📖 वाचाल तर वाचाल 📖
📘 आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २५ नोव्हेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- सोमवार
📙📘सुविचार :- नेहमी खरे बोलावे.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍 आजचा जागतिक दिन
🎗️महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिन
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
1664 : छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली.
1922 : फ्रेडरिक बँटिंग यांनी मधुमेहासाठी इन्सुलिनचा शोध जाहीर केला.
1948 : नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
1975 : सुरीनामला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
1981 : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
1991 : कमल नारायण सिंह यांनी भारताचे 22 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
1994 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, कलकत्ता तर्फे राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1999 : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2000 : सितार वादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन सन्मान प्रदान केला.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
1841 : ‘आर्न्स्ट श्रोडर’ – जर्मन गणितज्ञ यांचा जन्म.
1844 : ‘कार्ल बेंझ’ – मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1929)
1872 : ‘कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर’ – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 ऑगस्ट 1948)
1889 : ‘साधू वासवानी’ – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1966)
1882 : ‘सावळाराम लक्ष्मण हळदणकर’ – मराठी चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 मे 1968)
1898 : ‘देबाकी बोस’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
1921 : ‘भालचंद्र पेंढारकर’ – नटवर्य यांचा जन्म.
1926 : ‘रंगनाथ मिश्रा’ – भारताचे 21 वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 2012)
1935 : ‘गोविंद सावंत’ – महाराष्ट्रीय हॉकीपटू यांचा जन्म.
1937 : ‘साधू वासवानी’ – शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म.
1939 : ‘उस्ताद रईस खान’ – मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक यांचा जन्म.
1952 : ‘इम्रान खान’ – पाकिस्तानचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
1972 : ‘दीपा मराठे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
1983 : ‘झुलन गोस्वामी’ – भारतीय क्रिकेटर यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1885 : ‘अल्फान्सो (बारावा)’ – स्पेनचा राजा यांचे निधन. (जन्म : 28 नोव्हेंबर 1857)
1922 : ‘पांडुरंग दामोदर गुणे’ – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक यांचे निधन. (जन्म : 20 मे 1884)
1960 : ‘अनंत सदाशिव अळतेकर’ – प्राच्यविद्यापंडित यांचे निधन. (जन्म : 24 सप्टेंबर 1898)
1962 : ‘गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे’ – आधुनिक संतकवी यांचे निधन. (जन्म : 6 जानेवारी 1868)
1974 : ‘उ. थांट’ – संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस यांचे निधन. (जन्म : 22 जानेवारी 1909)
1984 : ‘यशवंतराव चव्हाण’ – भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 12 मार्च 1913)
1997 : ‘जवाहरलालजी दर्डा’ – लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी यांचे निधन.
1997 : ‘हेस्टिंग्ज बांदा’ – मलावी देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 14 मे 1898)
1998 : ‘परमेश्वर नारायण हक्सर’ – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 4 सप्टेंबर 1913 – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)
2013 : ‘लीला पोतदार’ – बालसाहित्यिका यांचे निधन. (जन्म : 5 सप्टेंबर 1920)
2014 : ‘सितारा देवी’ – भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर यांचे निधन. (जन्म : 8 नोव्हेंबर 1920)
2016 : ‘फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ’ – क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 13 ऑगस्ट 1926)
✒️✒️ जागतिक दिन लेख
महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिन
महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिन (International Day for the Elimination of Violence Against Women) दरवर्षी 25 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांवर होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आणि भावनिक अत्याचारांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचा अंत करण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी साजरा केला जातो.
महिलांविरुद्ध हिंसाचार ही जागतिक समस्या आहे, जी केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नुकसान पोहोचवत नाही, तर समाजाच्या प्रगतीलाही अडथळा ठरते. घरगुती हिंसा, मानवी तस्करी, लैंगिक शोषण, आणि वांशिक भेदभाव यांसारख्या समस्यांमुळे महिला अनेक आव्हानांना सामोऱ्या जातात.
या दिवशी विविध सामाजिक संघटना, शाळा, आणि सरकारी संस्था जनजागृती मोहीम, चर्चासत्रे, आणि कार्यशाळांचे आयोजन करतात. महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण, कायद्यांची माहिती, आणि त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात.
हिंसाचारमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येकाने महिलांचा सन्मान राखणे, समानता प्रस्थापित करणे, आणि त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉हात झाडून मोकळे होणे – जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 देवालयाचे शिखराचे टोक – कळस.
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
हीच अमुची प्रार्थना
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
🏆 बोधकथा 🏆
गुलाब पुष्प
एक राजकन्या होती. एकदा राजवाड्यात एक ऋषी आलेले असताना तिने त्यांचा अपमान केला.* त्यावेळेस क्रोधित झालेल्या त्या तपस्वी ऋषींनी तिला शाप दिला की, “दिवसभर तू गुलाब पुष्प होऊन राजवाड्याच्या समोरच्या बागेत गुलाबाच्या ताटव्यात राहशील. पण संध्याकाळ होताच राजकन्येच्या रुपात येऊन राजवाड्यात येऊन झोपू शकशिल. मात्र सकाळ होताच त्या गुलाब ताटव्यातील एक गुलाब होशील.”हा शाप ऐकून तिने चुकीबद्दल ऋषीची क्षमा मागितली. ऋषींचा राग शांत झाल्यावर त्यांनी उपशाप दिला की, “जो कोणी ताटव्यातील गुलाबातून तुझा गुलाब ओळखून खुडेल, त्यावेळेस तुझी मुक्तता होईल.” या उपशापाप्रमाणे राजाने अनेकांना आवाहन केले. पण कोणालाच गुलाब ओळखता येईना ! एक दिवस कौसर देशाचा राजकुमार आला. त्याने राजकन्येचा गुलाब ओळखून तो अलगद खुडला. त्याक्षणी राजकन्या शापमुक्त झाली. “हा गुलाब तू कसा ओळखलास? असे राजाने विचारताच राजपुत्र म्हणाला,” महाराज, सोपं होत. रात्रभर राजकन्या महालात असते. व सूर्योदयानंतर गुलाबच फुल होते. तेव्हा संपूर्ण गुलाबाच्या ताटव्यातील फुले दवान भिजलेली असतील. पण सूर्योदयानंतर दव पडत नाही, म्हणजे राजकन्येच फुल कोरड असणार ! असा विचार करून मी योग्य ते फूलं तोडलं.” राजा त्याच्या हुशारीवर खुश झाला.
तात्पर्य – सारासार विचार करून निर्णय घेतल्याने तो योग्य ठरतो.
📘 दिनांकानुसार पाढा :- २५ चा पाढा
२५ १५०
५० १७५
७५ २००
१०० २२५
१२५ २५०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝 प्रश्नावली 📝
प्रश्न १. राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर :- 12 जानेवारी
प्रश्न २. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ?
उत्तर :- प्रवरानगर (अहमदनगर)
प्रश्न ३. मानवी हृदय किती कप्प्यांचे बनलेले आहे ?
उत्तर :- 4
प्रश्न ४. उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ?
उत्तर :- जपान
प्रश्न ५. विशाखा हा कवितासंग्रह कोणी रचला?
उत्तर :- कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर)
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
👉 आपल्या माहितीसाठी.
*📚 उद्योगधंदे (Industries) : साखर उद्योग…..📚*
◼️ भारत हा जगातील सर्वात मोठा ग्राहक व दुसरा मोठा उत्पादक देश आहे.
◻️ देशातील एकूण साखर कारखान्यापैकी 36% साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत.
◼️ देशातील कृषी आधारित क्रमांक दोनचा हा उद्योग आहे.
◻️ भारतातील पहिला साखर कारखाना सरना (बिहार)
◼️ महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सन 1920 बेलापूर (अहमदनगर)
◻️ भारतात सहकारी कारखान्याचा पहिला मान महाराष्ट्राला मिळाला.
◼️ महाराष्ट्रात केंद्रीकरण : गोदावरी, प्रवरा, कृष्णा, पंचगंगा,
◻️ भिमा, तापी, पूर्णा नदी खोऱ्यात एकवटले आहे
◼️ जगातील 15% (सध्या 20%) साखरेचे उत्पादन एकट्या भारतात आहे.
📚 महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने 📚
◻️ पुणे प्रशासकीय विभाग – 55 साखर कारखाने
◼️ नाशिक प्रशासकीय विभाग – 32 साखर कारखाने
◻️ छत्रपती संभाजी नगर प्रशासकीय विभाग – 34 साखर कारखाने
◼️ अमरावती प्रशासकीय विभाग – 9 साखर कारखाने
◻️ नागपुर प्रशासकीय विभाग – 5 साखर कारखाने