निधन. (जन्म : 3 मार्च 1955)
✒️✒️ जागतिक दिन लेख
आंतरराष्ट्रीय कलाकार दिन
आंतरराष्ट्रीय कलाकार दिन (International Artist Day) दरवर्षी 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश जगभरातील कलाकारांच्या सर्जनशीलतेचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हा आहे. या दिवसाच्या माध्यमातून चित्रकला, शिल्पकला, नृत्य, संगीत, साहित्य आणि इतर कलाप्रकारांतील कलाकारांचे कौतुक करण्यात येते, कारण त्यांच्या कलाकृतींमुळे समाजात सौंदर्य, संस्कृती आणि विचारशक्तीला चालना मिळते.
कलाकार त्यांच्या अनोख्या दृष्टिकोनातून समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकतात आणि लोकांना प्रेरित करतात. कला ही व्यक्त होण्याचे शक्तिशाली साधन आहे, जी सांस्कृतिक वारसा जपण्यासोबतच बदल घडवून आणण्यासाठी देखील वापरली जाते.
या दिवशी, कलाविश्वातील विविध उपक्रम राबवले जातात, जसे की कला प्रदर्शनं, कार्यशाळा, आणि चर्चासत्रं, ज्यामध्ये नवोदित आणि अनुभवी कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळते. आंतरराष्ट्रीय कलाकार दिन हे कलाकारांच्या सृजनशीलतेचा उत्सव असून, त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि समाजातील कलात्मकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 हातच्या काकणाला आरसा कशाला – स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 आटोक्यात नसणे – आवाक्याबाहेरचे काम असणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 सत्याचा आग्रह धरणारा – सत्याग्रही
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
या भारतात बंधुभाव नित्य बसू दे।
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।
दे वरचि असा दे॥धृ॥
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे।
मतभेद नसू दे॥१॥
सकलांस कळो मानवता, राष्ट्रभावना।
ही सर्व स्थळी मिळुनी समुदाय-प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथे दिसू दे॥२॥
जातीभाव विसरूनिया एक हो आम्ही।
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी।
खलनिंदका मनींही सत्य न्याय वसू दे॥३॥
सौंदर्य रमो घराघरा स्वर्गियापरी।
ही नष्ट होऊ दे विपत्ति भीतीबावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजि बसू दे॥४॥
🔊 बोधकथा 🔊
सेनापती आणि मार्गदर्शक
एका गावात एक मार्गदर्शक समस्यांचे अत्यंत समाधानकारक निरसन करीत असे. एकदा त्या देशाचा सेनापती त्याच्याकडे गेला व म्हणाला, “महाराज ! मला स्वर्ग व नरक यातील फरक समजावून घ्यायचा आहे. आपण कृपया समजावून सांगाल का?” मार्गदर्शकाने त्याच्याकडे पाहिले व त्याला त्याचा परिचय विचारला. सेनापतीने त्याच्या वीरतापूर्ण कार्याच्याबाबतीत सविस्तर सांगितले. त्याची सर्वमाहिती ऐकून मार्गदर्शक म्हणाला, “चेहऱ्याने तर तुम्ही सेनापती नाही तर भिकारी दिसता. माझा विश्वास बसत नाहीये की तुमच्याकडून तलवारसुद्धा उचलत असेल.” हे ऐकून सेनापतीने रागाने म्यानातून तलवार उपसली. सेनापतीच्या या कृतीकडे पाहत मार्गदर्शक म्हणाला, “अरे वा! तुम्ही तर तलवारही बाळगता, लोखंडाची असती तर तुमच्या हातून गळून पडली असती.” हे उद्गार ऐकताच सेनापतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली, त्याने तीच तलवार घेवून मार्गदर्शकाच्या दिशेने हल्ला करण्यास सुरुवात केली, हातातील तलवारीने तो आता मार्गदर्शकावर घाव घालणार इतक्यात मार्गदर्शक म्हणाले, ” हे सेनापती ! बस हाच तो नरक ! क्रोधाने उन्मत्त होवून आपण विवेक घालवून माझ्यावर हल्ला केला आणि माझी हत्या करण्यास तयार झालात यालाच नरक असे म्हणतात.” हे ऐकून सेनापतीने तलवार म्यानात ठेवली. तेंव्हा मार्गदर्शक म्हणाले, “विवेक जागृत झाल्यावर व्यक्तीला आपल्या चुकांची जाणीव होते. विवेक गमावून कोणतेही कार्य केल्यास नाशाला कारणीभूत व्हावे लागते. ” सेनापतीला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
तात्पर्य – आत्मनियंत्रणातून विवेक उपजतो. विवेक जागृत ठेवल्यास अनेक वाईट प्रसंगातून सुटका करून घेता येते.
📘 दिनांकानुसार पाढा :- २५ चा पाढा
२५ १५०
५० १७५
७५ २००
१०० २२५
१२५ २५०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝 प्रश्नावली २१० 📝
प्रश्न १. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे ?
उत्तर : वैनगंगा.
प्रश्न २. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जुन हा राज्य पातळीवर कोणता दिवस मनून साजरा करण्यात येतो ?
उत्तर : सामाजिक न्याय दिवस.
प्रश्न ३. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखलं जात ?
उत्तर : छत्रपती संभाजीनगर
प्रश्न ४. फेकरी हा औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे ?
उत्तर : जळगाव.
प्रश्न ५. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले ?
उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे.
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
👉 आपल्या माहितीसाठी.
राज्य आणि लोकनृत्य
◾️अरुणाचल प्रदेश – बार्दो छम
◾️आंध्र प्रदेश – कुचीपुडी, कोल्लतम
◾️आसाम – बिहू, जुमर नाच
◾️उत्तर प्रदेश – कथक, चरकुला
◾️उत्तराखंड – गढवाली
◾️उत्तरांचल – पांडव नृत्य
◾️ओरिसा – ओडिसी, छाऊ
◾️कर्नाटक – यक्षगान, हत्तारी
◾️केरळ – कथकली
◾️गुजरात – गरबा, रास
◾️गोवा – मंडो
◾️छत्तीसगढ – पंथी
◾️जम्मू आणि काश्मीर – रौफ
◾️झारखंड – कर्मा, छाऊ
◾️मणिपूर – मणिपुरी
◾️मध्य प्रदेश – कर्मा, चरकुला
◾️महाराष्ट्र – लावणी
◾️मिझोरम – खान्तुम
◾️मेघालय – लाहो
◾️तामिळनाडू – भरतनाट्यम
◾️पंजाब – भांगडा, गिद्धा(गिद्दा)
◾️पश्चिम बंगाल – गंभीरा, छाऊ
◾️बिहार – छाऊ
◾️राजस्थान – घूमर
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥