” ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली 213.Prashnavali 213

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
8 Min Read

         📖 वाचाल तर वाचाल 📖

     📘आजचा परिपाठ📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- १६ नोव्हेंबर  २०२४
🔊🔊 आजचा वार:- शनिवार

📙📘सुविचार :- आत्मविश्वास हि यशाची पहिली पायरी आहे.

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन

🎗️आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

1868: लॅक्वीअर आणि नॅनसेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
1893: डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.
1945: युनेस्कोची स्थापना झाली.

1996: कोकण रेल्वेच्या रत्नागिरी-मुंबई मार्गाचे उद्घाटन झाले.
1996: मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांची चतुरंग प्रतिष्ठानच्या पर्सन ऑफ प्राइड पुरस्कारासाठी निवड..
1997: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
2000: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.
2009: स्पेस शटल प्रोग्राम: स्पेस शटल अटलांटिस मिशन STS-129 वर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रक्षेपित करण्यात आले.
2013: 24 वर्षांच्या कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. हा सन्मान त्यांना सर्वात लहान वयात (40) मिळाला.
2022: आर्टेमिस प्रोग्राम: NASA ने स्पेस लॉन्च सिस्टीमच्या पहिल्या फ्लाइटवर आर्टेमिस 1 लाँच केले, चंद्रावर भविष्यातील मोहिमांची सुरुवात

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

1836: ‘डेविड कालाकौआ’ – हवाईचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1891)
1894: ‘धोंडो वासुदेव गद्रे’ – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1975)
1897: ‘चौधरी रहमत अली’ – भारतीय-पाकिस्तानी यांचा जन्म. (मृत्यू: 3 फेब्रुवारी 1951)
1904: ‘ननामदी अझीकीवे’ – नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 11 मे 1996)
1909: ‘मिर्झा नासीर अहमद’ – भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु यांचा जन्म. (मृत्यू: 9 जून 1982)
1917: ‘चित्रगुप्त श्रीवास्तव’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 14 जानेवारी 1991)
1927: ‘डॉ. श्रीराम लागू’ – मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार यांचा जन्म.
1928: ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले’ – मराठी संत साहित्यातील विद्वान यांचा जन्म. (मृत्यू: 29 जुलै 2006)
1930: ‘मिहिर सेन’ – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय यांचा जन्म. (मृत्यू: 11 जून 1997)
1963: ‘मिनाक्षी शेषाद्री’ – अभिनेत्री यांचा जन्म.
1968: ‘शोभाजी रेगी’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 24 एप्रिल 2014)
1973: ‘पुल्लेला गोपीचंद’ – बॅडमिंटनपटू यांचा जन्म.

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1915: ‘विष्णू गणेश पिंगळे’ – गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक यांच्यासह 7 जणांना फाशी देण्यात आले.
1947: ‘ज्युसेप्पे वोल्पी’ – व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 19 नोव्हेंबर 1877)
1950: ‘डॉ. बॉब स्मिथ’ – अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 8 ऑगस्ट 1879)
1960: ‘क्लार्क गेबल’ – अमेरिकन अभिनेता यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1901)
1967: ‘रोशनलाल नागरथ’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म: 14 जुलै 1917)
2006: ‘मिल्टन फ्रीडमन’ – नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 31 जुलै 1912)
2015: ‘सईद जाफरी’ – प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते यांचे निधन.

🌍जागतिक दिन लेख

          आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस
आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन (International Day for Tolerance) दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे विविधतेतून एकता साधणे, सहिष्णुतेचे महत्त्व ओळखणे आणि समाजात शांतता, सन्मान आणि समता प्रस्थापित करणे होय. आजच्या ग्लोबलायजेशनच्या युगात, जगभरातील लोक वेगवेगळ्या धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांशी जोडलेले आहेत. अशा स्थितीत एकमेकांविषयी सहिष्णुता राखणे अत्यावश्यक आहे.
सहिष्णुता म्हणजे केवळ एकमेकांचे मत आणि आचार-विचारांचा आदर करणे नव्हे, तर एकमेकांकडून शिकण्याची, समजून घेण्याची आणि भिन्नतेला स्वीकारण्याची वृत्ती होय. या दिवशी शाळा, महाविद्यालये, आणि सामाजिक संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात, जसे की कार्यशाळा, चर्चासत्रे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यामुळे लोकांमध्ये सहिष्णुतेची भावना जागवली जाते.

सहिष्णुता ही समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण ती सामाजिक एकता निर्माण करते आणि संघर्ष टाळते. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी सहिष्णुता जोपासून शांतता आणि बंधुत्व वाढविण्यासाठी एकत्र यावे.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 पळसला पाने तीनच – कोठेही गेले तरी परिस्थिति सामन्यात: सारखीच असते.

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉हात हलवत परत येणे – काम न होता परत येणे.

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 अन्न देणारा – अन्नदाता

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                      🙏 प्रार्थना 🙏
नमो भास्करा

नमो भास्करा दे अनोखा प्रकाश
तनाचा मनाचा कराया विकास

गतीच्या विकासास द्यावा प्रकाश
झणी होऊ दे दुर्गुणांचा विनाश

नमो शारदा मी तुझा नम्र दास
अशी बुद्धी देई मला तुचि खास

घडो मायभूमी अहर्निश सेवा
मनाला अहंकार कधी ना शिवावा।

                        📖  बोधकथा 📖

                      आई वडिलाचे संस्कार
          
  एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता. त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते.तो त्या संस्‍कारांना धरून वागत होता .तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कमा निमित गेला. घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता. नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्या साठी गेला . मुलगा तेथेच बसून राहिला. त्याच्या समोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते.त्याला सफरचंद खूप आवडायचे परंतु त्याने त्याला हात न लावता तो शेजाऱ्यांची वाट पाहात बसला होता .ब-याच वेळाने शेजारी घरी परत आला त्‍याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्‍याच्‍या शेजारी सफरचंदे असताणही तो त्‍यांना खात नाही.त्‍या मुलालाही सफरचंद आवडत हे त्यांना माहीत होते तरी त्‍याने त्‍यांना हात लावला नाही.

शेजारी आले की त्याने त्यांना नमस्कार केला .शेजाऱ्यांनी त्याला विचारले,”तुला सफरचंद आवडतात ना, मग तरी तू एक ही सफरचंद का खाल्‍ले नाहीस” मुलगा म्‍हणाला,” इथेच कोणीच नव्‍हते, मी एक दोन सफरचंदे जरी खाले असती तरी कुणालाच काही कळले नसते,मला कोणीच पाहत नव्‍हते पण मी स्‍वत:ला पाहात होतो.म्हणून मी खले नाही मी स्‍वत:ला फसवू शकत नाही.शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला.तो म्‍हणाला,”आपला आत्‍मा आपण काय करतो ते पाहात असतो, आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला फसवू पण आपण आल्याला खोटे बोलयाचे फार अवघड आहे.
तात्‍पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे बोलणे अडवल्यास मुले भविष्‍यात योग्‍य दिशेने वाटचाल करतात . मुले वाईट वर्तनाची निघाल्‍यास त्‍याचा दोष आईवडीलांच्या संस्कारचा दोष येतो.
        
 
📘 दिनांकानुसार पाढा :- १६ चा पाढा

                                 १६            ९६
                                 ३२            ११२
                                 ४८            १२८
                                 ६४            १४४
                                 ८०            १६०

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️ 

                📝 प्रश्नावली २१३ 📝

प्रश्न १ भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण?
उत्तर :- सुकुमार सेन

प्रश्न २. अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कोण होते?
उत्तर :- लेफ्टनंट रामचरण

प्रश्न ३. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय सांगा?
उत्तर :- मिहीर सेन

प्रश्न ४. उत्तर ध्रुवावर पोचलेल्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी कोण?
उत्तर :- कॅप्टन झोया अगरवाल

प्रश्न ५. नोबेल सन्मानाचे पहिले भारतीय मानकरी सांगा?
उत्तर :- रवींद्रनाथ टागोर

प्रश्न ६. भारतात सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषवण्याचा मान कुणाला आहे?
उत्तर :- डॉ. राजेंद्र प्रसाद.

⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

👉आपल्या माहितीसाठी.

◾️सर्वात मोठे बंदर – मुंबई – महाराष्ट्र
◾️सर्वात खोल बंदर – विशाखापट्टणम – आंध्रप्रदेश
◾️मन्नारच्या आखातातील बंदर – तुतिकोरीन – तामिळनाडू
◾️निर्याताभिमुख बंदर – नवे मंगळूर – कर्नाटक   
◾️लाटांवर आधारित बंदर – कांडला – गुजरात 
( भारतातील पहिले मुक्त व्यापार क्षेत्र )
◾️कृत्रिम बंदर – चेन्नई – तामिळनाडू
◾️नैसर्गिक बंदर – कोची – केरळ , मार्मागोवा – गोवा ,  मुंबई – महाराष्ट्र 

Share This Article