दैनंदिन परिपाठ,बोधकथा,प्रश्नमंजुषा.
📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- १३ नोव्हेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- बुधवार
📙📘सुविचार :-स्वतः साठी सुंदर घर बनवणे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते ! मात्र एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते !
📙📘📙 दिनविशेष
🌍 आजचा जागतिक दिन
🎗️जागतिक न्यूमोनिया दिन
✒️✒️
आजचा दिनविशेष – घटना
1905 : नॉर्वेच्या लोकांनी प्रजासत्ताक बनण्याऐवजी राजेशाही टिकवून ठेवण्यासाठी सार्वमत घेतले.
1918 : ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.
1930 : पहिली गोलमेज परिषद सुरू झाली.
1945 : महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पुण्यात साडेदहा तासांची बैठक घेतली.
1998 : परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले.
2000 : 12 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
2000 : भारतीय महिला ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम हिने इस्तंबूल, तुर्की येथे झालेल्या 34 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक रौप्य पदक जिंकले.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
1817 : ‘बहाउल्ला’ – बहाई पंथाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 29 मे 1892)
1819 : ‘मोनियर मोनियर-विल्यम्समोनियर’ – भाषाशास्त्रज्ञ आणि शब्दकोश संकलक यांचा जन्म.
1866 : ‘सन यट-सेन’ – चीन प्रजासत्ताक चे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 12 मार्च 1925)
1880 : ‘सेनापती बापट’ – सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक यांचा जन्म. (मृत्यू: 28 नोव्हेंबर 1967)
1889 : ‘डेव्हिट वॅलेस’ – रीडर डायजेस्टचे सह्संथापक यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑगस्ट 1981)
1896 : ‘डॉ.सलीम मोईनुद्दिन अब्दुल अली’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय पक्षीतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 1987)
1904 : ‘श्रीधर महादेव जोशी’ – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 1989)
1940 : ‘अमजद खान’ – हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 1992 )
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1946 : ‘पण्डित मदन मोहन मालवीय’ – बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1861)
1959 : ‘सेवानंद गजानन नारायण कानिटकर’ -अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1886)
1959 : ‘केशवराव मारुतराव जेधे’ – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 9 मे 1886)
1997 : ‘वेदाचार्य विनायक भट्ट घैसास गुरुजी’ – वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी यांचे निधन.
2005 : ‘प्रा. मधू दंडवते’ – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 जानेवारी 1924)
2007 : ‘के. सी. इब्राहिम’ – भारतीय क्रिकेटर यांचे निधन. (जन्म: 26 जानेवारी 1919)
2014 : ‘रवी चोप्रा’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन. (जन्म: 27 सप्टेंबर 1946)
✒️✒️ जागतिक दिन लेख :
जागतिक न्यूमोनिया दिन
जागतिक न्यूमोनिया दिन (World Pneumonia Day) दरवर्षी 12 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे न्यूमोनिया या गंभीर श्वसनाच्या आजाराविषयी जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे, आणि योग्य उपचारांची गरज अधोरेखित करणे होय. न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्गजन्य आजार असून, प्रामुख्याने लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, आणि कमजोर रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांवर परिणाम करतो.
न्यूमोनियाचे लक्षणे म्हणजे खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप, आणि थकवा. या आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण, स्वच्छता राखणे, आणि पौष्टिक आहार घेणे यांसारखे उपाय महत्त्वाचे आहेत. तसेच, न्यूमोनियाची लक्षणं दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
जागतिक न्यूमोनिया दिनानिमित्त आरोग्य संस्था आणि स्वयंसेवी संघटना विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करतात, ज्यात लोकांना न्यूमोनियाच्या लक्षणांविषयी, प्रतिबंधात्मक उपायांविषयी माहिती दिली जाते. या दिवसामुळे न्यूमोनियावर नियंत्रण मिळवणे, विशेषत: मुलांचे जीव वाचवणे, आणि निरोगी समाज निर्माण करणे हे उद्दिष्ट साध्य करता येते.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप – अतिशय उतावळेपणाची कृती
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 झीज सोसणे – नुकसान सहन करणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 दुसयावर उपकार करणारा – परोपकारी
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
या लाडक्या मुलांनो
या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार ।
नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार ॥धृ।।
आईस देव माना, वंदा गुरुजनांना।
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा ।
गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥१॥
शिवबापरी जगांत, दिलदार थोर व्हावे।
टिळकापरी सदैव, ध्येयास त्या स्मरावें।
जे चांगलें जगी या, त्याचा करा स्वीकार।।२।।
शाळेत रोज जाता, ते ज्ञान-बिंदु मिळवा।
हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा।
कुलशील थोर माना, ठेवू नका विकार ॥३॥
📖 बोधकथा 📖
आत्मसात करा
एक दिवस शाळेला सुट्टी असल्याची घोषणा गुरूजींनी केली म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडीलाच्या दुकानवर गेला. तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडीलाच्या कामाच निरीक्षण करु लागला. त्याने पाहीले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबुन ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचुन ठेवायचे. जेव्हा त्याने चार पाच वेळा हे पाहीले तेव्हा आश्चर्याने त्याने वडीलांना एक गोष्ट विचारु का असे म्हटले वडीलानी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा ही कपडा कापता तेंव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेंव्हा कपडा शिवता तेंव्हा सुई टोपीला लावता. असं का? याचे उत्तर त्याच्या वडीलांनी दोन ओळीत दिले त्यात पूर्ण जीवनाचे सार सांगितले ते म्हणाले “बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते कापणा-याची जागा नेहमी खाली असते तर जोडणा-याची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो.
तात्पर्य ::~जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा कैचीसारखे तोडण्याचे नाही. आज त्याचे डोळे उघडले व जीवनाचा खरा अर्थ कळला.
📘 दिनांकानुसार पाढा :- १३ चा पाढा
१३ ७८
२६ ९१
३९ १०४
५२ ११७
६५ १३०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝 प्रश्नावली 211 📝
प्रश्न.1) भारताने कोणते वर्षे “जागतिक महिला शेतकरी वर्ष” म्हणून घोषित केले ?
उत्तर – 2026
प्रश्न.2) भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली ?
उत्तर – IAS विपिन कुमार
प्रश्न.3) अलीकडेच चर्चेत आलेला लुना क्रेटर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर – गुजरात
प्रश्न.4) आयुष्मान भारत-आरोग्य आणि कल्याण केंद्रांचे नवीन नाव काय आहे ?
उत्तर – आयुष्मान आरोग्य मंदिर
5) देशातील पहिली सरकारी “हेली रुग्णवाहिका” AIIMS कोठे सुरू झाली आहे ?
उत्तर – उत्तराखंड
प्रश्न.6) प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?
उत्तर – 39 व्या
प्रश्न.7) वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?
उत्तर – 79 वा
प्रश्न.8) ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे ?
उत्तर – रविचंद्रन अश्विन
प्रश्न.9) इमर्जिंग टीम एशिया कप 2024 कोणत्या देशाने जिंकला ?
उत्तर – अफगाणिस्तान
प्रश्न.10) 68 व्या बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूला नामांकन मिळाले ?
उत्तर – रॉड्रिगो हर्नांडेज़ कैस्केंट
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
👉 आपल्या माहितीसाठी.
महाराष्ट्रातील महत्त्वाचे संग्रहालय :
➖➖➖➖➖➖➖➖➖
– आलमगीर संग्रहालय – अहमदनगर
– छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय – छ. संभाजीनगर
– श्री भवानी संग्रहालय – औंध (सातारा)
– चंद्रकांत मांडरे कलादालन – कोल्हापूर
– सिद्धगिरी म्युझियम – कोल्हापूर
– आगाखान पॅलेस संग्रहालय – पुणे
– राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय – पुणे
– रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालय – तेर (धाराशिव)
– नाणे संग्रहालय – अंजनेरी (नाशिक)
– कॅव्हलरी टँक (रणगाडा) म्युझियम – अहमदनगर
– सोनेरी महाल संग्रहालय – छ. संभाजीनगर
– छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय – सातारा
– टाऊन हॉल संग्रहालय – कोल्हापूर
– गणेश संग्रहालय, सारसबाग – पुणे
– ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम – पुणे
– नॅशनल मेरिटाइम म्युझियम – मुंबई
– डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम – मुंबई
– मध्यवर्ती संग्रहालय – नागपूर