ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली 218.prashnavali 218

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
6 Min Read

     📖 वाचाल तर वाचाल 📖

                📘आजचा परिपाठ 📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- २८ नोव्हेंबर  २०२४
🔊🔊 आजचा वार:- गुरुवार

📙📘सुविचार :- कष्ट ही एक अशी चावी आहे
जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
सुध्दा दरवाजे उघडते.

📙📘📙 दिनविशेष

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

1938: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.
1960: मॉरिटानियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
1964: नासाचे मरिनर-4 यान मंगळाच्या मोहिमेवर प्रक्षेपित झाले.
1975: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
1983: स्पेस शटल कोलंबिया STS-9 वर प्रक्षेपित झाले, युरोपियन स्पेस एजन्सीचे स्पेसलॅब मॉड्यूल वाहून नेणारी पहिली मोहीम
1991: दक्षिण ओसेशियाने जॉर्जियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
2000: महान तेलगू कवी गुर्राम जोशुआ यांच्या नावाचा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर झाला.


✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

1853: ‘हेलन व्हाईट’ – डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑक्टोबर 1944)
1857: ‘अल्फान्सो (बारावा)’ – स्पेनचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 25 नोव्हेंबर 1885)
1872: ‘रामकृष्णबुवा वझे’ – गायक नट यांचा जन्म. (मृत्यू: 5 मे 1943)
1922: ‘के. मी मैमीन मप्पालाय’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
1964: ‘मायकल बेनेट’ – भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
1988: ‘यामी गौतम’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.


✒️✒️आजचा दिनविशेष – मृत्यू

1890: ‘जोतिराव गोविंदराव फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 11 एप्रिल 1827)
1893: ‘सर अलेक्झांडर कनिंगहॅम’ – ब्रिटिश अधिकारी यांचे निधन. (जन्म: 23 जानेवारी 1814)
1939: ‘जेम्स नेस्मिथ’ – बास्केटबॉल चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1861)
1954: ‘एनरिको फर्मी’ – नोबेल पारितोषिक विजेते इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 29 सप्टेंबर 1901)
1962: ‘कृष्ण चंद्र डे’ – गायक, संगीत संयोजक व अभिनेते यांचे निधन.
1963: ‘त्र्यंबक शंकर शेजवलकर’ – इतिहासकार व लेखक यांचे निधन. (जन्म: 25 मे 1895)
1967: ‘पांडुरंग महादेव बापट ‘ – सशस्त्र क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म: 12 नोव्हेंबर 1880)
1968: ‘एनिड ब्लायटन’ – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1897)
1999: ‘हनुमानप्रसाद मिश्रा’ – अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक यांचे निधन.
2001: ‘अनंत काणे’ – नाटक निर्माते यांचे निधन.
2008: ‘गजेन्द्र सिंग’ – भारतीय हवलदार यांचे निधन.
2008: ‘संदीप उन्नीकृष्णन’ – भारतीय सैनिक यांचे निधन. (जन्म: 15 मार्च 1977)
2012: ‘झिग झॅगलर’ – अमेरिकन लेखक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1926)


⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 उकराल माती तर पिकतील मोती – मशागत केल्यास चांगले पीक येते.

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉 कृतघ्न होणे – उपकार विसरणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 ज्याचा विसर पडणार नाही असा – अविस्मरणीय

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                      🙏 प्रार्थना 🙏

                देह मंदिर चित्त मंदिर

देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थनाऽऽऽ
सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना ।।धृ.॥

जीवनी नवतेज राहो, अंतरंगी भावनाऽऽऽ
सुंदराचा वेध लागो, मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, ध्यैर्य लाभो, सत्यता संशोधना॥१॥
सत्य, सुंदर मंगलाची…

भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासनाऽऽऽ
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू, बंधुतेच्या बंधना।।२।।
सत्य, सुंदर मंगलाची…

दुःखितांचे दुःख जावो, ही मनाची कामनाऽऽऽ
वेदना जाणावयाला, जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला, पौरुषाची साधना ॥३॥
सत्य, सुंदर मंगलाची…

                📝 बोधकथा 📝

                मैत्री दोन वाघाची
 
        एका जंगलात दोन वाघ असतात.दोघेजण अगदी जवळचे मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-कानून समजवून घेतले, एकत्र शिकार केली…
     एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होते आणि दोघे वेगळे होतात.  बरीच वर्षे जातात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो तर काही कुत्र्यांनी त्या वाघाच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो…
     दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो “पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?”.
     वाघ म्हणतो, “बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण बळ येईल”

  तात्पर्य – “फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू.. जेणेकरून कुत्र्यांना पण बळ येईल.”
   
📘 दिनांकानुसार पाढा :- २८ चा पाढा

                                 २८            १६८
                                 ५६            १९६
                                 ८४            २२४
                                 ११२          २५२
                                 १४०          २८०

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️ 

              📝 प्रश्नावली 218 📝

प्रश्न १. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते  ?
उत्तर – मौलाना अबुल कलाम आझाद

प्रश्न २.  आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करतात ?
उत्तर – २१ फेब्रुवारी

प्रश्न ३. देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले ?
उत्तर – ओडिसा

  प्रश्न ४. आयपीएलच्या इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू कोण  ?
उत्तर – ऋषभ पंत

प्रश्न ५. भारतातील प्राचीन घडीचा पर्वत कोणता ?
उत्तर –अरवली पर्वत

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏭️⏮️⏭️

👉 आपल्या माहितीसाठी.

जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे

✔️ जीवनसत्त्व अ – रेटिनॉल

✔️ जीवनसत्त्व ब १ – थायमिन

✔️ जीवनसत्त्व ब २ – रायबोफ्लोविन

✔️ जीवनसत्त्व ब ३ – नायसिन

✔️ जीवनसत्त्व ब ५ – पेंटोथेनिक ऍसिड

✔️ जीवनसत्त्व ब ६ – पायरीडॉक्झिन

✔️ जीवनसत्त्व ब ७ – बायोटिन

✔️ जीवनसत्त्व ब ९ – फॉलीक ऍसिड

✔️ जीवनसत्त्व ब १२ – सायनोकोबालमीन

✔️ जीवनसत्त्व क – अस्कॉर्बीक ऍसिड

✔️ जीवनसत्त्व ड – कॅल्सीफेरॉल

✔️ जीवनसत्त्व ई – टोकोफेरॉल

✔️ जीवनसत्त्व के – फायलोक्विनोन

Share This Article