ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली 214.prashnavali 214

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
9 Min Read

       📖 वाचाल तर वाचाल 📖

                📘आजचा परिपाठ📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- १७ नोव्हेंबर  २०२४
🔊🔊 आजचा वार:- सोमवार

📙📘सुविचार :- सत्याच्या मार्गावर चालणारे नेहमी विजय मिळवतात.

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन

🎗️ बाल लैंगिक शोषण, अत्याचार आणि हिंसेपासून बचाव करण्याचा जागतिक दिवस

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

1882: अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.
1905: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिला आणि लॉर्ड मिंटो यांनी भारताचे 17 वे व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल म्हणून जबाबदारी स्वीकारली.
1933: प्रभातचा पहिला रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.
1955: भाक्रा-नांगल धरणाचे बांधकाम सुरू.
1962: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन केले.
1963: पहिला पुश-बटण टेलिफोन सेवेत आला.
1985: केल्विन आणि हॉब्सचे पहिले कॉमिक दहा वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले
1992: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे 24 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.

✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म
1898: ‘प्रबोध चंद्र बागची’ – भारताचा अतिप्राचीन इतिहास यांचा जन्म.
1901: ‘व्ही. शांताराम’ – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑक्टोबर 1990)
1906: ‘अॅलेक इझिगोनिस’ – मिनी कार चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1988)
1909: ‘जॉनी मर्सर’ – कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 6 ऑक्टोबर 1976)
1910: ‘बटुकेश्वर दत्त’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 20 जुलै 1965)
1931: ‘श्रीकांत वर्मा’ – हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य यांचा जन्म.
1945: ‘महिंदा राजपक्षे’ – श्रीलंकेचे 6 वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख यांचा जन्म.
1950: ‘जितेंद्रनाथ गोस्वामी’ – भारतीय शास्त्रज्ञ यांचा जन्म.
1954: ‘रंजन गोगोई’ – भारताचे 46 वे सरन्यायाधीश यांचा जन्म.

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1772: ‘थोरले माधवराव पेशवे’ – मराठा साम्राज्यातील 4 था पेशवा यांचे निधन. (जन्म: 16 फेब्रुवारी 1745)
1936: ‘व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई’ – भारताचे वकील व राजकारणी यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 1872)
1962: ‘नील्स बोहर’ – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1885)
1993: ‘पु. रा. भिडे’ – लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक यांचे निधन.
1996: ‘कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई’ – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते यांचे निधन.
1998: ‘तारा सिंग हेर’ – भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक यांचे निधन. (जन्म: 15 नोव्हेंबर 1936)
1998: रामकृष्ण नारायण गोडबोले’ – सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक यांचे निधन.
1999: ‘रामसिंह रतनसिंह परदेशी’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
2001: ‘नारायण देवराव पांढरीपांडे’ – नाडेप कंपोस्ट खताचे जनक यांचे निधन.
2006: ‘हणमंत नरहर जोशी’ – मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ यांचे निधन. (जन्म: 6 एप्रिल 1917)
2013: ‘एस. आर. डी. वैद्यनाथन’ – भारतीय संगीतकार यांचे निधन. (जन्म: 15 मार्च 1929)

✒️✒️  जागतिक दिन लेख :

     बाल लैंगिक शोषण, अत्याचार आणि हिंसेपासून बचाव     करण्याचा जागतिक दिवस

बाल लैंगिक शोषण, अत्याचार आणि हिंसेपासून संरक्षण आणि उपचार दिन (World Day for the Prevention of and Healing from Child Sexual Exploitation, Abuse, and Violence) दरवर्षी 18 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे बालकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे संरक्षण करणे, त्यांना सुरक्षित आणि आदरपूर्वक वागणूक मिळावी यासाठी जागरूकता निर्माण करणे होय. आजच्या समाजात बालकांवरील लैंगिक अत्याचार, शोषण आणि हिंसा ही गंभीर समस्या बनली आहे, जी त्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासावर दीर्घकालीन परिणाम करते.
या दिवशी विविध संस्था आणि सामाजिक संघटना कार्यशाळा, जनजागृती कार्यक्रम, आणि चर्चासत्रांचे आयोजन करतात. या उपक्रमांमधून पालक, शिक्षक, आणि समाजातील सर्व घटकांना बालकांच्या हक्कांविषयी माहिती दिली जाते आणि अत्याचाराचे संभाव्य संकेत ओळखण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाते.
हा दिवस बालकांना सुरक्षित वातावरणात वाढवण्याची प्रेरणा देतो, तसेच बाल अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांच्यावर परिणाम होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची गरज अधोरेखित करतो.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे.

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉हात झाडून मोकळे होणे – जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे.

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 देवालयाचे शिखराचे टोक – कळस.

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                      🙏 प्रार्थना 🙏

            हीच अमुची प्रार्थना

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे


धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
   
                🏆 बोधकथा 🏆 
                  गुलाब पुष्प
       
    एक राजकन्या होती. एकदा राजवाड्यात एक ऋषी आलेले असताना तिने त्यांचा अपमान केला.* त्यावेळेस क्रोधित झालेल्या त्या तपस्वी ऋषींनी तिला शाप दिला की, “दिवसभर तू गुलाब पुष्प होऊन राजवाड्याच्या समोरच्या बागेत गुलाबाच्या ताटव्यात राहशील. पण संध्याकाळ होताच राजकन्येच्या रुपात येऊन राजवाड्यात येऊन झोपू शकशिल. मात्र सकाळ होताच त्या गुलाब ताटव्यातील एक गुलाब होशील.”हा शाप ऐकून तिने चुकीबद्दल ऋषीची क्षमा मागितली. ऋषींचा राग शांत झाल्यावर त्यांनी उपशाप दिला की, “जो कोणी ताटव्यातील गुलाबातून तुझा गुलाब ओळखून खुडेल, त्यावेळेस तुझी मुक्तता होईल.” या उपशापाप्रमाणे राजाने अनेकांना आवाहन केले. पण कोणालाच गुलाब ओळखता येईना ! एक दिवस कौसर देशाचा राजकुमार आला. त्याने राजकन्येचा गुलाब ओळखून तो अलगद खुडला. त्याक्षणी राजकन्या शापमुक्त झाली.  “हा गुलाब तू कसा ओळखलास? असे राजाने विचारताच राजपुत्र म्हणाला,” महाराज, सोपं होत. रात्रभर राजकन्या महालात असते. व सूर्योदयानंतर गुलाबच फुल होते. तेव्हा संपूर्ण गुलाबाच्या ताटव्यातील फुले दवान भिजलेली असतील. पण सूर्योदयानंतर दव पडत नाही, म्हणजे राजकन्येच फुल कोरड असणार ! असा विचार करून मी योग्य ते फूलं तोडलं.” राजा त्याच्या हुशारीवर खुश झाला.
तात्पर्य – सारासार विचार करून निर्णय घेतल्याने तो योग्य ठरतो.

 
📘 दिनांकानुसार पाढा :- १८ चा पाढा

                                 १८            १०८
                                 ३६            १२६
                                 ५४            १४४
                                 ७२            १६२
                                 ९०            १८०

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️ 

                 📝 प्रश्नावली २१४ 📝

प्रश्न १. सूर्य मुख्यतः कोणत्या वायूंपासून बनलेला आहे?
उत्तर :- हायड्रोजन व हेलियम

प्रश्न २. वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात?
उत्तर :-  ओऑसिस

प्रश्न ३. भारतातील पहिली आय आय टी कोणती?
उत्तर :- आय आय टी खगरपूर

प्रश्न ४. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते?
उत्तर :- जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

प्रश्न ५ भारतात पहिली आण्विक चाचणी कधी झाली?
उत्तर :- १८ मे १९७४.

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏭️

👉 आपल्या माहितीसाठी.

महाराष्ट्राच्या 2011 च्या जनगणनेनुसार:
➖➖➖➖➖➖➖➖
– एकूण लोकसंख्या: 11,23,74,333
– पुरूष लोकसंख्या: 5.82 कोटी
– स्त्रियांची लोकसंख्या: 5.41 कोटी
– ग्रामीण लोकसंख्या: 54.77%
– शहरी लोकसंख्या: 45.23%
– पुरूष-स्त्री प्रमाण: 1000:929
– एकूण साक्षरता: 82.3%
– पुरूष साक्षरता: 88.4%
– स्त्री साक्षरता: 75.9%
– घनता: 365 (प्रती चौ.कि.मी.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
विशेष माहिती:
– सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा: मुंबई उपनगर (89.90%)
– सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा: नंदुरबार (64.4%)
– सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: रत्नागिरी (1000:1123)
– सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: मुंबई शहर (1000:832)
– सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: मुंबई उपनगर
– सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: गडचिरोली
– सर्वाधिक ठाणे लोकसंख्या असलेला जिल्हा (विभाजनपूर्व-2011): पुणे
– सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा: सिंधुदूर्ग

Share This Article